तुम्ही सुंदर आहात, पण स्मोकिंग सोडा… इटलीच्या महिला पंतप्रधानांना कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांनी दिला सल्ला? तो व्हिडिओ व्हायरल

giorgia meloni smoking : इजिप्तमधील परिषदेमध्ये सर्व नेते थोडी मजाक मस्ती करताना देखील दिसले. शिखर परिषदेदरम्यान, एर्दोगानने मेलोनीला यांना मोठा सल्ला दिला आहे, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

तुम्ही सुंदर आहात, पण स्मोकिंग सोडा... इटलीच्या महिला पंतप्रधानांना कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांनी दिला सल्ला? तो व्हिडिओ व्हायरल
giorgia meloni
| Updated on: Oct 14, 2025 | 11:42 AM

इजिप्तच्या शर्म-अल शेख येथे झालेल्या एका महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय शांतता शिखर परिषदेदरम्यान तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यातील एक संवाद व्हायरल होताना दिसतोय. या परिषदेमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे जॉर्जिया मेलोनी यांच्या सुंदरतेचे काैतुक करताना दिसले. हमास-इस्त्रायल यांच्यातील शांतता करारानंतर या परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेला अनेक देशांनी हजेरी लावली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील या परिषदेचे आमंत्रण होते. मात्र, स्वत: परिषदेला जाणे मोदी यांनी टाळून आपल्या दूताला पाठवले. डोनाल्ड ट्रम्प यांनी या परिषदेमध्ये नरेंद्र मोदी माझे चांगले मित्र असून ते चांगले काम करत असल्याचे म्हटले.

या शिखर परिषदेमध्ये सर्व नेते थोडी मजाक मस्ती करताना देखील दिसले. शिखर परिषदेदरम्यान, एर्दोगानने मेलोनीला यांना विनोदाने म्हटले की, तुम्ही छान दिसता, पण मला तुमचे धूम्रपान सोडायला लावावे लागेल… आता हाच व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. यादरम्यान फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे यादरम्यान तिथेच दिसत असून एर्दोगान यांचे बोलणे ऐकून ते जोरात हसण्यास सुरूवात करतात.

हेच नाही तर इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी म्हटले की, हे अशक्य आहे. पुढे बोलताना मेलोनी या चेहऱ्यावर एक स्मित हास्य देत म्हणाल्या की, मला माहित आहे… पण जर मी धूम्रपान सोडले तर मी कदाचित कमी सामाजिक बनेल. मला कोणालाही मारायचे नाहीये. एर्दोगान यानी म्हटले की, तुर्की सध्या धूम्रपान विरोधात काम करत आहे. यामुळे मी कुठेही जातो, त्यावेळी धूम्रपान विरोधात प्रचार करत असतो.

इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू हे या शिखर परिषदेने अनुपस्थित राहिल्याने विविध चर्चा रंगताना दिसल्या. मागील काही दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार मिळाला याकरिता ते आग्रही दिसले. मात्र, अचानक त्यांनी या परिषदेला अनुपस्थिती लावल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या. बेंजामिन नेतान्याहू हे नाराज असल्याचे देखील बोलले जात आहे.