अमेरिकेत मोठी खळबळ, नागरिकांना सतर्कतेचा इशारा, इराण युद्धात डोनाल्ड ट्रम्प थेट..
इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढला आहे. इराणने कतारकडे सात अटी युद्धबंदी करार दिला. मात्र, त्यानंतर निर्णायक युद्धाबद्दल बोलताना अमेरिका दिसली. ज्यानंतर त्याला इराणकडूनही उत्तर देण्यात आले. अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा वाढला आहे.

चार आठवडे फार तर फार युद्ध इराणसोबत चालू शकते, असा दावा अमेरिकेचा होता. मात्र, आता काही महिने या युद्धाला होत आहेत, तरीही इराणने हार मानली नाही. इराणला अडकवण्यासाठी अमेरिकेकडून अनेक प्रयत्न केली जात आहेत. मात्र, इराणने अजूनही हार मानली नाही. इराण भक्कमपणे उभा आहे. इराणला आर्थिक कोंडीत पकडण्यासाठी अमेरिका नाना प्रकारचे प्रयत्न करत आहे. मात्र, त्यांना यश मिळत नाही. आतापर्यंत अमेरिकेने इराणमध्ये अनेक मोठे हल्ले केले. आता इराण आणि अमेरिका यांच्यात चर्चा वाढल्या आहेत. इराणला युद्धबंदीचा प्रस्ताव अगोदरच अमेरिकेने दिला. मात्र, तो प्रस्ताव इराणला मान्य नाही. आता इराणकडून युद्धबंदीसाठी महत्वाच्या 7 अटी वॉशिंग्टनसमोर ठेवण्यात आल्या. त्यातच अमेरिकेने थेट निर्णायक युद्धचा मोठा इशारा दिला.
इराणवर अमेरिका मोठा हल्ला करू शकते, असे सांगितले जात आहे. अजून एकदा तणाव वाढल्याचे बघायला मिळतंय. त्यातच मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. इराणचे सुरक्षा प्रमुख मोहसेन रेजाई यांनी अल जजीरा यांच्यासोबत बोलताना म्हटले की, इराण हा मध्यस्थी कतारच्या संपर्कात आहे. युद्ध संपवण्यासाठी आम्ही आमच्या अटी कतारसमोर ठेवल्या आहेत.
आता इराण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उत्तराची प्रतिक्षा करत आहेत. त्यांनी म्हटले की, आम्ही ठेवलेल्या अटी मान्य करणे अमेरिकेसाठी चांगले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीला उत्तर देत त्यांनी म्हटले की, इराण निर्णायक युद्धासाठी तयार आहे. इराणकडून करण्यात आलेल्या विधानानंतर डोनाल्ड ट्रम्प कॅंप डेविटहन व्हाईट हाऊसमध्ये परतले. तिथे रात्र घालून ते पुन्हा व्हाईट हाऊसमध्ये आले.
यादरम्यानच हाय सिक्योरिटी अलर्ट जारी करण्यात आला. अमेरिका, इराक, बहरीन, ओमान, सऊदी अरेबिया, इराण, कतार, लेबनान, कुवेत आणि जॉर्डन या देशात असलेल्या अमेरिकी नागरिकांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला. अमेरिकेने आपल्या नागरिकांना सावध राहण्याचा इशारा दिला. यासोबतच अमेरिकेत मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत.