AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Donald Trump : बापरे! डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी, तुझं काही खरं नाही…भाषण चालू असतानाच राग अनावर

संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेत डोनाल्ड ट्रम्प यांनी भाषण केले. यावेळी भाषणादरम्यानत त्यांचे टेलिप्रॉम्पटर बंद पडले आणि ट्रम्प यांचे वेगळे रुप पाहायला भेटले. त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघावर सडकून टीका केली.

Donald Trump : बापरे! डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी, तुझं काही खरं नाही...भाषण चालू असतानाच राग अनावर
donald trump
| Updated on: Sep 23, 2025 | 11:26 PM
Share

Donald Trump Speech : जागतिक राजकारणात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबवण्यासाठी त्यांच्याकडून होत असलेल्या प्रयत्नांमुळेही त्यांची सध्या सगळीकडे चर्चा आहे. दरम्यान, सध्या संयुक्त राष्ट्रसंघांच्या सर्वसाधारण सभेत ट्रम्प यांनी केलेल्या भाषणाची संपूर्ण जगात दखल घेतली जात आहे. त्यांनी आपल्या भाषणात संयुक्त राष्ट्रसंघावर सडकून टीका केली. तसेच त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघ युद्ध थांबवण्यात यशस्वी ठरले नसल्याचेही मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. त्यांच्या या भाषणादरम्यान टेलिप्रॉम्पटर अचानक बंद पडले. यामुळेदेखील ट्रम्प यांचे भाषण सध्या चर्चेचा मुद्दा ठरले आहे. टेलिप्रॉम्पटर बंद पडल्यानंतर ते भडकले आहेत.

 युद्ध थांबवण्याचे काम संयुक्त राष्ट्रांचे पण…

संयुक्त राष्ट्रसंघाची काम करण्याची पद्धत ही बंद पडलेल्या या टेलिप्रॉम्पटरप्रमाणेच आहे. त्यामुळेच मला काम करावे लागते, असा टोला ट्रम्प यांनी आपल्या भाषणादरम्यान लगावला. तसेच मी आतापर्यंत सात महिन्यांत सात युद्ध थांबवले आहेत. लाखो लोकांचा जीव वाचवला आहे. हे युद्ध थांबवण्याचे काम संयुक्त राष्ट्रांचे होते. मात्र संयुक्त राष्ट्रसंघाची कार्यप्रमाणाली टेलिप्रॉम्पटरप्रमाणेच खराब आहे, असे मत यावेळी ट्रम्प यांनी व्यक्त केले.

…अन् टेलिप्रॉम्पटर बंद पडले

पुडे बोलताना संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना जगात शांती नांदावी यासाठी करण्यात आली होती. मात्र हे काम आता मलाच करावे लागत आहे. संयुक्त राष्ट्रसंघ आपले काम चांगल्या पद्धतीने करू शकत नाहीये. ते फक्त पत्र लिहीत आहे. पण पत्र लिहिण्याने युद्ध थांबत नसते, अशी टीकाही त्यांनी केली. ट्रम्प यांचे भाषण चालू असताना त्यांच्या पत्नी मेलेनिया ट्रम्प स्मितहास्य करत होत्या. भाषण करण्यासाठी आले असतानाच ट्रम्प यांच्यापुढे असलेले टेलिप्रॉम्पटर बंद पडले. त्यानंतर त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या अधिकाऱ्यांवरही मिश्कील भाष्य केले. टेलिप्रॉम्पटरची जबाबदारी ज्या अधिकाऱ्यांवर आहे, आता त्याची नोकरी धोक्यात आली आहे. पण टेलिप्रॉम्पटर बंद पडले असले तरी त्याचा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही, असेही ते मिश्किलपणे म्हणाले.

मला नोबेल नको आहे, पण लोकांची तशी इच्छा आहे

संयुक्त राष्ट्रसंघाच्या सभेत बोलताना त्यांनी पुन्हा एकदा नोबेल पारितोषकाचा उल्लेख केला. मी लाखो लोकांचा जीव वाचवण्याचे काम केले आहे. अजूनही हे काम चालूच आहे. युद्ध संपल्यानंतर लोक जेव्हा आपल्या कुटुंबाजवळ जातात तेव्हा त्यांना आनंद होतो. मला हाच आनंद एखाद्या नोबेल पुरस्कारापेक्षाही महत्त्वाचा आहे. पण लोकांना वाटते की मला नोबेल पुरस्कार मिळावा. यावेळी त्यांनी युक्रेन-रशिया युद्धावरही भाष्य केले. रशिया युक्रेनच्या लोकांचा जीव घेत आहे. तरीदेखील युरोपीय देश रशियाकडून तेलखरेदी करतच आहेत, अशी खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली.

Follow Us
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही कसे बनले ‘सामना’चे संपादक? राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले...
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले, तुरुंगात पुस्तक लिहिलं अन्...
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट