Virat Kohli World Records : विराट कोहली संन्यास घेणार, पण संधी मिळताच करणार असं काही की भलेभले होणार अवाक, मैदानावर…
क्रिकेटमधून संन्यास घेण्याआधी विराट जाता-जाता अनेक मोठे विक्रम करू शकतो. यातील काही विक्रम तर सचिनची बरोबरी करणारे आहेत. हे विक्रम कोणते ते जाणून घेऊ या..

Virat Kohli 5 Records : भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली याच आज वाढदिवस आहे. तो 38 वर्षाचा झाला आहे. विराटने अगोदरच टी-20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे. आता तो एकदिवसीय क्रिकेट खेळताना दिसतो. दरम्यान, विराट मैदानावर आला की धावांचा पाऊस पड़तो. दरम्यान, आता विराट आपल्या करिअरच्या शेवटच्या टप्प्यात आहे. तो 2027 सालानंर निवृत्ती घेऊ शकतो. दरम्यान, क्रिकेटमधून संन्यास घेण्याआधी विराट जाता-जाता अनेक मोठे विक्रम करू शकतो. यातील काही विक्रम तर सचिनची बरोबरी करणारे आहेत. हे विक्रम कोणते ते जाणून घेऊ या..
विराट कोणते पाच विक्रम स्व:तच्या नावावर करू शकतो
दुहेरी शतक : विराट कोहलीला 2027 सालच्या विश्वचषकात दुहेरी शतक करण्याचा रेकॉर्ड रचता येऊ शकतो. आतापर्यंत त्याने वन डे क्रिकेटमध्ये दुहेरी शतक झळकावलेले नाही. त्याने या क्रिकेट फॉरमॅटमध्ये आतापर्यंत सर्वाधिक 183 धावा केलेल्या आहेत.
वनडे क्रिकेटध्ये सरासरी : विराटला आपल्या धावांची सरासरी 60 च्या पुढे घेऊन जाण्याची संधी आहे. आतापर्यंत विराटने 318 सामन्यांत 58.84 च्या सरासरीने 15183 धावा केलेल्या आहेत.
वनडे मध्ये 18000 धावा : विराट कोहलीला यावेळी 18000 धावांचा आकडा पार करण्याची सधी असेल. परंत विराट कोहलीकडे आता जास्त वेळ नाही. तो 2027 सालच्या विश्वचषकानंतर संन्यास घेऊ शकतो. त्याला त्याआधी 3000 धावा कराव्या लागणार आहेत. म्हणजेच तो 18000 धावांच्या विक्रमाला गवसणी घालू शकेल.
दोन वर्ल्डकप खेळणारा खेळाडू : विराट कोहली हा दोन विश्वचषक स्पर्धा जिंकून देणारा पहिला भारतीय खेळाडू ठरू शकतो. भारताने 1983 आणि 2011 अशा दोन वेळा विश्वचषक जिंकलेला आहे. 2011 सालच्या विजयी संघात विराट होता. आता तो 2027 सालच्याही संघात असेल.
100 शतकांचा विक्रम : विराट कोहलीकडे 100 शतकांचा विक्रम रचण्याची संधी असेल. सध्या त्याच्या नावावर 86 शतकं आहेत. त्याला आणखी 14 शतकं करावे लागणार आहेत. त्याने 100 शतकं झळकावली तर तो सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी करेल.
