Udaypur Murder: नुपूर शर्माच्या ट्विटबद्दल संतप्त झाले पण मग आता हिंदू टेलरच्या हत्येवर गप्प बसले? मुस्लिम देशात नेमके पडसाद काय? मोदींबद्दलही टिप्पणी?

ज्या टेलरची ज्या दोघांकडून हत्या करण्यात आली त्या दोघांची नावं मोहम्मद रियाज आणि गौस मोहम्मद अशी आहेत. या घटना घडल्यानंतर सोशल मीडियावर प्रचंड विरोधात त्यांच्यावर टीका होत आहे. मुस्लीम राष्ट्रातील प्रसारमाध्यमांनीही त्याची दखल घेऊन भारतीय जातीयतेबद्दल त्यांनी भाष्य केले आहे.

Udaypur Murder: नुपूर शर्माच्या ट्विटबद्दल संतप्त झाले पण मग आता हिंदू टेलरच्या हत्येवर गप्प बसले? मुस्लिम देशात नेमके पडसाद काय? मोदींबद्दलही टिप्पणी?
महादेव कांबळे

|

Jun 29, 2022 | 8:20 PM

नवी दिल्लीः उदयपूरमध्ये एका टेलरची गळा चिरून हत्या (Udaipur tailor Murder)  झाली आणि सगळा देश हादरला. त्यानंतर भारतात या घटनेबद्दल तीव्र प्रतिक्रियाही उमटल्या. या घटनेबद्दल ज्या प्रकारे भारतात प्रतिक्रिया उमटल्या त्या प्रमाणाचे आंतरराष्ट्रीय पातळीवर आणि तेही मुस्लिमबहूल राष्ट्रातूनही (Muslim nation) याबद्दल जातीय आणि धार्मिकतेचा (Religious) मुद्दा घेऊन त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या आहेत. पाकिस्तान, तुर्कस्तान, बांग्लादेया मुस्लिम राष्ट्रांतून या घटनेबद्दलही बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत.

या घटनेचा संदर्भ देत हिंदूबहूल राष्ट्र म्हणून असणाऱ्या भारतातही जातीय दंगली भडकू शकतात असंही लिहिले गेले आहे.

राजस्थानची प्रतिमा आणि भारत

राजस्थानमधील उदयपूरमध्ये मंगळवारी दोघां जणांनी कन्हैयालाल या टेलरची दुकानात घुसून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे राज्याती परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली आहे. प्रेषित मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ मृताच्या मुलाने एक पोस्ट केली होती, आणि त्यामुळेच मुलाच्या बापाची म्हणजेच त्या टेलरची हत्या करण्यात आली.

ज्या टेलरची ज्या दोघांकडून हत्या करण्यात आली त्या दोघांची नावं मोहम्मद रियाज आणि गौस मोहम्मद अशी आहेत. या घटना घडल्यानंतर सोशल मीडियावर प्रचंड विरोधात त्यांच्यावर टीका होत आहे. मुस्लीम राष्ट्रातील प्रसारमाध्यमांनीही त्याची दखल घेऊन भारतीय जातीयतेबद्दल त्यांनी भाष्य केले आहे.

पाकिस्तान

पाकिस्तानातील वृत्तपत्र डॉन या वृत्तसंस्थे एएफपीच्या वृत्तानुसार हे वृत्त देण्यात आले आहे. उदयपूरची घटना ही पैगंबर यांच्याविषयीच्या पोस्टमुळे झालेल्या वादाचा परिणाम असल्याचे वृत्त देण्यात आले आहे.

डॉनच्या वृत्तसंस्थेने असं वृत्त दिले आहे की, उजव्या विचारसरणीच्या भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी एका टीव्ही चर्चेत सहभागी होत पैगंबरावर अपमानास्पद टीकाटिप्पणी केली होती. त्यानंतर मुस्लिम समाजासह मुस्लिम राष्ट्रातूनही त्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यांच्या या वक्तव्याचा भारतात आणि परदेशात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. नुपूर शर्माच्या या वक्तव्यामुळे उदयपूरमध्ये हिंसाचार भडकला असल्याचे सांगण्यात आले.
या वृ्त्तातून राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या ट्विटचाही संदर्भ देण्यात आला आहे. तर पत्रकार राणा अयुब यांच्या ट्विटचा संदर्भ देत या झालेल्या हत्येबद्दल रानटी आणि असंस्कृतपणाचा हल्ला झाल्याचे म्हटले आहे.

