AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगात आणखी 2 देशात संघर्ष पेटला; ड्रोन हल्ल्यात 12 जणांचा मृत्यू, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Russia Ukraine war : रशियाने पुन्हा एकदा युक्रेनवर हल्ला केलाय. या हल्ल्यात आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झालाय.

जगात आणखी 2 देशात संघर्ष पेटला; ड्रोन हल्ल्यात 12 जणांचा मृत्यू, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
| Updated on: Jun 30, 2026 | 7:43 AM
Share

युक्रेनमध्ये सोमवारी रशियावर पुन्हा ड्रोन हल्ला केला. या हल्ल्यात आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला. तर 40 जण जखमी झाले आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी हा हल्ला भयंकर असल्याचे म्हटलं आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या 4 वर्षांपासून संघर्ष पाहायला मिळत आहे. रशिया हल्ले करून युक्रेनच्या पायाभूत सुविधा नष्ट करत आहेत. तसेच युक्रेनच्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करत आहे. आतापर्यंत झालेल्या हल्ल्यात युक्रेनचे 16000 हून अधिक नागरिक ठार झाले आहेत.

रशियाने सोमवारी पुन्हा एकदा हल्ला करून युक्रेनची झोप उडवली आहे. निप्रॉपेट्रोव्सक क्षेत्राचे प्रमुख ओलेक्सांद्र हंझा यांनी सांगितलं की, रशियाने क्षेपणास्त्रे मध्य शहरात डागली. यात सहा लोकांचा मृत्यू झाला. तर 29 जण जखमी झाले. झेलेन्स्की यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, रशियाने ड्रोन हल्ला करत दक्षिण भागात असलेलेल्या जापोरिज्जिया शहरात प्रवाशांनी भरलेल्या मिनीबसवर हल्ला हल्ला केला. यात तिघांचा मृत्यू झाला. तर एका लहान मुलांसह सहा जण जखमी झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियाने डागलेल्या ड्रोनमुळे उत्तर पूर्व सुमी भागात एका 69 वर्षीय महिला आणि 77 वर्षीय पुरुषांचा देखील मृत्यू झाला आहे. तर खार्किव शहराचे महापौर इहोर तेरेखोव यांच्या माहितीनुसार, रशियाने केलेल्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर पाच जण जखमी झाले आहेत. या हल्ल्याबाबत अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही.

ग्रिड ऑपरेटरने ‘उक्रेनेर्गो’ यांनी सांगितलं की, रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनच्या 8 भागातील वीजपुरवठा खंडीत झाला. दुसरीकडे वाढत्या उकाड्यामुळे काही लोकांचा एसीचा वापर वाढला आहे. त्यामुळे युक्रेनमध्ये वीजेचा वापर देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. झेलेन्स्की म्हणाले, आता लोकांना भीषण हल्ल्यांपासून संरक्षणाची गरज आहे. आपल्याकडे क्षेपणास्त्रविरोधी क्षमता असणे गरजेचे आहे. युरोपने स्वत:च्या क्षेपणास्त्रविरोधी संरक्षण प्रणाली आणि विकसित करण्यामध्ये पूर्णपणे सक्रिय राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले’. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी रविवारी सांगितलं की, रशियाच्या ड्रोन हल्ल्यामुळे युक्रेनकडे इंधनाचा तुटवडा जाणवत आहे. इंधनाचा तुटवडा जाणवू लागल्याने लोकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.पेट्रोल पंपावर तांसतास रांगा लावल्यानंतर नागरिकांना इंधन मिळत आहे. दुसरीकडे रशियानेही हल्ले थांबवण्यास नकार दिला.

Follow Us
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात
ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठीचा हा मोर्चा आता... संजय राऊत काय म्हणाले?
Sanjay Raut At Mumbai : ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठीचा हा मोर्चा आता... संजय राऊत काय म्हणाले?
लोकांच्या मॉर्निंग वॉकचं अंतर तुमच्या मोर्च्याच्या मार्गापेक्षा लांब..
लोकांच्या मॉर्निंग वॉकचं अंतर तुमच्या मोर्च्याच्या मार्गापेक्षा लांब आहे, भाजप नेत्याची जिव्हारी लागणारी टीका