Los Angeles Fire : नोरा फतेही जीव मुठीत घेऊन पळाली, पॅरिस हिल्टनसह हॉलिवूड सेलिब्रिटींची घरं धडाधडा जळाली, अनेक अभिनेत्रींना अश्रू अनावर

Los Angeles Hollywood Celebrities Fire : अमेरिकेत कॅलिफोर्नियातील आगीने विक्राळ रुप घेतले आहे. ही आग इतकी भयंकर आहे की जीव मुठीत घेऊन लोकांनी पळ काढला. अनेक हॉलिवूड सेलिब्रिटींची घरं धडाधड जळाली आहेत.

Los Angeles Fire : नोरा फतेही जीव मुठीत घेऊन पळाली, पॅरिस हिल्टनसह हॉलिवूड सेलिब्रिटींची घरं धडाधडा जळाली, अनेक अभिनेत्रींना अश्रू अनावर
| Updated on: Jan 10, 2025 | 11:24 AM

अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील आगीने रौद्ररूप दाखवले. या आगीचा फटका हॉलिवूडसह बॉलिवूडमधील सेलिब्रिटींना पण बसला. नोरा फतेहीला जीव मुठीत घेऊन पळावं लागलं तर, पॅरिस हिल्टनसह हॉलिवूड सेलिब्रिटींची घरं धडाधडा जळाली. या अग्निकांडात अनेकांची कोट्यवधींची बंगले बेचिराख झाले. डोक्यावरचं छप्पर गेल्याने अनेकांना अश्रू अनावर झाले. तर अनेकांन जीव मुठीत घेऊन पळ काढावा लागला.

2 लाखांहून अधिक जणांना काढावा लागला पळ

कॅलिफोर्नियातील या अग्निकांडात अनेकांची स्वप्न बेचिराख झाली. लॉस एंजेलिसमधील जंगलाला आग लागली. ती अधिक भयंकर झाली. या अग्निकांडामुळे या परिसरातील जवळपास 2 लाखांहून अधिक लोकांना घर सोडून पळावे लागले. गेल्या तीन दिवसांत 28 एकर जागेवरील वनसंपत्ती, मालमत्ता जळून खाक झाली आहे. यामध्ये आतापर्यंत 5 लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे.

Hollywood वर मोठे संकट

बॉलिवूड स्टार नोरा फतेह या ठिकाणी होती. त्यावेळी या परिसरात आगीचे रौद्ररूप दिसले. तीने या ठिकाणाहून काढता पाय घेतला. त्यावेळी तिने या भयंकर परिस्थितीची चित्रिकरण करत आगीची दाहकता आणि भीषणता समोर आणली. तर हॉलिवूड स्टार पॅरिस हिल्टन हिच्यासह अनेक स्टार्सचे बंगले जळून खाक झालीत. एक लाखाहून अधिक लोकांना पलायन करावे लागले आहे.

पॅरिस हिल्टन हिने या घटनेचे व्हिडिओ त्यांच्या एक्स खात्यावर शेअर केला आहे. त्यावर एक मोठी पोस्ट लिहिली आहे. यामध्ये तीने घराशी संबंधित तिच्या आठवणींना उजाळा दिला आहे. घर असे नष्ट होणे पाहणे हे क्लेशदायक आहे. त्यामुळे माझे मन बैचेन झाल्याचे तिने सांगितले. मी आतून पूर्णपणे तुटल्याचे तिने सांगितले.

हॉलिवूड हिल्स येथे जगातील सर्वात मोठी प्रोडक्शन हाऊस आहेत. त्यांचे स्टुडियो आहेत. ही सर्व स्टुडियो आता आगीच्या भक्ष्यस्थानी सापडतात की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 5 जागांवर ही आग आटोक्याबाहेर गेली आहे. तर काही भागात आगीवर नियंत्रण मिळवण्यात मोठे यश आले आहे. अग्निशमन दल सातत्याने आग विझवण्याचा प्रयत्न करत आहे.