‘डोक्यावर बंदूक ठेऊन ट्रिगर दाबलं आणि जोरजोराने हसले’, आधी रोसेन, आता नाजनीन, इराणच्या तुरुंगातील छळाच्या घटना

| Updated on: Mar 21, 2021 | 9:13 PM

संयुक्त राष्ट्रापासून अनेक आंतरराष्ट्रीय संघटना मानवाधिकारासाठी काम करतात. मात्र, इराणमध्ये आजही तुरुंगातील कैद्यांचा प्रचंड छळ होत असल्याचं उघड झालंय.

‘डोक्यावर बंदूक ठेऊन ट्रिगर दाबलं आणि जोरजोराने हसले’, आधी रोसेन, आता नाजनीन, इराणच्या तुरुंगातील छळाच्या घटना
Follow us on

तेहरान : अगदी 21 व्या शतकात मानवाधिकारांना अधिक महत्त्व दिलं जातं. यासाठी अगदी संयुक्त राष्ट्रापासून अनेक आंतरराष्ट्रीय संघटना काम करतात. मात्र, इराणमध्ये आजही तुरुंगातील कैद्यांचा प्रचंड छळ होत असल्याचं उघड झालंय. इराणमधील तुरुंगात न्यूयॉर्कचे (New York) रहिवासी बॅरी रोसेन (Barry Rosen) यांच्या डोक्यावर बंदूक ठेवण्यात आली आणि त्यांना 10 सेकंदात ते गुप्तहेर असल्याचं कबूल करत स्वाक्षरी करण्यास सांगण्यात आलं. तसेच स्वाक्षरी न केल्यास गोळी झाडून हत्या करण्याची धमकी देण्यात आली (Torture story of American citizen Barry Rosen in Iran jail after Iran revolution).

डोक्यावर बंदूक ठेऊन खोटी कबुली देण्यास सांगितल्यानंतर बॅरी रोसेन हेही गोंधळात सापडले. त्यांच्यासमोर दोन मार्ग होते. एक तर ते म्हणत आहेत तसं सही करुन आपल्याच देशासाठी देशद्रोही होणं आणि दुसरं आपल्या लहान मुलांना सोडून मृत्यू स्वीकारणं. 77 वर्षीय बॅरी यांनी आपल्या मुलांना वडिलांची सावली देण्याचा निर्णय घेतला आणि 5 पर्यंत मोजल्यानंतर खोट्या कबूलनाम्यावर सही केली.

‘खोट्या कबुलनाम्यावर सही केल्यानं स्वतःची खूप लाज वाटते’

दबावाला बळी पडून त्या खोट्या कबुलनाम्यावर सही केल्यानं स्वतःची खूप लाज वाटते अशीही भावना त्यांनी व्यक्त केलीय. त्यांनी रिचर्ड रॅटक्लिफ यांच्यासोबत केलेल्या चर्चेत ही गोष्ट सांगितली. रिचर्ड यांची पत्नी नाजनीन जघारी-रॅटक्लिफ यांनाही इराण सरकारने गुप्तहेर असल्याचा आरोप करत तुरुंगात डांबलं होतं.

नाजनीनसाठी रिचर्ड यांची झुंज सुरु

बॅरीने 1979 मधील इराणमधील क्रांतीनंतर तब्बल 444 दिवस तुरुंगात घालवले. त्यांनी सांगितलं, “तुरुंगात माझ्यासोबत जो छळ झाला तो मी कधीही विसरु शकत नाही. मला माहिती आहे की नाजनीन यांच्यासोबत तुरुंगात जो छळ झाला त्यामुळे त्यांच्या पतीसोबत आणि मुलीसोबतच्या नात्यावरही परिणाम होईल. नाजनीनने माझ्यापेक्षा कितीतरी अधिक छळ सहन केलाय. त्यांच्या सुटकेसाठी त्यांचे पती रिचर्डकडून सुरु असलेले प्रयत्न धाडसी आहेत.”

रिचर्डने बॅरी यांनी दिलेल्या भावनिक आधारासाठी त्यांचे आभार मानले आहेत. ते म्हणाले, “हा आधार माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. मी बॅरी आणि अन्य कैद्यांच्या कुटुंबासोबत आपला अनुभव शेअर केलाय.” 4 नोव्हेंबर 1979 रोजी बॅरीसह 66 अमेरिकन नागरिकांना इराणमधील आंदोलकांनी कैद केलं होतं. यालाच ‘इराण बंधक संकट’ या नावाने ओळखलं जातं. इतक्या वर्षांनी आता इराणच्या तुरुंगातील या छळाच्या घटना जगासमोर येत आहेत.

हेही वाचा :

धक्कादायक, लँडिंगआधी काही अंतरावर विमान डोंगराला धडकलं, प्रवास करणाऱ्या सर्व 119 जणांचा मृत्यू

इराणचे संरक्षण मंत्री तब्बल 40 वर्षानंतर भारत दौऱ्यावर, पाकिस्तान चीनची डोकेदुखी वाढणार?

दिल्ली बाँबस्फोटाचं इराण कनेक्शन? कासिम सुलेमानींच्या हत्येचा बदला घेण्यासाठी स्फोट? वाचा सविस्तर

व्हिडीओ पाहा :

Torture story of American citizen Barry Rosen in Iran jail after Iran revolution