AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाहुणे किती, जेवण काय? तुकाराम मुढेंना द्यावा लागणार लग्नाचा हिशोब; नवा नियम आला, निर्णय काय?

घरात लग्नसमारंभ असेल आणि पाहुण्यांसाठी जेवणाची व्यवस्था केली असेल, तर आता FDA विभागाला आधीच माहिती देणे बंधनकारक असणार आहे. किती पाहुणे जेवणार, कोणते पदार्थ बनवले जाणार आणि केटरर्स कोण असणार, याचा तपशील द्यावा लागणार आहे. अन्नातून विषबाधेच्या घटना रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.

पाहुणे किती, जेवण काय? तुकाराम मुढेंना द्यावा लागणार लग्नाचा हिशोब; नवा नियम आला, निर्णय काय?
Tukaram Mundhe FDA Latest NewsImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 05, 2026 | 6:35 PM
Share

राज्यात तुकाराम मुंढे यांनी एफडीएचा कारभार हातात घेतल्यापासून हे खाते प्रचंड चर्चेत आले आहे. विभागाने अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. बेकायदेशीर औषध विक्रीपासून ते अन्नपदार्थांच्या गुणवत्तेपर्यंत अनेक मुद्द्यांवर विभागाकडून कारवाया केल्या जात आहेत. अनेक कारवायांचं सत्रही सुरुच आहे. याच सगळ्या घडामोडींदरम्यान आता अन्न व औषध प्रशासन विभागाने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे नागरिकांच्या सुरक्षेप्रती विभाग किती सतर्क आहे, याचा प्रत्यय येतो आहे. एफडीएचा हा निर्णय सर्वाचं लक्ष वेधून घेत आहे. या निर्णयानुसार आता तुमच्या घरात लग्न समारंभ असेल आणि जेवण्याची व्यवस्था असेल तर तुम्हाला FDA विभागाला या बाबतची माहिती देणं बंधनकारक असणार आहे. एवढंच नाही तर किती लोक जेवणार आहेत, काय पदार्थ असणार आहेत, आणि कोण केटरर्स असणार आहे, याचा सर्व प्रकारचा तपशील तुम्हाला FDA विभागाला देणं बंधनकारक असणार आहे. एफडीएच्या या मोठ्या निर्णयामागचं कारण म्हणजे, लग्नसमारंभात जेवणामुळे होणाऱ्या विषबाधांच्या घटनांवर अंकुश मिळवणं आहे. त्यामुळे आता हा निर्णय सध्या राज्यभर चर्चेमध्ये आला आहे.

दरम्यान, FDA विभागाकडून राज्यभरात सुरू असलेल्या कारवायांची आकडेवारीही समोर आली आहे. ऑक्टोबर 2026 मध्ये विभागाने तब्बल 1,986 तपासण्या केल्या असून, या महिन्यात 544 नियामक कारवाया सुरू केल्या आहेत. औषध उत्पादन युनिट्समध्ये 292 तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये 17 उत्पादन परवाने रद्द, तर 55 परवाने निलंबित करण्यात आले. किरकोळ आणि घाऊक औषध विक्री करणाऱ्या आस्थापनांच्या 1,694 तपासण्या करण्यात आल्या. यावेळी 105 परवाने रद्द आणि 367 परवाने निलंबित करण्यात आले.

इतकेच नाही, तर 11 शोध आणि जप्ती मोहिमांमध्ये सुमारे 34.51 लाख रुपयांची अवैध औषधे आणि सौंदर्यप्रसाधने जप्त करण्यात आली. एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत राज्यात 7,950 तपासण्या करून 555 परवाने रद्द आणि 2,074 परवाने निलंबित करण्यात आले.

ऑक्टोबरमध्ये कोकण विभागात सर्वाधिक 556 तपासण्या झाल्या. यानंतर पुणे आणि बृहन्मुंबईचा क्रमांक लागतो. FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ‘सुरक्षित अन्न, सुरक्षित औषधे, सुरक्षित महाराष्ट्र’ हे ब्रीदवाक्य पुन्हा अधोरेखित केले आहे.

Follow Us
शरद पवारांवर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु
Sharad Pawar Health Update : शरद पवारांवर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफी योजनेचा चौथा टप्पा पूर्ण; 56 लाख...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफी योजनेचा चौथा टप्पा पूर्ण; 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ
एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; प्रत्येकी एवढ्या हजारांचा बोनस...
ST Employees Diwali Bonus : एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; प्रत्येकी एवढ्या हजारांचा बोनस जाहीर
परीक्षा सुधारणांसाठी गठित समितीचा अंतरिम अहवाल शासनास सादर, नेमकं....
MPSC : परीक्षा सुधारणांसाठी गठित समितीचा अंतरिम अहवाल शासनास सादर, नेमकं अहवालात काय?
मालेगावच्या 101 गावांची पाणीटंचाई दूर होणार! दादा भुसेंचा मोठा निर्णय,
मालेगावच्या 101 गावांची पाणीटंचाई दूर होणार! दादा भुसेंचा मोठा निर्णय, गावागावांत पोहोचणार पिण्याच्या पाण्याचे टँकर
सुनील तटकरेंच्या निकटवर्तीयाचा मोठा निर्णय; तीन विधानसभा मतदार....
Sunil Tatakare : सुनील तटकरेंच्या निकटवर्तीयाचा मोठा निर्णय; तीन विधानसभा मतदारसंघांच्या अध्यक्षपदाचा राजीनामा, राजीनाम्यामागचं कारण काय?
CM फडणवीसांच्या पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा; म्हणाले, मी इतक्या लवकर..
CM फडणवीसांच्या पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा; म्हणाले, मी इतक्या लवकर काही...
उद्धव ठाकरेंचा सतेज पाटलांना फोन; नेमकं काय म्हणाले?
Uddhav Thackeray On Gokul : उद्धव ठाकरेंचा सतेज पाटलांना फोन; नेमकं काय म्हणाले?
शिंदेंच्या शिवसेनेतून आताच्या घडीची मोठी बातमी; गोकुळच्या मुद्द्यावर..
Shivsena Shinde Group On Gokul : शिंदेंच्या शिवसेनेतून आताच्या घडीची मोठी बातमी; गोकुळच्या मुद्द्यावर व्यक्त केली महत्त्वाची भूमिका
डंके की चोट पर...; SIR च्या मुद्द्यावर अमित शाहांचा विरोधकांना इशारा
Amit Shah On SIR : डंके की चोट पर...; SIR च्या मुद्द्यावर अमित शाहांचा विरोधकांना थेट इशारा