AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजप आणि शिंदे गटातील मतभेद चव्हाट्यावर, थेट शिदेंच्या दाैऱ्यावेळी भाजपा आमदारांनी..

शिंदे शिवसेना आणि भाजपामधील वाद पुढे येताना दिसत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूर दाैऱ्यावर होते. यावेळी शिंदेंच्या या दाैऱ्याकडे भाजपाच्या आमदारांनी पाठ फिरवली. उलट एनसीपी शरद पवार गटाचे आमदार शिंदेंसोबत फिरत होते.

भाजप आणि शिंदे गटातील मतभेद चव्हाट्यावर, थेट शिदेंच्या दाैऱ्यावेळी भाजपा आमदारांनी..
Shiv Sena Shinde faction BJP
| Updated on: Nov 22, 2026 | 11:01 AM
Share

सोलापूर महायुतीतील भाजप आणि शिंदे गटाचे अंतर्गत मतभेद आणखी वाढले आहेत. वाद टोकाला पोहोचताना दिसत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 2 दिवसीय पंढरपूर दौऱ्यात भाजपचा एकही आमदार शिंदेंच्या भेटीसाठी आला नाही, एकनाथ शिंदे तब्बल दोन दिवसांच्या दाैऱ्यावर होते. पण शिंदेंच्या दाैऱ्याकडे भाजपाच्या आमदारांनी पाठिंबा फिरवला. याउलट उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 2 आमदार पुर्ण दौऱ्यात सोबत पाहायला मिळाले. युतीत असूनही विरोधी पक्षाचे आमदार शिंदेंसोबत फिरत होते पण भाजपाच्या आमदारांनी साधी भेटही दिली नसल्याने अंतर्ग वाद चव्हाट्यावर आला. मात्र, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह एकाही आमदाराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली नाही. जाणूनबुजून शिंदेंच्या दाैऱ्याकडे यांनी पाठ फिरवल्याचे सांगितले जाते.

सातारा जिल्हा बँक आणि सोलापूर जिल्हा बँके निवडणुकीतील विरोधी भूमिकेमुळे महायुतीत हे नाराजीनाट्य पाहायला मिळाल्याची चर्चा जोरदार रंगताना दिसत आहे. या उलट माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांच्या घरी एकनाथ शिंदे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी ते काही वेळ होते देखील.

आषाढी वारीत स्थानिक भाजप आमदार समाधान आवताडे वगळता एकही भाजप नेत्याने शुभेच्छा बॅनर देखील लावले नाही. भाजप आमदार समाधान आवताडे यांनीच फक्त एकनाथ शिंदे यांच्या आगमनाचे बॅनर लावले. इतर भाजपाच्या नेत्यांनी बॅनर लावणेही टाळल्याचे बघायला मिळाले. त्यामुळे आगामी काळात भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील नाराजीनाट्य आणखी वाढण्याची शक्यता आहे.

मागील काही दिवसात शिवसेना शिंदे गट आणि भाजपा यांच्यातील वाद पुढे येत आहे. शिवसेना शिंदे गट आणि भाजपामधील वाद पुढे येत असला तरीही राज्यातील बडे नेते युतीत सर्वकाही अलबेल असल्याचे बोलत आहेत. विधानसभा शिक्षण मतदार संघ आणि पदवीधर शिक्षक संघ निवडणुकीत महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला होता. यावेळी काही ठिकाणी या वादामुळेच पराभवाचा सामना करण्याची वेळ आली होती. त्यातच आता सोलापूरमध्येही हेच चिन्ह बघायला मिळतंय.

Follow Us
मोठी बातमी! भाजपचे राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचे निधन; राजकीय...
मोठी बातमी! भाजपचे राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचे निधन; राजकीय वर्तुळात शोककळा
टिपू सुलतान जयंतीला उपस्थिती अन् वाद! भाजप नगरसेवक विलास लोंढेंनी...
Vilas Londhe : टिपू सुलतान जयंतीला उपस्थिती अन् वाद! भाजप नगरसेवक विलास लोंढेंनी स्पष्ट केली भूमिका
एका दिवसासाठी मायकल जॅक्सन बनायचंय', रणवीर सिंगच्या प्रश्नानंतर...
एका दिवसासाठी मायकल जॅक्सन बनायचंय', रणवीर सिंगच्या प्रश्नानंतर सांगितलं रंजक गुपित
खाटूश्याम दर्शनाहून परतताना काळाचा घाला! धुळ्यातील 9 भाविकांचा...
खाटूश्याम दर्शनाहून परतताना काळाचा घाला! धुळ्यातील 9 भाविकांचा राजस्थानमध्ये भीषण अपघात
मुंबईत हुडहुडी! 11 वर्षांतील नोव्हेंबरमधील नीचांकी तापमानाची नोंद...
मुंबईत हुडहुडी! 11 वर्षांतील नोव्हेंबरमधील नीचांकी तापमानाची नोंद, प्रदूषणातही वाढ
मुंबईच्या रस्त्यांवर धावपटूंचा उत्साह! WNC नेव्ही हाफ मॅरेथॉनला शेकडो.
मुंबईच्या रस्त्यांवर धावपटूंचा उत्साह! WNC नेव्ही हाफ मॅरेथॉनला शेकडो धावपटूंचा प्रतिसाद
मंत्र्यांचे भाषण सुरू असतानाच भाजपच्या माजी आमदारांना व्यासपीठावरच...
मंत्र्यांचे भाषण सुरू असतानाच भाजपच्या माजी आमदारांना व्यासपीठावरच लागली डुलकी; VIDEO व्हायरल!
मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? अहिर म्हणाले?
Sachin Ahir : मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? सचिन अहिर काय म्हणाले?
मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा...
Deven Bharati : डायल 112 पासून GPS ट्रॅकिंगपर्यंत…; मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा दावा
चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
Dharashiv Farmer : चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