मोठी बातमी! अमेरिकेत हाहाकार, ट्रम्प यांच्या एका चुकीमुळे मोठे नुकसान

गेल्या सात दिवसांपासून अमेरिका इस्त्रायलच्या मदतीने इराणवर हल्ला करत आहे. हे युद्ध आता चांगलेच पेटले आहे. दरम्यान, अमेरिकेचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

मोठी बातमी! अमेरिकेत हाहाकार, ट्रम्प यांच्या एका चुकीमुळे मोठे नुकसान
Trump
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Mar 06, 2026 | 5:41 PM

मिडिल ईस्ट आणि वेस्ट आशियाच्या आकाशात गेल्या सात दिवसांपासून फायटर जेट्स घिरट्या घालत आहेत. अमेरिका आणि इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानंतर आता या युद्धाचा सर्वात मोठा फटका स्वतः सुपरपावर असलेल्या अमेरिकेला बसू लागला आहे. अमेरिकेने इस्त्रायलला मदत करत इराणवर हल्ला केला. इराण देखील या हल्ल्यानंतर शांत बसला नाही. त्यांनी देखील दोन्ही देशांना जशास तसे उत्तर दिले आहे. पण आता राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या एका रणनीतीमुळे आज अमेरिका अडचणीत सापडला आहे.

तज्ज्ञांचे मत आहे की, ट्रंप यांनी कमी किमतीत स्ट्रेटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह (SPR) भरून घेण्याची संधी गमावली. जेव्हा तेलाच्या किमती कमी होत्या, तेव्हा ट्रंप प्रशासनाने हा साठा भरला नाही आणि आता इराणशी युद्ध सुरू झाल्याने इमर्जन्सी स्थितीसाठी पुरेसा तेल साठा उपलब्ध नाही. फायनान्शिअल टाइम्सच्या एका अहवालानुसार, अमेरिका सध्या मोठ्या ‘ऑइल शॉक’च्या उंबरठ्यावर उभा आहे. सामान्य जनतेवर याचा परिणाम पेट्रोलच्या वाढत्या किमतींमध्ये दिसू लागला आहे.

ट्रंपच्या निष्काळजीपणामुळे अमेरिका अडचणीत

अमेरिकेचा स्ट्रेटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह (SPR) १९७४ मध्ये तयार करण्यात आला होता. त्याचा उद्देश कोणत्याही मोठ्या युद्ध किंवा संकटाच्या वेळी देशात तेल पुरवठा सुरळीत ठेवणे हा होता. जो बायडन यांच्या कार्यकाळात रशिया-युक्रेन युद्धाच्या वेळी पेट्रोल किंमती नियंत्रित करण्यासाठी या रिझर्व्हमधून मोठ्या प्रमाणात तेल काढले गेले. ट्रंप यांनी सत्तेत आल्यावर हा रिझर्व्ह पुन्हा पूर्ण भरून काढण्याचे वचन दिले होते. पण अहवाल सांगतात की, हे वचन फक्त कागदावरच राहिले. सध्या अमेरिकेचा हा साठा त्याच्या एकूण क्षमतेपैकी (७१.४ कोटी बैरल) फक्त ४१.५ कोटी बॅरल इतका आहे. हा साठा अमेरिकेच्या गरजेनुसार फक्त २० दिवसांसाठी पुरेल.

इराण युद्धाने कसा बिघडवला खेळ?

इराण आणि अमेरिकेमधील वाढत्या तणावाने जागतिक तेल बाजार हादरवला आहे. तेहरानने खाडी देशांच्या ऊर्जा पायाभूत सुविधांवर प्रत्युत्तर हल्ले केले आहेत, ज्यामुळे पुरवठा पूर्णपणे थांबण्याची भीती आहे. सर्वात मोठी चिंता हॉर्मुझ जलडमरूमध्य (Strait of Hormuz) बद्दल आहे. जगातील २० टक्के तेल येथूनून जाते. जर इराणने हा मार्ग बंद केला तर अमेरिकेला आपला साठा भरून घेण्याचा कोणताही मार्ग उरणार नाही. टेक्सास विद्यापीठाचे प्राध्यापक ह्यूग डॅगल यांच्या मते, ट्रंप प्रशासनाने कमी किमतीत साठा भरून घेण्याची संधी सोडली. आता युद्धाच्या वातावरणात किमती खूप वाढल्या आहेत, त्यामुळे रिझर्व्ह भरणे आर्थिकदृष्ट्या खूप महागडे ठरेल.

अमेरिकेला २० अब्ज डॉलरची गरज

यूएस डिपार्टमेंट ऑफ एनर्जीच्या मते, हा रिकामा साठा पुन्हा भरून काढण्यासाठी सुमारे २० अब्ज डॉलर (मोठी रक्कम) लागेल. टेक्सास आणि लुइसियानामधील अंडरग्राउंड स्टोरेज सेंटर्समध्ये देखभाल कामेही प्रलंबित आहेत. निधीच्या कमतरतेमुळे तेल रिफिलिंगचे काम मंदावले आहे.

Follow Us