Russia vs US : बेलारुस सोडण्याची सूचना, अमेरिकेने सैन्य अधिकाऱ्यांची बोलवली इमर्जन्सी बैठक, काहीतरी मोठं घडण्याचे संकेत

Russia vs US : मागच्या अनेक वर्षांपासून रशियामध्ये व्लादीमीर पुतिन यांचं शासन आहे. त्यांची सत्तेवर मजबूत, घट्ट पकड आहे. रशियावरच्या त्यांच्या पोलादी पकडीमुळे अमेरिकेसह नाटो देश, युरोप हैराण झाले आहेत. आता थेट रशिया विरोधात आर-पारची तयारी सुरु झाल्याच दिसतय. कारण बेलारुस सोडण्याची सूचना आली आहे.

Russia vs US : बेलारुस सोडण्याची सूचना, अमेरिकेने सैन्य अधिकाऱ्यांची बोलवली इमर्जन्सी बैठक, काहीतरी मोठं घडण्याचे संकेत
Donald Trump
| Updated on: Sep 27, 2025 | 8:54 AM

रशिया-युक्रेन युद्धात NATO आणि युरोपच्या इंटरेस्टमुळे जगासमोर युद्धाच संकट निर्माण झालं आहे. त्यापासून कोणीही सुटू शकत नाही. पण खरच महायुद्ध होईल का?. हा प्रश्न आतापर्यंत जी स्थिती होती, त्यामुळे गंभीर वाटत नव्हता, पण अमेरिकेत एक गुप्त बैठक होणार आहे. त्यामुळे हा मुद्दा गंभीर बनला आहे. सध्या जगात युद्धाच्या अनेक आघाड्या उघडलेल्या आहेत. यात कुठे अमेरिका प्रत्यक्षरित्या सहभागी आहे तर कुठे पाठच्यादाराने.त्यामुळे संपूर्ण जगात अमेरिकेच्या भूमिकेबद्दल संशय आहे. एका आदेशामुळे हा संशय अधिक बळावतो. डोनाल्ड ट्रम्प यांना सत्तेवर येऊन 9 महिन्यापेक्षा जास्त कालावधी झालाय. ट्रम्प जे आश्वासन देऊन सत्तेवर आले होते, ते आश्वासन त्यांना अजूनही पूर्ण करता येत नाहीय.शांतता स्थापित होण्याऐवजी अजून युद्धाच्या आघाड्या उघडल्या गेल्या आहेत.

युद्धाची स्थिती फक्त युक्रेनपर्यंत मर्यादीत होती. ट्रम्प यांच्या नितीमुळे त्याचा विस्तार झाला आहे. याच रण विस्ताराच्या स्थितीमुळे अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांनी जगभरात पसरलेल्या आपल्या सैन्य अधिकाऱ्यांना एक महत्वाचा आदेश दिला आहे. या आदेशातंर्गत पुढच्या आठवड्यात वर्जिनिया येथे सर्व सैन्य अधिकाऱ्यांना उपस्थित रहावं लागणार आहे. असामान्य परिस्थितीच कारण या बैठकीसाठी देण्यात आलय. याच आदेशामुळे संशय निर्माण झालाय. फ्लॅग किंवा जनरल ऑफिसर्सची बैठक अमेरिका व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेते. पण आता सैन्य अधिकाऱ्यांना चर्चेसाठी वर्जिनिया येथे का बोलावलं आहे?.

बैठकीचा उद्देश काय असू शकतो?

अमेरिकेचे जे विरोधी देश आहेत, तिथे बंडखोरीला प्रोत्साहन देण हा सुद्धा या गोपनीय बैठकीमागे उद्देश असू शकतो. विरोधी देशात सत्ता परिवर्तनासाठी प्रायोजित आंदोलन केली जाऊ शकतात. त्याशिवाय गुप्त हल्ले, मोहिमा यांचा सुद्धा समावेश असू शकतो. रशिया विरुद्ध ट्रम्प यांनी कारवाई केली, तर सत्तापालट घडवण्याची सुद्धा योजना असू शकते. अमेरिका थेट रशिया विरोधात युद्धात उतरणार नाही, त्याऐवजी ते NATO आणि युरोपला पुढे ढकलतील. सध्या पोलंड असा एक देश आहे, तिथून रशिया विरुद्ध नाटो युद्धाला सुरुवात होऊ शकते असा अंदाज आहे.

एडवायजरी जारी करुन बेलारुस सोडण्यास सांगितलं आहे. बेलारुस आणि रशियात प्रवास करणं टाळा असं सांगण्यात आलं आहे. याचा थेट अर्थ फक्त हल्ल्यापासून बचाव नाही, तर युद्धाची शक्यता आहे. अशा स्थितीत ट्रम्प यांनी अचानक सैन्य अधिकाऱ्यांची गुप्त बैठक बोलवली आहे. त्याचा अर्थ खूप मोठा आहे.