OMG! पायांवर सुज आली म्हणून डॉक्टरकडे गेली आणि 48 तासात डिलीव्हरी झाली; बाळाला पाहून धक्का बसला

| Updated on: Oct 18, 2022 | 10:15 PM

बाळाची चाहुल लागताच महिलांचे सगळं आयुष्यचं बदलून जाते. मात्र, एका महिलेला मातृत्वाबाबत आश्चर्यकारक असा अनुभव आला आहे.

OMG! पायांवर सुज आली म्हणून डॉक्टरकडे गेली आणि 48 तासात डिलीव्हरी झाली; बाळाला पाहून धक्का बसला
Follow us on

वॉश्गिंटन : मातृत्वाचा अनुभव हा प्रत्येक महिलेसाठी विलक्षण आणि पुर्नजन्म देणारा असा अनुभव असतो. बाळाची चाहुल लागताच महिलांचे सगळं आयुष्यचं बदलून जाते. मात्र, एका महिलेला मातृत्वाबाबत आश्चर्यकारक असा अनुभव आला आहे. या महिलेच्या पायांवर सुज आली म्हणून ती डॉक्टरकडे गेली. यानंतर पुढच्या 48 तासांत या महिलेची प्रसूती झाली आणि तिने बाळाला जन्म दिला.

अमेरिकेच्या न्यू ओमाहा येथे हा सगळ्यांना थक्क करणारा प्रकार घडला आहे. एका 23 वर्षीय महिलेला ती गरोदर असल्याचे समजलेच नाही. पायांवर सुज आल्याने ती डॉक्टरकडे गेली असता काही तासांतच तिची डिलीव्हरी झाली.

इंग्रजी वेबसाइट द सनने याबाबतचे वृत्त प्रसारित केले आहे. ही महिला शिक्षिका आहे. आपण गरोदर असल्याची कोणतीही लक्षण या महिलेला जाणवली नाहीत. मध्ये मध्ये तिला थकवा जाणवत होता.

खूप काम केल्यामुळे तसेच दगदग आणि कामाचा तणाव यामुळे असे वाटत असल्याचे समजून महिलेने याकडे दुर्लक्ष केले. यामुळे तिने घरीच नॉर्मल गोळ्या-औषधे घेतली.

मात्र, अचानक त्रास जास्तच जाणवू लागला आणि पायांवर सूज आल्याने या महिलेने डॉक्टरांना दाखवले. यावेळी ती सात ते साडे सात महिन्यांची गरोदर असल्याचे डॉक्टरांनी या महिलेला सांगितले.

डॉक्टरांनी अल्ट्रासाऊंडद्वारे महिलेला आणि बाळाची तपासणी केली. मात्र, परिस्थिती गंभीर असल्याचे सांगत डॉक्टरांनी तात्काळ प्रसूती करण्याचा सल्ला दिला.

यामुळे महिलेची साडे सात महिन्यातच प्री-मॅच्युअर डिलिव्हरी करावी लागली. डॉक्टरांनी तपासणी केल्यावर दोन दिवसांनी सी-सेक्शन डिलिव्हरी अंतर्गत या महिलेने बाळाचा जन्म दिला.

वेळेच्या दहा आठवडे आधी बाळाचा जन्म झाला आहे. जन्माच्या वेळी बाळाचे वजन फक्त एक किलो 800 ग्रॅम होते. आता बाळाची प्रकृती स्थिर आहे. अचानक अपत्य प्राप्ती झाल्याने या महिलेसह तिचा पती तसेच तिचे कुटुंबीय आनंदात आहेत.