भारताचा बांगलादेशला मोठा झटका, मोहम्मद युनूस तोंडावर, थेट त्यांच्यापेक्षाही..

अमेरिकेने सर्वांना धक्का देत थेट भारतावरील टॅरिफ कमी केला. 50 टक्क्यांहून थेट 18 टक्के टॅरिफ करण्यात आला. ज्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर बांगलादेशाने मोठे विधान केले होते.

भारताचा बांगलादेशला मोठा झटका, मोहम्मद युनूस तोंडावर, थेट त्यांच्यापेक्षाही..
India and Bangladesh
| Updated on: Feb 03, 2026 | 12:11 PM

मागील काही दिवसांपासून भारत आणि अमेरिकेतील संबंध तणावात राहिली. मात्र, अखेर अमेरिकेने एक पाऊल मागे घेत भारतावरील टॅरिफ कमी केला. 50 टक्के टॅरिफ भारतावर लावण्याचा धक्कादायक निर्णय अमेरिकेने घेतला होता. आता अमेरिकेने भारतावरील टॅरिफ 18 टक्के केला. विशेष म्हणजे बांगलादेशापेक्षाही कमी टॅरिफ आज भारतावर आहे. युरोपियन युनियनसोबत काही दिवसांपूर्वीच भारताने मोठा करार केला. अमेरिकेने लावलेल्या टॅरिफनंतर भारताने अनेक देशांसोबत व्यापार करार केले. भारत आणि अमेरिकेतील संबंध टॅरिफमुळे तणावात आल्यानंतर पाकिस्तान आणि बांगलादेशाने अमेरिकेसोबत जवळीकता वाढवण्याचा प्रयत्न केला. हेच नाही तर बांगलादेशाने थेट भारतावरील टॅरिफबद्दल थेट विधान करत खिल्ली उडवली होती. आताच्या घडीला बांगलादेशापेक्षा कमी टॅरिफ भारतावर आहे.

अमेरिकेने घेतलेल्या निर्णयानंतर बांगलादेश चांगलाच तोंडावर पडला. मुळात म्हणजे भारत आणि बांगलादेशातील संबंध कायमच चांगले राहिले. मात्र, हसीना शेख यांना भारताने मदत केल्याने सध्या बांगलादेशाोसोबतचे संबंध तणावात आहेत. शिवाय बांगलादेशात हिंदू लोकांवर प्रचंड अत्याचार होत आहेत. रस्त्यावर हिंदू लोकांना मारले जात आहे. अमेरिकेने भारतावरील टॅरिफबद्दल घेतलेल्या निर्णयानंतर पाकिस्तानसह बांगलादेशला मोठा झटका बसला.

युरोप आणि भारतामधील व्यापार करारांमुळे अगोदरच पाकिस्तान आणि बांगलादेश तणावात होते. त्यामध्येच आता अमेरिकेने हा झटका दिला. बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी ब्रिटिश अमेरिकन पत्रकार मेहदी हसन यांच्या मुलाखतीत भारताची टॅरिफवरून खिल्ली उडवली होती. बांगलादेश-अमेरिका व्यापार कराराचे कौतुक केले होते.

त्यावेळी बोलताना मोहम्मद युनूस यांनी म्हटले होते की, आम्ही अमेरिकेसोबत ज्या प्रकारच्या व्यापार करार केला आहे त्याबद्दल आम्हाला खूप आनंद आहे. आमच्यावर 20 टक्के टॅरिफ लादण्यात आला आहे, जो अगदी योग्य आहे….  काळजी करावी इतकी ती गोष्ट नाहीये… असे म्हणत त्यांनी भारताचा उल्लेख केला होता. मोहम्मद युनूस यांनी हे विधान अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्यानंतर केले होते. त्यावेळी भारताला याला काही उत्तर दिले नव्हते. आता थेट बांगलादेश तोंडावर पडल्याचे बघायला मिळत आहे.