AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराण-इस्रायल युद्धात तालिबानची एन्ट्री! एकत्र काम केल्यास…, मुस्लिम देशांना खास संदेश

इराण विरुद्ध इस्रायल यु्द्धामुळे जगातील सर्वच देशांची चिंता वाढली आहे. अफगाणिस्तानातील तालिबाननेही या युद्धाबाबत मोठं विधान केलं आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

इराण-इस्रायल युद्धात तालिबानची एन्ट्री! एकत्र काम केल्यास..., मुस्लिम देशांना खास संदेश
taliban on war
| Updated on: Jun 23, 2025 | 7:32 PM
Share

इराण विरुद्ध इस्रायल यु्द्धामुळे जगातील सर्वच देशांची चिंता वाढली आहे. अमेरिका, रशिया या बड्या देशांनीही आपली भूमिका जाहीर केली आहे. त्यानंतर आता अफगाणिस्तानातील तालिबाननेही या युद्धाबाबत मोठं विधान केलं आहे.तालिबानने इस्रायलला जोरदार विरोध केला आहे. तसेच इस्लामिक देशांना मोलाचा संदेश दिला आहे.

तालिबानकडून युद्ध थांबवण्याचे आवाहन

इस्रायल-इराण युद्धादरम्यान, अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री आमिर खान मुत्तकी यांनी म्हटले की, “मी ओआयसीच्या सदस्य देशांना इस्रायलकडून पॅलेस्टाईन आणि इराणवर होत असलेला अत्याचार थांबवण्याचे आवाहन करतो. जर ही परिस्थिती अशीच राहिली तर इतर देशांच्या सुरक्षेला थेट धोका निर्माण होईल याचे विनाशकारी परिणाम होऊ शकतात.”

मुत्तकी यांचा मुस्लिम देशांना संदेश

आमिर खान मुत्तकी यांनी म्हटले की, ” ओआयसीची ही शिखर परिषद केवळ संकटाची चिंता करण्यासाठी नसावी, तर ती व्यावहारिक कामे, सर्व देशांची एकत्रित भूमिका आणि नवीन उपाय शोधण्यासाठी असावी. जर इस्लामिक देशांनी मजबूत राजकीय इच्छाशक्ती, इस्लामिक बंधुता आणि परस्पर सहकार्याने काम केले तर याचा जागतिक निर्णय घेणाऱ्या देशांवरही प्रभाव पडेल.’

पाश्चात्य देशांकडून तालिबानला मान्यता नाही

महत्वाची बाब म्हणजे, अफगाणिस्तानातील तालिबान सरकारला संयुक्त राष्ट्र आणि अमेरिकेसह अनेक पाश्चात्य देशांनी स्वीकारलेले नाही. त्यामुळे तालिबानला जागतिक व्यासपीठावर संधी मिळत नाही. त्याच बरोबर या देशाला आंतरराष्ट्रीय बँकेकडून कर्जही मिळत नाही. पाश्चात्य देशांनी तालिबानवर महिलांच्या हक्कांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे या सरकारला मान्यता मिळालेली नाही. मात्र तालिबानचे नेते मुस्लिम देशांच्या व्यासपीठावर आपले मनोगत व्यक्त करु शकतात.

अमेरिकेचा इराणवर हल्ला

अमेरिकेने इराणच्या नातानझ, इस्फहान आणि फोर्डो अणु तळांवर बी-2 बॉम्बरने हल्ला केला होता. हा हल्ला इराणच्या आण्विक स्थळावर करण्यात आला होता अशी माहिती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली होती. आमचा हेतू इराणने अणुबॉम्ब बनवू नये असा आहे असंही अमेरिकेने म्हटलं होतं. मात्र त्यानंतर इराणने अमेरिकेच्या सिरियातील तळावर हल्ला केला होता अशी माहिती समोर आली आहे.

Follow Us
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या...
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान धक्कादायक घटना, व्हिडीओच आला समोर
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर संताप
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्ते  मनोज जरांगेंवर भडकले; सडकून टीका!
मोठी बातमी! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची...
मोठी खळबळ! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची... नेमकी भानगड काय?
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर'
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर' महारक्तदान शिबीराचे आयोजन
पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! पहा Video
Manoj Jarange Patil | पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! फुलांचा वर्षाव अन्... पहा व्हिडीओ
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील नेत्याचा एकाच विमानाने प्रवास
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील बड्या नेत्याचा एकाच विमानाने प्रवास, फोटो आले समोर
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही घेऊ शकतो- जरांगे
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही... भर मंचावरून मनोज जरांगे कडाडले; आता...
Big Breaking| बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर
Big Breaking | बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर; नेमकं काय घडलं? पहा व्हिडीओ