Train Hijack : BLA चा नवीन दावा, पाकिस्तान पडला उघडा! 214 सैनिकांचा खात्मा, सत्य काय?

BLA Train Hijack : जाफर एक्सप्रेस अपहरणप्रकरणात भारतासह अफगाणिस्तानवर खापर फोडणारा पाकिस्तान उघडा नागडा झाला. या देशावर मोठी नामुष्की ओढावली आहे. हा पाकिस्तानमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला असल्याचे मानले जात आहे.

Train Hijack : BLA चा नवीन दावा, पाकिस्तान पडला उघडा! 214 सैनिकांचा खात्मा, सत्य काय?
ट्रेन हायजॅक प्रकरणात पाकिस्तान उघडा
Image Credit source: गुगल
| Updated on: Mar 15, 2025 | 9:53 AM

पाकिस्तानमध्ये 11 मार्च रोजी जाफर एक्सप्रेसचे अपहरण झाले होते. या घटनेला चार दिवस उलटले. पण पाकिस्तान नेहमीसारखे खोटे बोलत आहे. अफगाणिस्तानसह भारतावर खापर फोडत अनेक तथ्य आणि सत्य लपवण्याचा प्रयत्न करत आहे. बलूच लोकांवरील विशेषतः महिला आणि लहान मुलांवरील अत्याचाराची सीमा पाकिस्तानी लष्कराने गाठली आहे. त्याचाच बदला BLA बलूच लिबरेशन आर्मीने घेतला आहे. बंडखोरांनी प्रवाशांना लक्ष्य केल्याचा कांगावा करणारा पाकिस्तान बीएलएनेच उघडा पाडला. BLA ने केलेल्या दाव्यानुसार, त्यांनी ओलिस ठेवलेल्या 214 जवानांचा खात्मा केला आहे. पाकिस्तान सरकारचे नाक कापल्याने ते या गोष्टी लपवत असल्याचा दावा सुद्धा बलूच आर्मीने केला आहे.

BLA ने त्यांचे राजकीय कैदी, त्यांचे नेते, काही लोकांना सोडण्यासाठी ही ट्रेन हायजॅक केली होती. बंडखोरांचे मुख्य प्रवक्ते जीयंद बलूच यांनी ओलीस ठेवलेल्या सैनिकांच्या बदल्यात त्यांचे राजकीय कैदी सोडण्याची मागणी पाककडे केली होती. पण त्यांनी लक्ष न दिल्याने ओलिसांना ठार केल्याचा दावा केला आहे.

पाक सेनेचा दावा काय?

तर दुसरीकडे पाक लष्कराने आता सारवासारव सुरू केली आहे. DG ISPR ने पाकिस्तानमधील ओलिस सुटकेचा एक व्हिडिओ शेअर करत सर्व ओलिसांची सुटका केल्याचे जाहीर केले. लष्कराच्या प्रवक्त्यानुसार, एकूण 354 ओलिसांची सुटका करण्यात आली. तर 37 प्रवाशी जखमी झाले. तर 26 ओलिसांचा मृत्यू झाला. त्यात 18 सैनिक होते. तर बीएलएचे अनेक बंडखोर ठार केल्याचा दावा करण्यात आला होता. दुसरीकडे बीएलएने या सर्व ऑपरेशनचा खरा व्हिडिओ समोर आणण्याचे आव्हान पाकिस्तान सरकारला दिले आहे.

पाकिस्तानचा कांगावा

दरम्यान पाकिस्तानने या हल्ल्यामागे भारत आणि अफगाणिस्तान यांचा हात असल्याचा कांगावा केला आहे. पंतप्रधान शरीफ यांचे सल्लागार आणि परराष्ट्र प्रवक्त्याने तालिबान आणि भारत या हल्ल्यामागे असल्याचा आरोप केला. त्यांच्या या दाव्याला अर्थात जागतिक मंचावर कोणीच भीक घातले नाही. तालिबानने आरोप प्रत्यारोप करण्याऐवजी पाकिस्तानने सुरक्षेवर लक्ष देण्याचा सल्ला दिला. तर भारताने पण शरीफ सरकारला फटकारले आहे.