जगात खळबळ! या देशात घुसून अमेरिकेने केला भयंकर हल्ला, सर्वकाही उद्धवस्थ, डोनाल्ड ट्रम्प थेट..

गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सतत चर्चेत आहेत. जगाला हादरवणारी निर्णय घेताना डोनाल्ड ट्रम्प दिसत आहेत. त्यामध्येच आता अमेरिकेने थेट एका देशात घुसून मोठा हल्ला केला आहे.

जगात खळबळ! या देशात घुसून अमेरिकेने केला भयंकर हल्ला, सर्वकाही उद्धवस्थ, डोनाल्ड ट्रम्प थेट..
America attack
| Updated on: Dec 30, 2025 | 8:13 AM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कधी काय निर्णय घेतील, हे सांगणे फार जास्त कठीण आहे. आता फक्त धमकीच नाही तर अमेरिकेच्या लष्कराने थेट दुसऱ्या देशात घुसून मोठी कारवाई केली. पहिल्यांदाच अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या भूमीवर लष्करी कारवाई केली. डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच दावा केला की, अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी बोटींमध्ये माल भरला जात होता आणि त्यावेळीच हल्ला करण्यात आला. व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्यावर दबाव वाढवण्यासाठी हा हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांनी त्यांच्या राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, याकरिता अमेरिका सातत्याने दबाव टाकत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट याबाबत अनेकदा धमकी देखील दिली. त्यामध्येच आता अमेरिकेच्या लष्कराने त्यांच्या भूमीत घुसून कारवाई केली.

फ्लोरिडामध्ये इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासोबतच्या भेटीदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी संपूर्ण जगाला या कारवाईबद्दल माहिती दिली. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, डॉकच्या परिसरात जिथे बोटींमध्ये अंमली पदार्थ भरले जात होते, तिथे एक शक्तिशाली स्फोट केला. या स्फोटानंतर संपूर्ण उद्धवस्थ झाले, तिथे काहीच राहिले नाही. गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेकडून सतत कॅरिबियन समुद्रात कारवाई केली जात आहे.

कॅरिबियन समुद्र आणि पूर्व पॅसिफिक महासागरातील अंमली पदार्थांच्या तस्करीमध्ये सामील असलेल्या बोटींना टार्गेट करून कारवाई केली जात आहे. अमेरिकेची ही कारवाई व्हेनेझुएलाच्या हद्दीपर्यंत पोहोचल्याचे संकेत मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. मात्र, हा हल्ला नेमका अमेरिकेच्या लष्कराकडून करण्यात आला की, सीआयएकडून याबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी गुप्तता पाळली.

हा हल्ला व्हेनेझुएलाच्या हद्दीत झाला होता असेही अगदी स्पष्टपणे सांगणे टाळताना डोनाल्ड ट्रम्प दिसले. मात्र, ही कारवाई किनारपट्टीजवळ करण्यात आली असल्याचे सांगितले जाते. डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर सध्या व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये निकोलस मादुरो यांनी त्यांची खुर्ची सोडावी, या करिता दबाव टाकला जात आहे. अनेकदा निकोलस मादुरो यांना थेट धमक्याही डोनाल्ड ट्रम्प यांनी दिल्या.