
रशिया आणि युक्रेन यांच्यातील तणाव प्रचंड वाढताना दिसत आहे. गेल्या 4 वर्षांपासून दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू आहे. रशिया आणि युक्रेन युद्धाच्या झळा संपूर्ण जगाला बसताना दिसत आहेत. भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने अमेरिकेने भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावला. भारताने रशियाकडून तेल खरेदी पूर्णपणे बंद करावी, अशी मागणी अमेरिकेची होती. यादरम्यान रशिया आणि युक्रेन युद्धाला भारतच जबाबदार असल्याचाही आरोप अमेरिकेने केला. भारत रशियाकडून तेल खरेदी करून मोठा पैसा रशियाला देत आहे आणि रशिया तो पैसा युक्रेनच्या लोकांना मारण्यासाठी वापरत आहे. भारतावर अमेरिकेचा प्रचंड दबाव होता. भारतातून अमेरिकेत होणारी निर्यात जवळपास बंद झाली आहे. भारताने हे नुकसान भरून काढण्यासाठी अनेक देशांसोबत मुक्त व्यापार करार केली. भारत आणि अमेरिकेतील संबंध तणावात होती.
भारत आणि अमेरिकेतील संबंध कायमच चांगली राहिली. मात्र , टॅरिफच्या मुद्द्यात अधिक चिघळताना दिसली. भारतावर अमेरिकेने लावलेल्या टॅरिफनंतर भारताच्या मदतीला चीन आला. चीनने जाहीरपणे अमेरिकेच्या टॅरिफवर टीका केली. मात्र, या संधीचा फायदा घेत पाकिस्तानने अमेरिकेसोबत जवळीकता वाढवली. भारताने सुरूवातीपासूनच अमेरिकेच्या टॅरिफला विरोध केला.
नुकताच मिळालेल्या माहितीनुसार, भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद केल्याने अमेरिका भारतावरील टॅरिफ रद्द करू शकते. भारतावरील टॅरिफ रद्द करण्यासाठी मोठा मार्ग अमेरिकेला मिळाला. अमेरिकेच्या अर्थमंत्र्यांनी अगोदरच स्पष्ट केले की, भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्यने आम्ही 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ भारतावर लावला होता. आता भारताने रशियाकडून तेल खरेदी पूर्ण बंद केलीये.
मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिका पुढच्या आठवड्यात भारतावरील टॅरिफबद्दल निर्णय घेऊ शकते. भारतावरील 25 टक्के टॅरिफ काढण्याची अमेरिकेची तयारी आहे. पुढच्या आठवड्यात भारताला याबाबतची गूड न्यूज मिळू शकते. जर अमेरिकेने भारतावरील हा टॅरिफ काढला तर मोठा दिलासा अनेक व्यापाऱ्यांना मिळेल. भारत आणि अमेरिकेत व्यापार करार होणे शिल्लक आहेत, हे व्यापार करार झाल्यानंतर टॅरिफ 17 टक्क्यांपेक्षा कमी होती, असे सांगितले जात आहे.