पाकिस्तानला अमेरिकेचा निर्वाणीचा इशारा, दहशतवाद्यांना पोसणं थांबवा, नाहीतर आम्हाला एअर स्ट्राईक करण्याचा पूर्ण अधिकार

| Updated on: Oct 01, 2021 | 4:09 PM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यामते, पाकिस्तान हा दहशतवाद्यांना फक्त आश्रयच देत नाही तर त्यांना पोसण्यासही मदत करतो. अमेरिकेच्या पेंटागनमध्ये असलेल्या संरक्षण विभागाकडूनही पाकिस्तानच्या या कृत्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

पाकिस्तानला अमेरिकेचा निर्वाणीचा इशारा, दहशतवाद्यांना पोसणं थांबवा, नाहीतर आम्हाला एअर स्ट्राईक करण्याचा पूर्ण अधिकार
अमेरिकेने आता पाकिस्तानला दहशतवाद्यांना पोसण्याबद्दल कडक इशारा दिला आहे.
Follow us on

वॉशिंग्टन: अमेरिकेने आता पाकिस्तानला दहशतवाद्यांना पोसण्याबद्दल कडक इशारा दिला आहे. पाकिस्तानने दहशतवाद्यांना पोसणं बंद करावं नाहीतर दहशतवादी ठिकाणांवर ड्रोन हल्ले करण्याचा अधिकार असल्याचं अमेरिकेने म्हटलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यामते, पाकिस्तान हा दहशतवाद्यांना फक्त आश्रयच देत नाही तर त्यांना पोसण्यासही मदत करतो. अमेरिकेच्या पेंटागनमध्ये असलेल्या संरक्षण विभागाकडूनही पाकिस्तानच्या या कृत्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे. (us-is-honestly-concerned-about-pakistan-being-a-safe-heaven-for-terrorists-Pentagon-afghanistan-taliban-drone-air-strike )

अमेरिकेच्या मते, अल कायदासारख्या अनेक दहशतवादी संघटना सध्या पाकिस्तानात आहेत आणि ही गोष्ट खरोखर चिंतेची बाब आहे. गुरुवारी पेंटागॉनने म्हटले की, पाकिस्तान दहशतवाद्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान आहे, आणि गेल्या कित्येक वर्षांपासून पाकिस्तान दहशतवाद्यांचा बंदोबस्त करु शकलेला नाही.

अफगाणिस्तानमध्ये हवाई हल्ल्याचा अधिकार

दैनंदिन मीडिया ब्रीफिंगमध्ये पेंटागॉनचे प्रेस सेक्रेटरी जॉन किर्बी म्हणाले की, पाकिस्तानने हे विसरु नये की तो अजूनही जगाच्या इतर भागात दहशतवाद पसरवण्यास जबाबदार आहे. किर्बींच्या मते, अफगाणिस्तानमध्ये हवाई हल्ल्यांद्वारे दहशतवादाचा धोका कमी करण्याचा अमेरिकेला अजूनही अधिकार आहे. किर्बी म्हणाले की, अमेरिकेचं सैन्य 20 वर्षांच्या युद्धानंतर निघून मायदेशी परतलं असलं तरी दहशतवाद्यांवर हल्ला करण्याचा अधिकार अजूनही त्यांनी अबाधित ठेवला आहे.

पाकिस्तानबाबत प्रत्येक अंदाज खरा ठरला

किर्बीच्या मते, “आम्ही नेहमीच पाकिस्तानशी असलेल्या आमच्या चिंतेबद्दल प्रामाणिक आहोत आणि आजही हे सत्य कुणी नाकारु शकत नाही की पाकिस्तानच्या सीमा दहशतवाद्यांसाठी आश्रयस्थान आहेत.

पाकिस्तानवर आता जगाचं लक्ष

किर्बी म्हणाले की, ‘मला वाटतं की, हे खूप महत्वाचं आहे की, या सीमांवरील दहशतवादी संघटनांमुळे पाकिस्तानी लोकांनाही धोका आहे.’ पाकिस्तान अल कायदा आणि इतर दहशतवाद्यांना जागा पुरवतो. अमेरिकेने पाठिंबा दिलेल्या अफगाणिस्तानच्या अश्रफ गनी सरकारने आम्हाला अनेकदा सांगितलं आहे. किर्बी म्हणाले की, तालिबानी अतिरेक्यांना पाकिस्तान कसा लपवत आहे याबद्दल गनींनी अनेक वेळा जाहीरपणे आपली चिंता व्यक्त केली होती. विशेष म्हणजे पाकिस्तान दहशतवाद्यांना वैद्यकिय सुविधा पुरवत असल्याचीही माहिती गनींनी दिली होती.

हेही वाचा:

ऑस्ट्रेलियाच्या सीमा जगासाठी खुल्या, होम क्वारंटाईनची परवानगी, कोविशिल्डलाही मान्यता, ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांची मोठी घोषणा

निवडणूक प्रचारात अधिकची रक्कम खर्च, फ्रान्सच्या माजी राष्ट्रपतींना थेट 1 वर्षांची कोठडी, पॅरिस कोर्टाच्या निर्णयाने सार्कोझी गजाआड