कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेले डोंबिवलीचे सुभेदार नेपाळपुरात बेपत्ता?, संपर्क तुटल्याने पित्याच्या शोधासाठी मुलाची धावाधाव
कैलास मानसरोवर यात्रेला गेलेले महाराष्ट्रातील पर्यटक नेपाळ येथे अडकले असल्याचे वृत्त आहे. या ग्रुपमध्ये डोंबिवलीच सुनील सुभेदार देखील बेपत्ता झाले आहेत. त्यांच्या शोधासाठी मुलगा स्वानंद याने धावाधाव सुरु केली आहे.

नेपाळ – तिबेट सीमेवर बुधवारी सकाळी अचानक पुराचे संकट ओढावल्याने हाहाकार उडाला आहे. या पुरात १६२ जणांचा बळी गेल्याचा आकडा समोर आला आहे. या पुरात आतापर्यंत १४२ भारतीय बेपत्ता झाल्याची भीतीदायक आकडेवारी समोर आली आहे. आता या पुरात महाराष्ट्रातील पर्यटक देखील बेपत्ता झाल्याचे म्हटले जात आहे. कैलास मानसरोवर यात्रेसाठी महाराष्ट्रातील पर्यटक २३ ऑगस्टला नेपाळला रवाना झाले होते. त्यात डोंबिवलीतील सुनील सुभेदार यांचा देखील समावेश होता. सुभेदार यांचा मुलगा स्वानंद आपल्या वडिलांचा शोध घेत असून तो मुंबईतील संस्था आणि नेत्यांना भेटत आहे.
नेपाळ येथे काल तिबेट सीमेवर आलेल्या पुराने नेपाळमध्ये हाहाकार उडाला आहे. या पुरात १४२ भारतीय बेपत्ता झाल्याचे म्हटले जात आहे. तर या पुराने आता १६२ जणांचा बळी गेल्याचा आकडा समोर आला आहे. कैलास मानसरोवर यात्रेसाठी महाराष्ट्रातील पर्यटक २३ ऑगस्टला नेपाळला रवाना झाले होते. यात डोंबिवलीतील सुनील सुभेदार यांचाही समावेश आहे. त्यांचा मुलगा स्वानंद सुभेदार यांनी वडिलांच्या शोधासाठी धावाधाव सुरु केली आहे. ‘हिल्स अँड ट्रेल्स’च्या माध्यमातून हा ग्रुप मानसरोवर यात्रेला गेला होता. या संपूर्ण ग्रुपशी काल दुपारनंतर संपर्क तुटला आहे.
इमिग्रेशनसाठी जात असल्याचे सांगितले अन् संपर्क तुटला
सुनील सुभेदार यांचा मुलगा स्वानंद याने त्याच्या वडिलांचा शोध घेण्यासाठी संबंधित यंत्रणाचा पाठपुरावा करण्यास सुरुवात केली आहे. त्याने नेपाळ प्रशासन आणि भारतीय दूतावासाशी संपर्क केला आहे. तसेच या कामीम मदतीसाठी मुंबईतील संस्था आणि राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यास देखील सुरुवात केली आहे. या प्रकरणात एका पर्यटकाचे काल सकाळी नातेवाईकांशी शेवटचे बोलणे होते. त्यावेळी हा ग्रुप मानसरोवर यात्रेसाठी इमिग्रेशनसाठी जात असल्याचे त्यांनी सांगितले होते. हे त्यांचे शेवटचे बोलणे ठरले आहे.
भारताची नेपाळला तातडीची मदत
कैलास मानसरोवर यात्रेसाठी भारतातून गेलेल्या काही यात्रेकरुंसह एकूण १४२ भारतीय बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे. तसेच ऑस्ट्रेलिया, साऊथ कोरिया, अमेरिका, साऊथ आफ्रीका, ब्रिटन, मलेशिया, नेदरलँड, पोर्तुगालचे देखील पर्यटक नेपाळमध्ये बेपत्ता झाले आहेत. तिबेट येथून वाहणाऱ्या भोटे कोशी नदीतून बुधवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास मोठा पुर आला. रासुआ, धाडिंग, तिबेटच्या सीमेवरील जिल्हे आणि नुवाकोट या जिल्ह्यांचे या पुराने अतोनात नुकसान झाले आहे. भारताने मानवीय दृष्टीकोनातून एअर फोर्सच्या विमानांनी १० टन मदत साहित्य आणि औषधे तातडीने धाडली आहेत.नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी याबद्दल भारताचे आभार व्यक्त केले आहेत.