India-Pakistan War : काल रात्री या देशाचा प्रमुख पाकिस्तानच्या सलामतीसाठी करत होता प्रार्थना

India-Pakistan War : बदला घेण्यासाठी चवताळलेल्या पाकिस्तानचा प्रत्येक वार वाया जात आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर पाकिस्तानची मोठी नाचक्की झाली आहे. पाकिस्तानने कुठलीही नापाक हरकत केली, की त्याला त्यापेक्षा डबल जोरदार प्रत्युत्तर द्यायच ही रणनिती भारताने अवलंबली आहे.

India-Pakistan War : काल रात्री या देशाचा प्रमुख पाकिस्तानच्या सलामतीसाठी करत होता प्रार्थना
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 09, 2025 | 3:30 PM

भारत-पाकिस्तान संघर्षात अनेक देशांनी संतुलित भूमिका घेतली आहे. रशिया आणि इस्रायल या पारंपारिक मित्रांनी नेहमीप्रमाणे भारताला साथ दिली आहे. फक्त शब्दांपुरता त्यांचा पाठिंबा मर्यादीत नाही. त्यांनी भारताला दिलेली शस्त्रास्त्र युद्धाच्या मैदानात निर्णायक ठरली आहेत. त्यामुळेच पाकिस्तानच मनोधैर्य सुद्धा खच्ची झालं आहे. बदला घेण्यासाठी चवताळलेल्या पाकिस्तानचा प्रत्येक वार वाया जात आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर पाकिस्तानची मोठी नाचक्की झाली आहे. पाकिस्तानने कुठलीही नापाक हरकत केली, की त्याला त्यापेक्षा डबल जोरदार प्रत्युत्तर द्यायच ही रणनिती भारताने अवलंबली आहे. भारत-पाकिस्तान संघर्षात जगातील काही देशांनी उघडपणे भारताची बाजू घेतलेली नाही. पण संतुलित प्रतिक्रिया दिली आहे.

आखाती मुस्लिम देशांमध्ये सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, कतार तसच दुसऱ्याबाजूने इराण इस्लामिक जगतातील हे मोठे देश आहेत. भारताशी या सर्व राष्ट्रांशी सलोख्याचे संबंध राहिले आहेत. पाकिस्तानचे सुद्धा या देशांशी सुरुवातीपासून चांगले संबंध होते. पण सध्याच्या बदलेल्या राजकीय, आर्थिक स्थितीत या देशांशी भारताची चांगली मैत्री आहे. या देशांनी उघडपणे भारताच समर्थन केलं नाही. पण कूटनितीक मार्गाने समाधान काढण्याचा सल्ला दिला. फक्त एक देश तुर्की त्याने पाकिस्तानच जाहीरपणे समर्थन केलंआहे.

एकाच गोष्टीसाठी पाकिस्तानच समर्थन

तुर्की याआधी काश्मीर मुद्यावर पाकिस्तानच्या भूमिकेच समर्थन केलं होतं. इस्लाम आणि धर्म याच मुद्यावरुन तुर्की पाकिस्तानची साथ देत आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतरही तुर्की पाकिस्तानच्या बाजूने उभा राहिला आहे. तुर्कीचे राष्ट्रपती एर्दोगन पाकिस्तानप्रती संवेदना व्यक्त करत आहेत. दहशतवाद्यांना खुलेआम श्रद्धांजली अर्पण करतायत.

‘भावासारखे पाकिस्तानी लोक….’

“मिसाइल हल्ल्यामुळे भारत-पाकिस्तानमधील तणाव व्यापक संघर्षात बदलू शकतो. यामध्ये मोठ्या संख्येने नागरिक शहीद होतील. याची आम्हाला चिंता आहे” असं एर्दोगन यांनी सोशल मीडिया साइट एक्सवर म्हटलं आहे. “या हल्ल्यात प्राण गमावणाऱ्या आपल्या भावांसाठी अल्लाहकडे प्रार्थना करतो. मी पुन्हा एकदा भावासारखे पाकिस्तानी लोक आणि पाकिस्तानप्रती आपली संवेदना व्यक्त करतो” असं एर्दोगन यांनी एक्सवर म्हटलं होतं.