अमेरिकेनेही ओळखही भारतीयांची ताकद, थेट मानले आभार, स्मित मच्छार यांच्या..

दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या विमानात घडलेल्या घटनेने एकच खळबळ उडाली. धक्कादायक माहिती पुढे येत आहे. यादरम्यान भारतीय पायलट स्मित मच्छार यांच्याकडून थेट मोठा खुलासा करण्यात आला. अमेरिकेकडूनही स्मित मच्छार यांचे काैतुक केले जात आहे.

अमेरिकेनेही ओळखही भारतीयांची ताकद, थेट मानले आभार, स्मित मच्छार यांच्या..
Smit Machchhar
| Updated on: Oct 04, 2026 | 8:19 AM

दुबईकडून तेल अवीवकडे जाणाऱ्या विमानात जे काही घडले, ज्यानंतर जग सुन्न झाले. 180 जण असलेले हे विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न ओमानच्या को पायलटकडून करण्यात आला. त्याने पूर्ण कट रचला, त्यानुसारच त्याने मोठा हल्ला भारतीय पायलटवर केला. मात्र, भारतीय पायलट स्मित मच्छार याने ओमानच्या पायलटचा प्रयत्न उडवून लावला. इस्त्रायलच्या जमिनीवर हा कट घडवून आणायचा होता. या विमानात जवळपास इस्त्रायली नागरिक होते. स्मित मच्छार यांनी गंभीर जखमी होऊनही हा हल्ला रोखला. याबाबत आता मोठे खुलासे होत आहेत. ओमानच्या को पायलटबद्दल एका मागून एक धक्कादायक खुलासे होत आहेत. 2024 मध्येच त्याच्यावर कारवाई झाली होती. भारतीय पायलटमुळे एक मोठा दहशतवादी हल्ला टळला.

स्मित मच्छार यांचे जगाकडून काैतुक केले जात आहे. त्यातच भारतीयांविरोधात तिरस्कार करणाऱ्या अमेरिकेनेही भारतीय पायलटचे काैतुक केले. अमेरिकेचे उप-परराष्ट्र मंत्री क्रिस्टोफर लॅंडौ यांनी फ्लायदुबईचे विमान FZ1073 च्या भारतीय पायलट स्मित मच्छार आणि या विमानातील प्रवाशांचे काैतुक केले. ओमानच्या पायलटला प्रवाशांनी पकडून ठेवले आणि भारतीय पायलटने गंभीर जखमी असतानाही विमान आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षित उतरवले.

Loading...

ही एक मोठी दहशतवादी घटना घडली असती. ओमानचा को पायलट असलेल्या हमाम अल हमामी याने कॉकपिटमध्ये असलेल्या पायलट स्मित मच्छार याच्यावर हल्ला केला. यावेळी 180 लोक विमानात होते. कॉकपिटमधील आवाज ऐकून प्रवाशी धावले आणि त्यांनी परिस्थिती आपल्या हातात घेतली. अमेरिकेचे उप परराष्ट्र मंत्री क्रिस्टोफर लॅंडौ यांनी एक्सवर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर केली.

त्यांनी लिहिले की, फ्लायदुबईच्या FZ1073 या विमानाचे भारतीय पायलट कॅप्टन स्मित मच्छार आणि विमानातील सर्व बहुसंख्यिय इस्त्रायली प्रवाशांबद्दल मनात प्रचंड आदर आहे. या सर्वांनी मिळून एक अशी घटना रोखली जी जगातील सर्वात भीषण दहशतवादी हल्ल्यांपैकी एक ठरू शकली असती. थेट भारतीय पायलटचे अमेरिकेकडून आभार व्यक्त केले जात आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us