AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुतिन भारतात, अमेरिकेत कहर, डोनाल्ड ट्रम्प यांना झटका, अमेरिकन लष्कर धोक्यात, थेट..

रशियाचे अध्यक्ष पुतिन हे भारतात आहेत. यादरम्यान अनेक बैठका त्यांच्या होणार आहेत. काही महत्वाचे करार होण्याचीही शक्यता आहे. फक्त पुतिन हेच नाही तर त्यांच्यासोबत अनेक रशियन मंत्रीही भारतात दाखल झाले आहेत. मात्र, त्यापूर्वीच मोठी खळबळ उडाली आहे.

पुतिन भारतात, अमेरिकेत कहर, डोनाल्ड ट्रम्प यांना झटका, अमेरिकन लष्कर धोक्यात, थेट..
Donald Trump US Defense
| Updated on: Dec 05, 2025 | 9:39 AM
Share

भारत आणि अमेरिकेत अनेक वर्षांपासून चांगले संबंध आहेत. मात्र, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर दोन्ही देशांमधील संबंध तणावात आहेत. हेच नाही तर ट्रम्प भारताबद्दल धक्कादायक विधाने करतानाही अनेकदा दिसले. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारताच्या दाैऱ्यावर आहेत. पुतिन भारतात पोहोचताच अमेरिकेत मोठी खळबळ उडाली. मुळात म्हणजे रशिया आणि भारतातील मैत्री अमेरिकेसाठी मोठी पोटदुखी आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये अमेरिकेला भारत आणि रशियातील व्यापार बंद करायचा आहे. पुतिन हे अचानक भारत दाैऱ्यावर पोहोचल्याने अमेरिकेला मोठा धक्का बसला. काही दिवसांपूर्वीच पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट चीनमध्ये झाली होती. त्यामध्येच आता अमेरिकन सैन्य धोक्यात आले आहे.

अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी त्यांच्या वैयक्तिक फोनवरून येमेनमधील आगामी लष्करी कारवाईशी संबंधित संवेदनशील माहिती शेअर केली. ज्यामुळे अमेरिकन सैन्यावरील धोका वाढला आहे. पेंटागॉनच्या महानिरीक्षकांच्या अहवालात ही बाब पुढे आली. संरक्षण विभागातील अनधिकृत मेसेजिंग अॅप्स आणि साधनांच्या वापरावर टीका करण्यात आली. हेगसेथने सिग्नल अॅपद्वारे दहशतवाद्यांवर अमेरिकन लष्करी हल्ल्याची योजना शेअर केली.

पेंटागॉनच्या अंतर्गत नियमांचे उल्लंघन केले गेले होते. ज्यामुळे लष्करी कर्मचारी आणि त्यांची योजना धोक्यात येऊ शकते. अहवालात स्पष्टपणे म्हणण्यात आले की, हेगसेथने शत्रूच्या प्रदेशात असलेल्या अमेरिकन लढाऊ विमानांबद्दल गोपनीय माहिती यासोबतच ते कुठे आहेत आणि वेळेची संपूर्ण माहिती त्यांच्या ऑपरेशनच्या दोन ते चार तास अगोदर शेअर केली. याकरिता त्यांनी अॅपची मदत घेतली. ज्यामुळे या ऑपरेशनला आणि अमेरिकन लष्कराला धोका झाला.

यावर हेगसेथने म्हटले की, कोणतीही गोपनीय माहिती शेअर करण्यात आली नाही. मी पूर्णपणे निर्दोष आहे. यासह, हे प्रकरण बंद झाले आहे. बॉम्बहल्ला करण्यात आला. मात्र, या प्रकारामुळे अमेरिकेत मोठी खळबळ उडाली आहे. पुतिन यांच्या भारत दाैऱ्यादरम्यान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे नेमके काय बोलतात याकडे सर्वांच्या नजरा आहेत. पुतिन हे भारत दाैऱ्यावर येणे अमेरिकेचा अजिबातच पटले नाहीये.

Follow Us
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा