AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला, 27 जणांचा मृत्यू!

Pahalgam Terror Attack : जम्मू काश्मीरमधील पहलगामध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात एकूण 20 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला, 27 जणांचा मृत्यू!
jammu kashmir pahalgam terror attack
| Updated on: Apr 22, 2025 | 9:03 PM
Share

Jammu Kashmir Pahalgam Terror Attack : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात एकूण 27 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

टीआरएफ संघटनेनं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली

अतिरेक्यांनी लोकांची नावे विचारून लोकांवर हल्ले केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या हल्ल्यात मृतांचा आकडा 27 वर पोहोचला आहे. घटनास्थळी सीआरपीएफच्या तुकड्या तैनात करण्यात आले आहे. टीआरएफ या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. पहलगाममध्ये फिरायला आलेल्या पर्यटकांवर हा हल्ला झाला आहे.

नावं विचारून करण्यात घालण्यात आल्या गोळ्या

मिळालेल्या माहितीनुसार गुजरात, तमिळनाडू, उडिसा, महाराष्ट्र या राज्यातील पर्यटकांवर हा हल्ला झाला. दहशतवाद्यांनी काही पर्यटकांवर त्यांची नावं विचारून हल्ला करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील एक पर्यटक गंभीर जखमी आहे. तर इतर तीन पर्यटक जखमी आहेत. या सर्वांवर रुग्णालया उपचार केले जात आहेत.

अमित शाह तातडीने जम्मू-काश्मीरकडे रवाना

हा भ्याड हल्ला झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तातडीने जम्मू-काश्मीरला रवाना झाले आहेत. या हल्ल्यात सहभागी असणाऱ्यांना सोडले जाणार नाही, असे अमित शाहांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील या हल्ल्याचा निषेध केल करत मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. या हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी संवेदना व्यक्त करत या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे.

सैनिक तैनात, यंत्रणा सतर्क

या हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. ज्या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला, त्या भागात सैनिक तैनात करण्यात आले आहेत. तपास यंत्रणादेखील या दहशतवादी हल्ल्याचा तपास करत आहेत. दरम्यान, या हल्ल्यात जमखी झालेल्यांवर उपचार चालू आहेत. यातील काही लोक हे गंभीर जखमी असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्तक केली जात आहे.

नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.
दमानियांचा सुषमा अंधारे यांना पाठिंबा; शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी
दमानियांचा सुषमा अंधारे यांना पाठिंबा; शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी.
सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न! शंभूराज देसाईंचा टोला
सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न! शंभूराज देसाईंचा टोला.
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.