डोनाल्ड ट्रम्प यांच्या पायाखालची जमीन सरकली, UAE मध्ये धक्कादायक मागणी; इराणचा मोठा विजय?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जबर धक्का बसू शकतो. संयुक्त अरब अमिरातीमध्ये आता अमेरिकेविषयी वेगळा विचार केला जात आहे. या युद्धात त्यांना मोठा फटका बसू शकतो.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या पायाखालची जमीन सरकली, UAE मध्ये धक्कादायक मागणी; इराणचा मोठा विजय?
donald trump
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 20, 2026 | 7:30 PM

Donald Trump An UAE : होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिकेन नौदलाने नाकेबंदी चालू केली आहे. तर दुसरीकडे इराणनेही अमेरिकेला प्रत्युत्तर म्हणून ही सामुद्रधुनी पूर्णपणे बंद केली आहे. दोन्ही देशांत आता नव्या संघर्षांचा वणवा पेटू शकतो, असा अंदाज लावला जात आहे. या युद्धावर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी इस्लामाबाद येथे दोन्ही देशांत चर्चेची दुसरी फेरी होण्याची शक्यता आहे. असे असतानाच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात मोठा धक्का बसला आहे. सौदी अरेबियाच्या भूमिकेमुळे आता अमेरिकेच्या अडचणी वाढू शकतात.

संयुक्त अरब अमिराती नेमकं काय करतेय?

संयुक्त अरब अमिराती म्हणजेच यूएईतील मुख्य रणनीतीकार आणि विश्लेषख अब्दुल खालिक अब्दुल्ला यांनी आता आम्हाला अमेरिकेची गरज नाही, असे थेट सांगून टाकले आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये अमेरिकेची काही लष्करी तळं आहेत. या ठिकाणी अमेरिकेने आपली शस्त्रं तसेच लष्करी जवान तैनात केलेले आहेत. परंतु आता आम्ही आमचे संरक्षण स्वत: करू शकतो. आम्हाला अमेरिकेची गरज नाही, अशा आशयाचे मत अब्दुल खालिक अब्दुल्ला यांनी व्यक्त केले आहे.

हे तर आमच्यासाठी ओझे

अमेरिकेने आपले सैन्य आणि शस्त्र आमच्या देशातून घेऊ जावे. लष्करी तळ बंद करावेत, अशीही मागणी यूएईमध्ये केली जात आहे. अब्दुल खालिक अब्दुल्ला यांनी सोशल मीडियावर हे मत व्यक्त केले आहे. तसेच रॉयटर्स या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेशी बातचित करताना त्यांनी या भूमिकेचा पुनरुच्चार केला. अमेरिकन लष्करी तळ आता आमच्यासाठी रणनीतीविषयक फायदा ठरण्याऐवजी एका प्रकारचे ओझे झाले आहे, असे ते म्हणाले.

आम्हाला अमेरिकेची फक्त…

इराणने आमच्यावर हल्ले केले. त्यावेळी आम्ही इराणचे 2800 पेक्षा जास्त ड्रोन्स आणि क्षेपणास्त्र नष्ट केले. त्यामुळे आम्ही स्वत: आमचे रक्षण करू शकतो, असा दावाही त्यांनी केला आहे. आम्हाला अमेरिकेची आधुनिक शस्त्रं आणि संरक्षण प्रणाली हवी आहे. त्यांचे लष्करी तळ नको आहेत, असेही ते म्हणाले. दरम्यान, आता भविष्यात अमेरिका यूएईमधील आपले लष्करी तळ हलवणार का? यूएईची ही भूमिका इराणसाठी पुरक ठरणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us