US-Iran War : पाकिस्तानची अशी इज्जत कुणीच काढली नसेल… इराण नव्हे इस्रायलनेच दाखवली औकात; राजदूत म्हणाला…
US-Iran War : अमेरिका आणि इराण यांच्यातील 2 आठवड्यांच्या युद्धविरामासाठी मध्यस्थी केल्याबद्दल पाकिस्तान वारंवार स्वतःची पाठ थोपटून घेतंय, पण आता इस्रायलने पाकिस्तानच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. इस्रायलचे भारतातील राजदूत रुवेन अझर यांनी पाकिस्तानला त्यांची औकात दाखवून दिली आहे.

गेल्या 40 दिवसांपासून एकमेकांवर तुटून पडलेल्या इराण-अमेरिका इस्रायल युद्धाच्या आगीत अख्खं जग होरपळलं होतं. अखेर काल बुधवारी युद्धविरामाच्या , शस्त्रसंधीच्या मुद्यावर अमेरिका -इराणमध्ये एकमत झालं आणि दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधीची घोषणा करण्यात आली. हे युद्ध थांबवण्याचं श्रेय पाकिस्तान घेत असून त्या मुद्यावरून पाकने आपली पाठ स्वत:च थोपटून घेतली आहे. पाकच्या पंतप्रधानांनीही यावर भाष्य करत आपल्याच देशाचं कौतुक केलं होतं. तसेच परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ यांनीही यासाठी स्वतःच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली होती. पण पाकिस्तानची भूमिका खरोखरच इतकी महत्त्वपूर्ण आहे का, की ते अतिशयोक्ती करत आहे? कारण इराण-अमेरिकेतील शस्त्रसंधीमध्ये पाकच्या भूमिकेबाबात इस्रायलच्या राजदूतांनीच शंका उपस्थित केली आहे. भारतातील इस्रायलचे राजदूत रुवेन अझर यांनी मध्यस्थ म्हणून पाकच्या भूमिकेवर सवाल विचारला आहे. इस्रायला हा या चर्चेत पाकिस्तानकडे ‘विश्वासार्ह पक्ष’ म्हणून पाहत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.
पाकच्या भूमिकेवर शंका
इस्रायलचे राजदूत रुवेन यांनी अमेरिका-इराण यांच्यात सुरू असलेल्या शस्त्रसंधी चर्चेत मध्यस्थ म्हणून पाकिस्तानच्या भूमिकेबद्दल शंका व्यक्त केली आहे. इस्रायल हा इस्लामाबादला ‘विश्वासार्ह पक्ष’ मानत नाही, असं ते म्हणाले. गेल्या काही आठवड्यांपासून पाकिस्तान इराण आणि अमेरिका यांच्यात मध्यस्थ म्हणून काम करत असून, दोन्ही बाजूंचे संदेश पोहोचवत आहे.
पाकिस्तान विश्वासार्ह नाही
“आम्ही पाकिस्तानला एक विश्वासार्ह पक्ष मानत नाही’ असं रुवेन अझर म्हणाले. ‘ मला असं ठामपणे वाटतं की अमेरिकेने स्वतःच्या हेतूंसाठी पाकिस्तानच्या मध्यस्थीचा वापर करण्याचे ठरवलं’असं म्हणत त्यांनी पाकिस्तानबरोबर संबंध ठेवण्याची अमेरिकेची वेगळी कारणे असू शकतात असं वक्तव्य केलं.
अमेरिकेने हमाससोबत करार करण्यासाठी कतार आणि तुर्कीसारख्या समस्याग्रस्त देशांचा कसा वापर केला हे आपण भूतकाळात पाहिलं आहे, असं उदाहरणही त्यांनी दिली. “आम्हाला जे परिणाम अपेक्षित आहेत, त्याबाबत अमेरिकेशी समन्वय राखणे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.” असंही इस्रायलचे राजदूत रुवेन अझर म्हणाले.
#WATCH | Delhi: On Pakistan’s role as a mediator, Israel’s Ambassador to India, Reuven Azar, said, “We don’t see Pakistan as a credible player. I think that the United States has decided to use the services of the facilitation of Pakistan for their own reasons. We have seen in… pic.twitter.com/UErWPsTzzH
— ANI (@ANI) April 8, 2026
काय म्हणाले होते पाकचे परराष्ट्रमंत्री ?
अमेरिका-इराण युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ याबाबत बुधवारी (8 एप्रिल) वक्तव्य केलं होतं. ‘ इस्लामाबादला आता या प्रदेशात आणि जागतिक स्तरावर एक ‘विश्वसनीय’ मध्यस्थ म्हणून ओळखले जात आहे. पाकिस्तानच्या मध्यस्थीने अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांच्या सशर्त शस्त्रसंधीचा करार झाल्यानंतर काही तासांनी इस्लामाबादमध्ये पत्रकारांशी बोलताना आसिफ यांनी ही टिप्पणी केली. “हे (शस्त्रसंधी) आमच्या संपूर्ण नेतृत्वाचे यश आहे. यासाठी आम्ही अल्लाहचे आभारी आहोत,” असंही ते म्हणाले होते.
इस्लामाबादमध्ये होणार चर्चा
दरम्यान अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांचा युद्धविराम जाहीर करण्यात आल्यानंतर या आठवड्याअखेरीस म्हणजेच उद्या ( शुक्रवार 10 एप्रिल) अमेरिका-इराणमध्ये चर्चा होणार आहे. इराणबरोबर एका दीर्घकालीन करारावर चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे उप-राष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळासह पाकिस्तानला भेट देणार आहे. इस्लामाबादमध्ये ही बैठक होणार असल्याचे समजते.