सीरियातील प्रसिद्ध कॅफेत भीषण स्फोट; 9 जणांचा मृत्यू , रस्त्यावर रक्ताचा सडा

सीरीयाची राजधानी दमिश्कमधील कॅफेमध्ये गुरुवारी एक भीषण स्फोट झाला. या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला. कॅफेत स्फोट झाल्यानंतर अनेकांची एकच धावाधाव झाली. या दुर्घटनेत हायकोर्टाच्या जवळ झालेल्या स्फोटात 2O जण जखमी झाले आहेत. या स्फोटाची अद्याप कोणीही जबाबदारी स्वीकारलेली नाही. स्फोटानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी कॅफेला घेरलं आहे. तसेच सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी हल्ल्याचा तपास देखील सुरू […]

सीरियातील प्रसिद्ध कॅफेत भीषण स्फोट; 9 जणांचा मृत्यू , रस्त्यावर रक्ताचा सडा
| Updated on: Jul 03, 2026 | 10:21 AM

सीरीयाची राजधानी दमिश्कमधील कॅफेमध्ये गुरुवारी एक भीषण स्फोट झाला. या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला. कॅफेत स्फोट झाल्यानंतर अनेकांची एकच धावाधाव झाली. या दुर्घटनेत हायकोर्टाच्या जवळ झालेल्या स्फोटात 2O जण जखमी झाले आहेत. या स्फोटाची अद्याप कोणीही जबाबदारी स्वीकारलेली नाही. स्फोटानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी कॅफेला घेरलं आहे. तसेच सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी हल्ल्याचा तपास देखील सुरू केला आहे. दमिश्कचे गव्हर्नर माहेर मारवान यांनीही स्पष्ट केलं की, गृह मंत्रालयाकडून प्राथमिक तपास झाला असून लवकरच याविषयी महत्त्वाची माहिती दिली जाईल. या प्रकरणात आढळेल्या दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.

कॅफेमध्ये स्फोट झाल्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, जखमी नागरिक रस्त्यावर पडले आहेत. घटनेनंतर पोलीस देखील हजर झालेले दिसत आहेत. त्यांच्यासोबत रुग्णवाहिका देखील आहे. काही जखमींवर रुग्णालयातच प्राथमिक उपचार करण्यात आले. काही नागरिक गंभीर जखमी होते, त्यांना तातडीने सीरीयाची राजधानी असलेल्या दमिश्कमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

कोर्टाजवळील कॅफेत स्फोट 

स्फोट झाल्यानंतर आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने जबाबदारी स्वीकारलेली नाही. स्फोटानंतर सुरक्षा दलाचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तातडीने संपूर्ण परिसर घेरला. तसेच सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने तपासाला सुरुवात केली. सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओमध्ये अनेक नागरिक जमिनीवर पडलेले दिसताहेत. काही पोलीस अधिकारी जखमींना मदत करत आहेत. घटनास्थळी असलेल्या रुग्णवाहिकेतून जखमींना रुग्णालयात दाखल केले जात आहेत. या कॅफेत मोठ्या प्रमाणात बाजूला असलेल्या कोर्टातील वकील येतात, असे सांगितले जात आहे.

किंमत चुकवावी लागेल, सीरीयातील नेते भडकले 

अल जजीराच्या रिपोर्टनुसार, दमिश्कचे गव्हर्नर माहेर मारवान यांनी स्फोटाचा निषेध केला आहे. गव्हर्नर यांनी पुढे हे स्पष्ट केलं की, घटनेतील आरोपींना कोणत्याही परिस्थिती सोडलं जाणार नाही. पुढील काही तासांत सीरीयात झालेल्या स्फोटामागील सत्य समोर येईल. ज्या लोकांनी सीरीयाच्या नागरिकांची हत्या केली, त्यांना किमत चुकवावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

Follow Us