
Russia And Ukraine War : गेल्या चार वर्षांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध चालू आहे. हे युद्ध थांबण्याऐवजी त्याचा रोजच भडका उडालेला पाहायला मिळतोय. रशिया युक्रेनच्या काही महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ला करून तो प्रदेश बळकावण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे युक्रेनदेखील रशियावर जमेल त्या पद्धतीने हल्ले करत असून रशियाच्या लष्कराला निष्प्रभ करण्यासाठी झगडत आहे. हे युद्ध थांबावे यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रयत्न करत आहेत. त्यांनी रशियाचे प्रमुख व्लादिमीर पुतिन आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांच्याशी चर्चा केलेली आहे. अजूनही ही चर्चा चालूच आहे. दरम्यान, ट्रम्प रशिया आणइ युक्रेन यांच्यातील युद्ध लवकरच समाप्त होणार आहे, असा दावा करत आहेत. पण या दाव्याला फोल ठरवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला असून या हल्ल्यात रशियाची प्रभावी आणि बलशाली अशी पानबुडी नेस्तनाबूत करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार युक्रेनने रशियाची एक मोठी पाणबुडी नेस्तनाबूत केली आहे. युक्रेनने ड्रोनच्या माध्यमातून हा हल्ला केला आहे. विशेष म्हणजे या हल्ल्याचा व्हिडीओदेखील युक्रेनने जारी केला आहे. युक्रेनच्या दाव्यानुसार नोवोरोसिस्क बंदरावर रशियाचे हे जहाज उभे होते. या ठिकाणी रशियाच्या अनेक पाणबु्ड्या असतात. याच पाणबुडीवर युक्रेनने ड्रोनच्या माध्यमातून हल्ला केला. युक्रेनची सुरक्षा एजन्सी सिक्योरिटी सर्व्हिस ऑफ युक्रेन अर्थात एसबीयूच्या म्हणण्यानुसार सी बेबी नावाच्या अंडरवॉटर ड्रोनच्या मदतीने हा हल्ला करण्यात आला. हा हल्ला एवढा अचुक आणि भीषण होता की यामध्ये रशियाच्या पाणबुडीचे मोठे नुकसान झाले आहे. आता ती कोणतेही काम करू शकणार नाही, असा दावा रशियाने केला आहे.
एसबीयूने दिलेल्या माहितीनुसार रशियाच्या या पाणबुडीवर चार Kalibr नावाचे क्रुझ मिसाईल लॉन्चर्स लावण्यात आलेले होते. याच मिसाईल लॉन्चर्सच्या मदतीने रशिया युक्रेनच्या महत्त्वाच्या शहरांवर हल्ले करायचा. आता मात्र या पाणबुडीला मोठी इजा झाली आहे. त्यामुळे भविष्यात रशिया या हल्ल्याचा बदला घेणार का? रशियाच प्रत्युत्तर कसे असेल? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.