AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut: आकडा खरा, कोणी आक्षेप घेतलाय का? डिलिमिटेशनसाठी खासदारांचा 150 कोटींच्या दरावरून राऊतांचा खणखणीत सवाल

Sanjay Raut on Delimitation Amit Shah: खासदार संजय राऊत यांनी शनिवारी डिलिमिटेशन बिलासाठी खासदारांना 150 कोटी रुपयांची ऑल पार्टी ऑफर असल्याचा दावा केला होता. त्यावरून त्यांनी आज पुन्हा भाजपवर निशाणा साधला. तर टिपू सुलतानवरूनही सरकारला जाब विचारला.

Sanjay Raut: आकडा खरा, कोणी आक्षेप घेतलाय का? डिलिमिटेशनसाठी खासदारांचा 150 कोटींच्या दरावरून राऊतांचा खणखणीत सवाल
आकडा खरा, कोणी आक्षेप घेतलाय का? राऊतांचा खणखणीत सवाल
| Updated on: Nov 22, 2026 | 10:53 AM
Share

Sanjay Raut on Delimitation Amit Shah: येत्या हिवाळी अधिवेशनात मतदारसंघ पुनर्रचना बिलाला पाठिंबा मिळावा यासाठी खासदारांना 150 कोटी रुपयांचा भाव ठरल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला. ऑल पार्टी ऑफर असल्याचेही ते म्हणाले. तर आज त्यांनी आपला आकडा खरा आहे, कोणी त्यावर आक्षेप घेतलाय का? असा खडा सवाल केला. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून मोठे वक्तव्य केले. तर टिपू सुलतान जयंतीवरून सुरू असलेल्या वादावर सरकारला जाब विचारला.

टिपू या राष्ट्राचा शत्रू की वीर?

टिपू सुलतानविषयी सरकारची अधिकृत भूमिका काय आहे, हे एकदा सरकारने जाहीर केलं पाहिजे. टिपू सुलतान हा इंग्रजांविरोधातील लढाईत मारला गेला. त्याच्यामुळे फार मोठा वर्ग आहे जो त्याला हिरो मानतो. याच्यामध्ये जर हिंदू-मुसलमान असा भाग करायचा असेल तर कुणी आडवलं नाही, पण एकदा केंद्र आणि राज्य सरकारतर्फे ठरवायला हवे की, टिपू सुलतान नक्की कोण आहे. त्याच्या मदतीसाठी महाराष्ट्रातूनही इंग्रजांविरोधात लढण्यासाठी सैन्य गेलं होतं. त्याकाळात जे काही सरदार होते. ते सुद्धा टिपूच्या मदतीसाठी ब्रिटिशांविरोधातील लढाईत त्याच्यासोबत लढाईत होते. बहुधा ते सांगलीचे पटवर्धन सरदार होते, आता मला असे आठवत आहे, असे राऊत म्हणाले.

पण हा वाद किती वर्ष चालणार आहे. केंद्र सरकारने त्यावर पडदा टाकला पाहिजे. टिपू कोण आहे? इंग्रजांविरोधात लढताना मरण पावलेला वीर आहे की या राष्ट्राचा शत्रू आहे हे जोपर्यंत सरकार जाहीर करत नाही तोपर्यंत हा वाद कायम राहिल. सध्याच्या या सरकारला हा वाद हवा आहे. या देशात असंख्य प्रश्न आहेत. महाराष्ट्रात प्रश्न आहे. टिपू टिपू किती काळ खेळायचं, थांबवा हा विषय असे आवाहन खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

