सकाळी उपाशी पोटी कोमट पाणी पिता ?, तज्ज्ञांकडून जाणा ही सवय योग्य आहे का ?
जर तुम्हीही सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी पाणी पित असाल तर हा लेख तुमच्या साठी आहे. चला तर एक्सपर्टकडून जाणून घेऊयात की ही सवय योग्य आहे की वाईट ? कोणत्या लोकांनी यापासून सावधान रहायला हवे आणि सकाळी पाणी कसे प्यावे जाणून घेऊयात..

आजकाल लोक आपल्या आरोग्य आणि फिटनेस संदर्भात जास्त जागरुक झाले आहेत. सोशल मीडिया आणि योग गुरु तसेच हेल्थ एक्सपर्ट्सच्या सल्ल्यानुसार अनेक लोक सकाळी रिकाम्या पोटी गरम पाणी पितात. यामुळे शरीर डिटॉक्स होते असे म्हटले जाते. पचन देखील यामुळे चांगले होते, वजन कमी होण्यास मदत होते आणि दिवसाची सुरुवात एनर्जीने होते असे म्हटले जाते. परंतू सकाळी उठताच गरम पाणी पिणे प्रत्येकासाठी फायदेमंद असते का काही लोकांसाठी नुकसानकारक ते पाहूयात…
सकाळी उपाशीपोटी गरम पाणी चांगले असते ?
रात्रभर झोपताना आपले शरीर विविध प्रोसेसमधून जाते. मेटाबॉलिझ्म स्लो झालेले असते. तोंडाच बॅक्टेरियाची वाढ झालेली असते आणि पोट रिकामे असते. अशात सकाळी कोमट पाणी प्यायल्याने शरीरावर कसा परिणाम होतो.हे अनेक बाबींवर अवलंबून असते. उदा. तुमची पचन शक्ती कशी आहे ? तुमची एसिडीटी, गॅस, लो ब्लड प्रेशर वा शुगरची काही समस्या आहे का ? तुमचे डेली रुटीन कसे आहे ? चला तर यावर डायटीशियन काय म्हणतात ?
काय म्हणतात हेल्थ एक्सपर्ट ?
होलिस्टीक डाएटीशियन आणि इंटीग्रेटीव्ह थेरोपेटीक न्यूट्रीशिनिस्ट डॉक्टर गीतिका चोप्रा सांगतात की सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी कोमट पाणी पिणे हेल्दी सवय आहे. खास करुन थंडीच्या दिवसात. रात्रभर झोपल्याने बॉडी डिहायड्रेडीट होते. आणि डायजेस्टीव्ह सिस्टीम थोडी स्ल्गिश मोडमध्ये असते. अशात सकाळी उठून १-२ ग्लास कोमट पाणी पिल्याने गट मुव्हमेट एक्टीव्ह होते. मल त्यागण्यास सोपे जाते. आणि बद्धकोष्ठता, ब्लोटिंग, जडपणा सारख्या थंडीतील सर्वसाधारण आरोग्याच्या समस्या कमी होतात.
सकाळी उपाशी पोटी पाणी पिण्याचे फायदे
एक्सपर्टच्या मते सकाळी कोमट पाणी प्यायल्याने बॉऊल फ्लो स्टुमिलेट होते. ज्यामुळे डायजेशन चांगले होते आणि मेटाबॉलिझ्म जेंटली स्टार्ट होतो. परंतू जास्त गरम पाणी पिणे चुकीचे असते. कारण जास्त गरम पाणी प्यायल्याने एसिटीडी, घशाला त्रास, तोंड कोरडे होणे, पोटात डिसकन्फर्ट होऊ शकते. एकंदर कोमट पाण्याचे फायदे तर मिळतात. परंतू याने फॅट वा डिटॉक्स होत नाही.कोमट पाणी शरीराला हायड्रेट करणे आणि डायजेशन नैसर्गिक सपोर्ट करण्यास मदत करते.
