अमेरिकेची सर्वात मोठी घोषणा, इराणला सोडून थेट चीनला दे दणका, तब्बल 40…

US Sanctions : इराण आणि अमेरिका युद्ध पेटले आहे. स्थिती गंभीर आहे. यादरम्यानच अमेरिकेने अत्यंत धक्कादायक अशी कारवाई केली. अमेरिकेच्या या कारवाईने मोठी खळबळ उडाली. चीनला मोठा धक्का अमेरिकेने दिला आहे.

अमेरिकेची सर्वात मोठी घोषणा, इराणला सोडून थेट चीनला दे दणका, तब्बल 40...
Donald Trump
| Updated on: Apr 25, 2026 | 7:49 AM

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कधी काय निर्णय घेतील, याचा अजिबातच नेम नाही. डोनाल्ड ट्रम्प सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाचा फटका जगातील प्रत्येक देशांना बसत आहे. 28 फेब्रुवारी 2026 रोजी इस्त्रायल आणि अमेरिकेने संयुक्त कारवाई करत मोठा हल्ला इराणवर केला. त्यानंतर हाहाकाराला सुरूवात झाली. रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर निर्बंध घालणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून रशियाच्या तेलावरील निर्बंध काही दिवसांकरिता उठवण्यात आली. इराण आणि अमेरिका युद्धाचा फटका जगाला बसत आहे. जागतिक बाजारात तेलाच्या किमती गगणाला पोहोचल्या आहेत. इराणसोबतच्या युद्धात डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून चीनला मोठा दणका देण्यात आला. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने अब्जावधी डॉलर्सचे इराणी तेल खरेदी केल्याबद्दल एका महत्वाच्या आणि मोठ्या चीनी तेल शुद्धीकरण कंपनीवर निर्बंध लादले आहेत.

चीनला हा अमेरिकेचा अत्यंत मोठा धक्का म्हणावा लागेल. चीनने अगोदरच अमेरिकेला आमच्यामध्ये लक्ष न देण्याचा इशारा दिला होता. इराणसोबत आमचे अनेक वर्षांचे व्यापारी संबंध असल्याचेही चीनने म्हटले. मात्र, यादरम्यानच ही अत्यंत मोठी कारवाई करण्यात आली. अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने म्हटले की, त्यांनी हेंगली पेट्रोकेमिकल रिफायनरीला टार्गेट केले.

ही चीनी कंपनी इराणच्या कच्च्या तेलाच्या आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या सर्वात मोठ्या ग्राहकांपैकी एक आहे. सतत त्यांच्याकडून इराणीच्या तेलाची खरेदी केली जात होती. इराणच्या छुप्या जहाजी ताफ्याच्या रूपात कार्यरत असलेल्या 40 जहाजांसह कंपन्यांवर निर्बंध घातली आहेत. अमेरिकेने ही कारवाई अशावेळी केली, ज्यावेळी जगात कच्चा तेलाची आणि एलपीजी गॅसची मोठी समस्या आहे.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प काही आठवड्यातच चीनच्या दाैऱ्यावर जाणार आहेत. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्या चीनच्या दाैऱ्यापूर्वी अशा घडामोडी घडत असल्याने एकच खळबळ उडाली. शी जिनपिंग आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये यादरम्यान नक्की काय चर्चा होते हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे. इराणला युद्धाल चीन मदत करत असल्याचा आरोप सातत्याने केला जात आहे. त्यामध्येच आता ही कारवाई करण्यात आली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us