US Midterm Election Result : जागतिक राजकारणातील महत्वाची घटना, अमेरिकेत मध्यावधी निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी हार

US Midterm Election Result : अमेरिकेत मध्यावधी निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना हार सहन करावी लागली आहे. हाउस ऑफ रिप्रेजेंटेटिव्समध्ये डोनाल्ड ट्रम्प एक पाऊल मागे गेले आहेत.

US Midterm Election Result :  जागतिक राजकारणातील महत्वाची घटना, अमेरिकेत मध्यावधी निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी हार
Donald trump
| Updated on: Nov 04, 2026 | 11:01 AM

अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीत राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे. रिपब्लिकन पार्टीला पराभवाचा सामना करावा लागला आहे. डेमोक्रॅटिक पार्टीने अमेरिकी प्रतिनिधी सभेत (हाउस ऑफ रिप्रेजेंटेटिव्स) बहुमत मिळवलं आहे. रिपब्लिकन पार्टीची पिछेहाट झाली आहे. या दरम्यान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पराभव मान्य केला आहे. डेमोक्रॅट्स सोबत काम करायला तयार असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. “मी निवडणुकीच्या मैदानात नव्हतो, नाहीतर माझा पक्ष मोठ्या बहुमताने जिंकला असता” असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. त्यांनी अमेरिकी मतदाराचे आभार मानले. एका अमेरिकन वृत्तवाहिनीवर बोलताना ट्रम्प यांनी निवडणूक निकाल मान्य केला. डेमोक्रॅट्ससोबत मिळून काम करणार असल्याचं त्यांनी म्हटलं. या निकालाबद्दल त्यांना काही एक पश्चाताप नाहीय.

वर्ष 2023 मध्ये हाउस ऑफ रिप्रेजेंटेटिव्सवर रिपब्लिकन पार्टीचं नियंत्रण होतं. महागाई वाढणं हा अमेरिकन मतदारांसाठी चिंतेचा विषय आहे. इराण युद्ध आणि राष्ट्रपती ट्रम्प यांनी लावलेल्या टॅरिफमुळे अमेरिकेत दैनंदिन खर्चात वाढ झाली. अमेरिकेत हाउस ऑफ रिप्रेजेंटेटिव्सच्या 435 जागांसाठी निवडणूक झाली. त्याआधी हाऊसमध्ये सध्या रिपब्लिकन पक्षाचे 218, एक अपक्ष आणि 214 डेमोक्रॅट्स सदस्य होते. दोन सीट्स रिकाम्या होत्या. डेमोक्रॅट्सनी रिपब्लिकन्सकडे असलेल्या काही जागा जिंकल्या आहेत. अपेक्षा नव्हती अशा काही जागांवर कडवी लढत दिली.

Loading...

महत्वाच्या जागांवर बाजी पलटली

डेमोक्रॅट्सनी अनेक महत्वाच्या जागांवर बाजी पलटली. नॉर्थ कॅरोलिनामध्ये असा एक जिल्हा जिंकलाय, जिथे मागच्या 15 वर्षांपासून रिपब्लिकन्सची सत्ता होती. त्या शिवाय पेंसिल्वेनिया, केंटकी आणि कोलोराडो सारख्या राज्यात सीट्स जिंकल्या. टेक्सास आणि फ्लोरिडामध्ये आघाडी घेण्यासाठी रिपब्लिकन्सनी सीमा नव्याने आखल्या होत्या. पण तरीही डेमोक्रॅट्सनी विजय मिळवला.

सीनेटमध्ये बहुमताचा आकडा किती

भारतीय वेळेनुसार, सकाळी 10 वाजता डेमोक्रॅटिक पार्टीने सीनेटच्या 50 जागा जिंकल्या. ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पार्टीने 39 जागा जिंकल्या आहेत. डेमोक्रॅट्सना बहुमतासाठी एका जागेची आवश्यकता आहे. हा आकडा ते सहज पार करतील. कारण पाच जागांवर अजूनही डेमोक्रॅट्सकडे आघाडी आहे. सीनेटमध्ये एकूण 100 जागा आहेत. प्रत्येक राज्यातून दोन सीनेटर निवडले जातात. सीनेटर्सचा कार्यकाळा सहावर्षांचा असतो. सीनेटमध्ये बहुमताचा आकडा 51 आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us