भारताला ज्याची भीती तेच घडले, अमेरिकेचा मोठा झटका, थेट पाकिस्तानसोबत..

भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध सुधारली आहेत. अमेरिकेला आता भारतासोबत संबंध सुधारायची आहेत. त्याकरिता अमेरिकेकडून प्रयत्न केली जात आहेत. यादरम्यानच आता अमेरिकेने पाकिस्तानसोबतच्या संबंधांवर मोठे भाष्य केले.

भारताला ज्याची भीती तेच घडले, अमेरिकेचा मोठा झटका, थेट पाकिस्तानसोबत..
Marco Rubio and Donald Trump
| Updated on: Oct 21, 2026 | 2:55 PM

भारत आणि अमेरिकेचे संबंध हळूहळू सुधारताना दिसत आहेत. दोन्ही देशात टॅरिफच्या मुद्यावरून मोठा तणाव बघायला मिळाला. त्यातच अमेरिकेचे भारताकडे असे काम आडले आहे की, भारताचे पाय पकडल्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा काही पर्यायच शिल्लक राहिला नाही. त्याच अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्काे रूबियो हे भारत दाैऱ्यावर आले आहेत. भारत दाैऱ्यावर येण्यामागे मोठे लॉजिक आहे. मार्काे रूबियो यांनी पाकिस्तानसोबतच्या नात्यावर मोठे विधान केले. पाकिस्तान आणि अमेरिका यांच्या संबंधांवर त्यांनी हे भाष्य केले. मार्काे रूबियो यांनी स्पष्ट केले की, पाकिस्तानजवळ परमाणु शस्त्र आहे. त्यांची जी भाैगोलिक स्थिती आहे, त्यानुसार अमेरिका पाकिस्तानसोबत सर्व संबंध तोडूच शकत नाही. पूर्ण संबंध तोडणे शक्य नाही, ही वस्तूस्थिती आहे. यासोबतच त्यांनी भारताला आश्वासन देत म्हटले की, अमेरिका दहशतवादाचा मोठा विरोध करते.

पाकिस्तानसोबत भारताची सुरक्षा चिंता यावर आम्ही बोलू. भारताची जी समस्या आहे ती दूर करण्याचा प्रयत्न आमच्याकडून केला जाईल, असा शब्द आम्ही देतो. त्यांनी पुढे म्हटले की, मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की, आम्हाला अशाही देशांसोबत संबंध ठेवावा लागतो, त्याच्यासोबत आमचे स्वत:चे मोठे मतभेद आहेत. पाकिस्तान एक असा देश आहे, ज्याच्या भाैगोलिक रचनेमुळे आम्हाला त्यांच्यासोबत संबंध ही ठेवावीच लागतात.

Loading...

यादरम्यान त्यांनी इराणचे उदाहरण देत म्हटले की, इराण आणि भारताचे व्दिपक्षीय संबंध आहेत, प्रत्येक देशाला आपल्या देशाच्या हितानुसार निर्णय घ्यावी लागतात. आम्ही जगभरात कुठेही दहशतवादा विरोधात आहोत. आम्ही त्या प्रत्येक देशाचा विरोध करतो, तो दहशतवादाला प्रोत्साहन देतो. याबाबत अमेरिकेची कोणतीच वेगळी भावना नाही.

सर्वांसाठी अमेरिकेची तीच भूमिका असणार आहे. आमचे पाकिस्तानसोबत संबंध आहेत, आम्ही सरळपणे त्यांना बोलू शकतो. भारताला दहशतावाद, सीमेवरील घुसखोरी याची चिंता आहे. आम्ही याकरिता पाकिस्तानला सांगू शकतो. अमेरिकेकडून भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील संबंध संतुलनात ठेवण्यासाठी प्रयत्न केली जात आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us