डिलिमिटेशनसाठी दीडशे कोटींचा दर

माझा आकडा खरा आहे. कोणी आक्षेप घेतलाय का? गेल्या काही महिन्यात अमित शाह इथे महाराष्ट्रात सात वेळा आले. मणिपूरला काय चाललंय ते बघा. इतर राज्यात जा. बरं कुणाचा आक्षेप आहे ते सांगता का? मी जे म्हणालो काल, कोणी आक्षेप घेतला आहे का? सांगा ना, मी त्याला उत्तर देतो. मी कुणावरही व्यक्तिगत टिप्पणी करणार नाही. पण अद्याप संसदेचं हिवाळी अधिवेशन घेतलं जात नाही. हे संविधानाच्या विरोधात, नियमबाह्य आहे. तुम्ही एक अधिवेशन गुंडाळत आहात, इतकी तुमची हिम्मत होते. कारण तुम्हाला जो अंहकार आहे, की अधिवेशन आम्ही घेतलं तर डिलिमिटेशन संदर्भातील विधेयक घेऊन आम्ही येऊ, मंजूर करू आणि पडेल ती किंमत देऊ. मग खासदार विकत घेऊ, पक्ष फोडू, संसद बंद पाडू. जेव्हा पक्ष फुटत नाहीत. द्रमुक असेल. शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी असेल. इतरही काही पक्ष आहे. आमच्यावरही प्रयोग झाला. आमचे सहा लोक फोडले. अमित शाह अथवा भाजपकडून जे एजंट नेमले आहेत, आकडा पूर्ण करण्यासाठी जी रक्कम लागते. या क्षणी भाजपचे नॅशनल मार्केटमध्ये खासदारांचा दीडशे कोटींचा भाव सुरू आहे. डिलिमिटेशनच्या बाजूने मतदान करण्यासाठी हा भाव सुरू आहे. हे मी सत्य सांगत आहे. यावर कुणाला काही बोलायचं असेल तर बोलू द्या. पण मुळात ही संस्कृती आणली कोणी? असा खणखणीत सवाल राऊत यांनी केला.

ऑल पार्टी ऑफर

आम्ही पैसे देत नाहीत मग महाराष्ट्रातील खासदार काय चिंचोके देऊन फुटले का? का खणानाराळानं त्यांची ओटी भरली म्हणून फुटले? त्यांनाही 50-50 कोटी, 100-100 कोटी दिले, तेव्हाच ते फुटले ना, हे तर महत्त्वाचं बिलं आहे. 2029 च्या निवडणुकीत भाजपच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे दीडशे कोटी रुपये घ्यायचे आणि आम्हाला मतदान करायचं अशी ऑल पार्टी ऑफर आहे, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

Follow Us
टिपू सुलतान जयंतीला उपस्थिती अन् वाद! भाजप नगरसेवक विलास लोंढेंनी...
Vilas Londhe : टिपू सुलतान जयंतीला उपस्थिती अन् वाद! भाजप नगरसेवक विलास लोंढेंनी स्पष्ट केली भूमिका
एका दिवसासाठी मायकल जॅक्सन बनायचंय', रणवीर सिंगच्या प्रश्नानंतर...
एका दिवसासाठी मायकल जॅक्सन बनायचंय', रणवीर सिंगच्या प्रश्नानंतर सांगितलं रंजक गुपित
खाटूश्याम दर्शनाहून परतताना काळाचा घाला! धुळ्यातील 9 भाविकांचा...
खाटूश्याम दर्शनाहून परतताना काळाचा घाला! धुळ्यातील 9 भाविकांचा राजस्थानमध्ये भीषण अपघात
मुंबईत हुडहुडी! 11 वर्षांतील नोव्हेंबरमधील नीचांकी तापमानाची नोंद...
मुंबईत हुडहुडी! 11 वर्षांतील नोव्हेंबरमधील नीचांकी तापमानाची नोंद, प्रदूषणातही वाढ
मुंबईच्या रस्त्यांवर धावपटूंचा उत्साह! WNC नेव्ही हाफ मॅरेथॉनला शेकडो.
मुंबईच्या रस्त्यांवर धावपटूंचा उत्साह! WNC नेव्ही हाफ मॅरेथॉनला शेकडो धावपटूंचा प्रतिसाद
मंत्र्यांचे भाषण सुरू असतानाच भाजपच्या माजी आमदारांना व्यासपीठावरच...
मंत्र्यांचे भाषण सुरू असतानाच भाजपच्या माजी आमदारांना व्यासपीठावरच लागली डुलकी; VIDEO व्हायरल!
मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? अहिर म्हणाले?
Sachin Ahir : मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? सचिन अहिर काय म्हणाले?
मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा...
Deven Bharati : डायल 112 पासून GPS ट्रॅकिंगपर्यंत…; मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा दावा
चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
Dharashiv Farmer : चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे
Pune : बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे गावची अनोखी काटेबारस यात्रा, व्हिडिओ बघाच