डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा! रशिया-युक्रेन युद्धात…जगाला जे हवं तेच घडलं
डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया आणि युक्रेन यांच्यात एनर्जी सिझफायर झाल्याचा दावा केलाय. या निर्णयाबाबत अधिक माहिती समोर आलेली नाही. ट्रम्प यांनी रविवारी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर यासंदर्भात पोस्ट केली.

Russia Ukraine War Update : गेल्या अनेक महिन्यांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध शुरू आहे. या युद्धामुळे आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला. रशिया आणि युक्रेन यांचे प्रचंड नुकसान झाले. हे युद्ध थांबावे, नरसंहार थांबावा यासाठी जागतिक पातळीवर बरेच प्रयत्न झाले. अमेरिकेनेही यात सक्रीयपणे सहभाग घेतला. आता याच प्रयत्नांना काहीसे यश आले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया आणि युक्रेन यांच्यात ऊर्जा क्षेत्रातील हल्ले थांबवण्याबाबत सहमती झाल्याचा दावा केला आहे. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही देशांदरम्यान तत्काळ प्रभावाने ‘एनर्जी सीजफायर’ लागू झाला आहे.
एनर्जी सिझफायर लागू, ट्रम्प यांची घोषणा
डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया आणि युक्रेन यांच्यात एनर्जी सिझफायर झाल्याचा दावा केलाय. या निर्णयाबाबत अधिक माहिती समोर आलेली नाही. ट्रम्प यांनी रविवारी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर यासंदर्भात पोस्ट केली. रशिया आणि युक्रेनने एकमेकांच्या ऊर्जा पायाभूत सुविधांवर हल्ले न करण्याचे मान्य केल्याचे त्यांनी या पोस्टमध्ये सांगितले आहे.
झेलेन्स्की आणि ट्रम्प यांच्यात तणाव वाढला
अमेरिकेत मध्यावधी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फटका बसू नये यासाठी अमेरिकेतील इंधनाच्या किमती कमी व्हाव्यात यासाठी ट्रम्प प्रयत्न करत आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून ट्रम्प यांनी रशियाकडून विकल्या जाणाऱ्या डिझेलवरील निर्बंध काहीसे शिथील केले जातील, अशी भूमिका घेतली होती. त्यानंतर मात्र ट्रम्प आणि युक्रेनचे प्रमुख वोलोडिमीर झेलेन्सी यांच्यात तणाव निर्माण झाला. ट्रम्प यांनी शुक्रवारी याबाबतची घोषणा केली होती.
रशिया, युक्रेन यांची नेमकी भूमिका काय?
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची घोषणा केल्यानंतर रशिया किंवा युक्रेन यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे या दोन्ही देशांची भूमिका नेमकी काय असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ट्रम्प यांच्या या घोषणेबाबत दोन्ही देशांनी सकारात्मक पवित्रा दाखवला तर कदाचित भविष्यात युद्ध थांब शकते.