अमेरिकेने केली भारताची मोठी फसवणूक, टॅरिफच्या आकड्यांचा गोंधळ, फक्त 7 टक्केच..

टॅरिफच्या मुद्द्यात भारत आणि अमेरिकेचे संबंध तणावात होते. भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने मोठा टॅरिफ अमेरिकेने भारतावर लावला. आता तो टॅरिफ कमी करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली.

अमेरिकेने केली भारताची मोठी फसवणूक, टॅरिफच्या आकड्यांचा गोंधळ, फक्त 7 टक्केच..
Tariffs US and india
| Updated on: Feb 03, 2026 | 1:21 PM

भारत आणि अमेरिकेत गेल्या काही दिवसांपासून मोठा तणाव बघायला मिळाला. अमेरिका भारतावर अनेक आरोप करताना दिसली. फक्त आरोपच नाही तर रशियाचे कपडे धुण्याचे मशिनही अमेरिकेने भारताला म्हटले. भारताने कोणत्याही परिस्थितीमध्ये रशियाकडून तेल खरेदी बंद करावी, याकरिता अमेरिकेचा दबाव होता. भारतामुळेच रशिया आणि युक्रेन युद्ध सुरू असल्याचे अमेरिकेने म्हटले. यासोबतच भारतावर अनेक निर्बंध लादण्याचा धमक्या देण्यात आल्या. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने अमेरिकेने भारतावर थेट 50 टक्के टॅरिफ लावला. अगोदर भारतावर 25 टक्के टॅरिफ लावण्यात आला आणि भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने अतिरिक्त 25 टक्के असा एकून मिळून 50 टक्के अमेरिकेने भारतावर टॅरिफ लावला. अमेरिकेने लावलेल्या टॅरिफनंतर भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद केली. मात्र, अजूनही पूर्णपणे तेल खरेदी बंद करण्यात आली नाही.

अमेरिका आणि भारतात टॅरिफच्या मुद्द्यातून तणाव असतानाच आता दिलासादायक घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. भारतावर असलेला 25 टक्के टॅरिफ काढून अमेरिकेने 18 टक्के केला. मात्र, भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने अमेरिकेने लावलेला 25 टक्के टॅरिफ हा तसाच आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने अमेरिकेने दंडात्मक 25 टक्के टॅरिफ लावला होता.

तो टॅरिफ अजून तसाच ठेवण्यात आला. भारताने जवळपास रशियाकडून तेल खरेदी बंद केली. मात्र, पूर्ण बंद केली नाहीये. ज्यावेळी भारत रशियाकडून तेल खरेदी पूर्णपणे बंद करेल, त्यावेळी अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ काढला जाईल, असे अमेरिकेचे म्हणणे आहे. नक्कीच भारतावरील टॅरिफ अमेरिकेने कमी केला पण अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ आहे तसाच आहे.

हाच टॅरिफ रद्द करण्यासाठी करण्यासाठी भारताकडून सातत्याने प्रयत्न केली जात आहेत. आता भारतावरील एकून टॅरिफ 43 टक्के कायम आहे जो 50 हून 43 वर आला. पुढील काही दिवसातच अमेरिका अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ भारतावरील कमी करेल असे काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आले. म्हणजेच भारतावरील टॅरिफ फक्त 18 टक्के राहिल. हा बांगलादेशपेक्षाही कमी असणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us