मोठी बातमी! नेपाळ आला वठणीवर, भारताबाबत थेट मोठी घोषणा, बालेन शाह..

नेपाळमध्ये मोठा हाहाकार उडाला आहे. त्यातच आता मोठी माहिती पुढे येत आहे. नेपाळचे पंतप्रधान भारताबद्दल अनेकदा धक्कादायक विधाने करताना दिसले. मात्र, या संकटात काळात त्यांची भारताबद्दलची भूमिका बदलल्याचे बघायला मिळतंय.

मोठी बातमी! नेपाळ आला वठणीवर, भारताबाबत थेट मोठी घोषणा, बालेन शाह..
Balen Shah
| Updated on: Aug 28, 2026 | 9:50 AM

नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह भारत दाैऱ्यावर येणार आहेत. नेपाळमध्ये परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. पूरस्थिती नेपाळमध्ये आहे. भारतासह अन्य देशांचे नागरिक नेपाळमध्ये अडकली आहेत. सर्वकाही वाहून गेले. 1200 हून अधिक लोक बेपत्ता आहेत. मोठे बचावकार्य राबवले जात आहे. भारताकडून मोठी मदत केली जात आहे. भारताने नेपाळला बचावकार्यात मदत करण्यासाठी प्रस्ताव दिला होता. मात्र, तो प्रस्ताव नेपाळने नाकारला आहे. भारताच्या सैन्य विमानांनी 10 टन इतकी मदत नेपाळला पोहोचली आहे. मागच्या काही दिवसांपासून भारत आणि नेपाळ यांच्यातील संबंध तणावात होते. नेपाळच्या पंतप्रधानांकडून वेगवेगळे दावे केली जात होती. मात्र, नेपाळमधील सध्याच्या परिस्थितीमध्ये भारताने कोणताही विचार न करता नेपाळची मदत केली.

अजूनही मदत पाठवली जात आहे. त्यामध्येच आता नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह भारत दाैऱ्यावर येणार आहेत. बालेन शाह यांचा पहिला विदेश दाैरा हा भारतच असणार आहे. नेपाळचे अर्थमंत्री स्वर्णिम वागले यांनी शाह यांच्या भारत दाैऱ्याबद्दल मोठे विधान केले. वागले यांनी म्हटले की, आम्ही पंतप्रधानांच्या भारत दाैऱ्याबद्दल चर्चा सुरू केली आहे. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, त्यांचा पहिला विदेश दाैरा हा भारतातच असेल.

Loading...

अजून तारीख ठरणे बाकी आहे. यावर्षाच्या शेवटला त्यांचा भारत दाैरा होण्याचे संकेत आहेत. विशेष म्हणजे नेपाळच्या अर्थमंत्र्यांचे हे विधान अशावेळी आले, ज्यावेळी मोठी पूर नेपाळमध्ये आला. लोक बेघर झाले आहेत. सर्वकाही या पुरात वाहून गेले. नेपाळसोबत संबंधित व्यवस्थित नसतानाही भारताने कोणताही विचार न करता मदतीकरिता हात पुढे केला.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पीएम बालेन शाह यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली. नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले. भारताकडून मदत पुरवली जात आहे. त्यातच नेपाळवरील संकट अजूनही गेले नाही. नेपाळवर संकट कायम आहे. अमेरिकेला नेपाळला मदत करण्यास तयार आहे. जवळपास 30 देशांचे नागरिक अमेरिकेत अडकली आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us