तुर्की

तर तुर्कस्तानमधील टीआरटी वर्ल्डने या घटनेबद्दल निषेध व्यक्त करत या घटनेमुळे हिंदूबहुल राष्ट्रामधील सामाजिक वातावरणावर याचा परिणाम होईल असंही म्हटलं आहे. तर राजस्थानमधील उदयपूरमधील अनेक ठिकाणी आता जमाव बंदीचे आदेश देण्यात आले असून जातीय दंगली भडकण्याची शक्यता आहे असं म्हटलं आहे.
टीआरटी वर्ल्डने या घटनेसंदर्भात सविस्तर वृत्त छापले आहे. त्यांनी या घटनेचे वर्णन करत सांगितले आहे की, टेलर कन्हैयालाल यांना मारण्यासाठी साध्या गिऱ्हाईकांप्रमाणे दोघे जण दुकानात आले आणि त्यांची गळा चिरून हत्या केली.

टीआरटी वर्ल्डने तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते साकेत गोखले यांच्या ट्विटचा संदर्भ दिला आहे. झारखंडमधील मॉब लिंचिंगच्या दोषींना ज्या प्रमाणे भाजपच्या एका केंद्रीय मंत्र्याने हार घातला होता तसा कोणीही त्यांना हार घालणार नाही, त्यांना कोणत्याही पक्षात त्यांना घेणार नाही असं वृत्त देत त्यांनी भाजपवर टीका करत भाजपने ज्या प्रमाणे कठुआ बलात्कारींसाठी जशी रॅली काढली होती, तशीच रॅली त्यांच्यासाठी काढा असंही त्यामध्ये दिले आहे.

कतार

कतारमध्येही अलजझीरानेही याबद्दल वृत्त दिले आहे. त्यामध्ये त्यांनी या संपूर्ण घटनेची माहिती दिली आहे. आणि या लेखाच्या शेवटी लिहिले आहे की, टीकाकार मोदींच्या भाजपवर मुस्लिम समाजाला उपेक्षित ठेवण्याचे आणि फुटीचे राजकारण करत असल्याचा आरोप करतात. गेल्या महिन्यातच काँग्रेसशासित राजस्थानमधील जोधपूरमध्ये हिंदू आणि मुस्लिमांमध्ये तणावाचे वातावरण पसरले होते.अल जझीराने 2017 मधील एका घटनेचाही उल्लेख केला आहे ज्यात एका मुस्लिम मजुराची हत्या करून त्याला जाळण्यात आले होते.

मलेशिया

तर मलेशियातील वृत्तपत्र मलय मेलने या घटनेला भारतातील धार्मिक हिंसाचार आणि भारतीय इतिहास याचा संदर्भ जोडला आहे. यामध्ये लिहिले आहे भारतात धार्मिक हिंसाचार हा काही नवीन पण त्याचा इतिहास भयंकर आहे. 1947 मध्ये ब्रिटीश वसाहतवादापासून ते देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारतातील धार्मिक हिंसाचारात हजारो नागरिकांचा बळी गेल्याचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे. यामध्ये असे छापण्यात आले असले तरी भारतातील एकूण लोकसंख्येपैकी 13 टक्के नागरिक हे मुस्लिम आहेत. 2014 मध्ये मोदी सत्तेत आल्यापासून प्रथम हिंदू याच तत्वानुसार काम केले जात आहे. त्यामुळेच भारतात जातीय तणाव असल्याचे म्हटले आहे.

संयुक्त अरब अमिराती

युनायटेड अरब अमिराती वृत्तपत्र खलीज टाईम्सने या घटनेची माहिती देत ​​लिहिले आहे की, टेलरच्या हत्येनंतर उदयपूरमधील परिस्थिती तणावपूर्ण आहे. ‘प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, कन्हैयालाल नावाच्या व्यक्तीला मंगळवारी त्यांच्या टेलरच्या दुकानात दोघांनी घुसून त्यांची हत्या केली होती, आणि कहर म्हणजे त्याचा व्हिडीओही बनवण्यात आला होता. नंतर या दोघांनी दुसऱ्या व्हिडिओमध्ये हत्येची जबाबदारी स्वीकारली आणि त्याच व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी दिली आहे असंही म्हटले आहे.

बहरीन

बहरीन या मुस्लिम देशाचे पत्रकार आणि अरब व्यवहार तज्ज्ञ अमजद ताहा यांनीही उदयपूर हत्येवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. उदयपूरमध्ये जे घडले त्याचा निषेध केला पाहिजे आणि दहशतवादाविरुद्धच्या लढाईत सर्वांनी भारताला साथ दिली पाहिजे, असे त्यांनी ट्विटरवरील आपल्या एका ट्विटमध्ये म्हटले आहे.


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें