अमेरिकेची मोठी घोषणा, इराणला दणका, पाकिस्तान आपटला तोंडावर, थेट अमेरिका..

इराण आणि अमेरिका युद्धात जगाला फटका बसत आहे. दोन्ही देशांमधील युद्ध थांबवावे आणि होर्मुज खाडी सुरक्षित व्हावी, ही जगाची इच्छा आहे. मात्र, यादरम्यान अमेरिकेने अत्यंत मोठी घोषणा केल्याचे बघायला मिळत आहे.

अमेरिकेची मोठी घोषणा, इराणला दणका, पाकिस्तान आपटला तोंडावर, थेट अमेरिका..
Donald Trump
| Updated on: Apr 26, 2026 | 9:19 AM

इराण आणि अमेरिका युद्धात मोठी खळबळ उडाली. इराणने स्पष्ट भूमिका घेत म्हटले की, आम्ही जी काही चर्चा आहे किंवा आमचे जे मुद्दे आहेत, ते आम्ही पाकिस्तानसमोर मांडू. एकाच टेबलावर येऊन आम्ही अमेरिकेसोबत चर्चा करणार नाहीत. पहिली इराण आणि अमेरिका यांच्यातील शांतता करार युद्धविराम चर्चा समोरासमोर येऊन झाली. मात्र, काही तास बैठक होऊनही मार्ग निघू शकला नाही. त्यानंतर परिस्थिती व्यवस्थित होण्याऐवजी अधिक खराब झाली. होर्मुज खाडीत अमेरिकेने नाकेबंदी केली. इराण आणि अमेरिका यांच्यात तणाव वाढला. अमेरिकेने नाकेबंदी काढावी, अशी मागणी इराणकडून केली जात आहे. मात्र, अमेरिका मागे हटण्यास तयार नाही. इराणचे काही जहाज देखील अमेरिकेने जप्त केले. इराणचा व्यापार ठप्प आहे. इराणी बंदरातून एकही जहाज बाहेर पडू शकत नाहीये. तेलाची निर्यातही ठप्प झाली.

यासर्व पार्श्वभूमीवर इराणने शांतता करार बैठकीत अमेरिकेसोबत चर्चा करायची नसल्याची भूमिका घेतली. काल इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानमध्ये बैठकीसाठी पोहोचले होते. यावेळी त्यांच्यात चर्चाही झाली. त्यानंतर आता अमेरिकेकडूनही अत्यंत मोठी घोषणा करण्यात आली. इराणसोबत चर्चेसाठी अमेरिकेचे शिष्टमंडळ जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. पाकिस्तानमध्ये अमेरिकेचे शिष्यमंडळ जाणार होते ते जाणार नाहीये. हा मोठा दणका आहे.

यासोबतच इराणसोबत चर्चा होणार नसल्याचे स्पष्ट केले. हा मोठा दणकाच म्हणावा लागणार आहे. दुसरीकडे जग हे युद्ध थांबवण्याकरिता मागणी करत आहे. मात्र, इराण आणि अमेरिका दोन्ही देश युद्धविराम करण्यासाठी समोरासमोर येऊन चर्चा करण्यासही तयार नसल्याचे बघायला मिळत आहे. यामुळे परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

इराण आणि अमेरिका युद्धात पाकिस्तान मध्यस्थीची भूमिका निभावत आहे. मात्र, त्यांना अपयश मिळाले. जो देश स्वत: दहशतवाद्यांना पोसतो आणि मोठे करतो तो देश अमेरिका आणि इराण युद्धात मध्यस्थी करण्यासाठी निघाला आहे. इस्त्रायलला पाकिस्तानची मध्यस्थी मान्य नाही. त्यामध्येच आता अमेरिकेने मोठी घोषणा केली. इराण आणि अमेरिका युद्धात संपूर्ण जग होरपळत आहे. स्थिती अधिक गंभीर आहे. एलपीजी गॅस आणि तेलाची मोठी समस्या आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us