AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तान आणि बांगलादेशाने घेतला अत्यंत मोठा निर्णय, थेट भारताच्या…

भारत आणि पाकिस्तानचे संबंध तणावात असतानाच आता बांगलादेशाने पाकिस्तानबद्दल मोठा निर्णय घेतला. गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशासोबत भारताचे संबंध तणावात आहेत. त्यामध्येच बांगलादेशाने धक्कादायक निर्णय घेतला.

पाकिस्तान आणि बांगलादेशाने घेतला अत्यंत मोठा निर्णय, थेट भारताच्या...
Bangladesh and Pakistan
| Updated on: Jan 30, 2026 | 9:36 AM
Share

भारत आणि पाकिस्तानचे संबंध कायमच तणावात राहिले. पाकिस्तानातून भारतात मोठ्या दहशतवादी कारवाई करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातो. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने थेट पाकिस्तानमध्ये घुसून कारवाई केली. भारत आणि बांगलादेशचे संबंध कायमच चांगले राहिले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात अनेक घडामोडी घडताना दिसत असून ज्यामुळे दोन्ही देशातील संबंध तणावात आहेत. बांगलादेशात हिंदू लोकांवर सातत्याने अत्याचार केली जात आहेत. भर रस्त्यावर हत्या केल्या जात आहेत. काही दिवसांपूर्वीच बांगलादेशातील भारतीय दूतावासावरही हल्ला करण्यात आला. शेख हसीना यांचे सरकार असताना दोन्ही देशांमधील संबंध चांगले होते. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. भारताने शेख हसीना यांना भारतात आसरा दिला, ज्यामुळे संबंध अधिक ताणले गेले. सध्या मोठे हिंसाचार बांगलादेशात होत आहेत. फेब्रुवारी महिन्यात बांगलादेशात निवडणुका आहेत.

भारतासोबत संबंध तणावात असताना पाकिस्तानने भारताविरोधात मोठी चाल खेळत बांगलादेशात संबंध वाढवले आहेत. बांगलादेश आणि पाकिस्तान एकाच मंचावर एकत्र येत आहेत. बांगलादेश अमेरिकेसोबत संबंध वाढवण्यासाठी पाकिस्तानची मदत घेत आहे. आता पाकिस्तान आणि बांगलादेशातील मैत्री इतकी जास्त वाढली की, थेट 14 वर्षांनी पुन्हा विमान सेवा सुरू करण्यात आली आहे.

बांगलादेशची राष्ट्रीय विमान कंपनी अर्थात बांगलादेश एअरलाइन्सने ढाका ते कराची अशी थेट विमानसेवा सुरू केली. यावरून स्पष्ट होते की, दोन्ही देशांमधील संबंध चांगलेच सुधारले आहेत. पाकिस्तान विमानतळ प्राधिकरणानुसार,  बांगलादेश एअरलाइन्सचे विमान गुरुवारी रात्री कराचीच्या जिन्ना आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. विमान उतरल्यानंतर खास वॉटरने या विमानाला सलामी देखील देण्यात आली आणि हा ऐतिहासिक क्षण असल्याचेही सांगितले गेले.

आयटी ट्रॅकिंग डेटानुसार मिळालेल्या माहितीप्रमाणे, विमान फ्लाइट BG341 ने ढाक्यातील हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून रात्री 8:15 वाजता उड्डाण केले. तीन तासांनंतर रात्री 11:03 वाजता कराचीला पोहोचले. पूर्ण विमान भरले होते. भारतावरून विमान उड्डाण करत होते. तो एकमेव सरळ मार्ग आहे. हे विमान बांगलादेशाचे असल्याने त्यावर कोणतेही निर्बंध नाहीत. भारतातून पाकिस्तानला एकही विमान जात नाही किंवा पाकिस्तानातून भारतातही येत नाही. हेच पाकिस्तान आणि बांगलादेशाबाबत होते. मात्र, आता बांगलादेशाने पाकिस्तानात विमान सेवा सुरू केली.

उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.