AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगाला ज्याची भीती तेच घडले, डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी धमकी, थेट आर्थिक..

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून तूफान चर्चेत आहेत. त्यामध्येच आता त्यांनी जगातील अनेक देशांना मोठा इशारा दिला. इराणला मदत करणाऱ्या देशांना त्यांनी मोठा इशारा दिला. ज्याने एकच खळबळ उडाली.

जगाला ज्याची भीती तेच घडले, डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी धमकी, थेट आर्थिक..
Donald Trump
| Updated on: Aug 20, 2026 | 7:03 AM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील सर्व देशांना अत्यंत मोठा इशारा दिला. ज्याने एकच खळबळ उडाली. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट म्हटले की, जर कोणत्याही देशाने इराणला मदत केली तर त्याच्या वाईट परिणामांना सामोरे जावे लागेल. अमेरिकेने युद्ध शांत झाल्यानंतर इराणला आर्थिक कोंडीत पकडण्यासाठी मोठी पाऊले उचलली आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिले की, इराणला मदत करणारा देश कारवाई पासून वाचू शकणार नाहीये. कोणत्याही देशाच्या आर्थिक संस्था, कंपन्या, एअरपोर्ट, सरकारी एजन्सी किंवा अन्य संस्था यांच्याकडून कोणत्याही म्हणजे कोणत्याही प्रकारची मदत इराणला करण्यात आली तर त्या देशाला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागेल. यादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट इशारा दिला. पण यावेळी त्यांनी कोणत्याही देशाचे नाव घेतले नाही.

आर्थिक व्यवहार, तेल तस्करी, जहाजांची खरेदी किंवा इराणसोबत कोणताही व्यवहार करणाऱ्या देशावर कारवाई केली जाईल. इराणच्या सर्व मदती थांबवल्या पाहिजेत. इराणला कोणत्याही पद्धतीने मदत करणाऱ्या देशाला सोडले जाणार नसल्याचे स्पष्टपणे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले. यादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी हे देखील सांगितले की, युद्धबंदीचा त्यांना अनेकदा प्रस्ताव पाठवण्यात आला.

पण तो त्यांनी स्वीकार केला नाही. त्यांनी पुन्हा म्हटले की, इराणकडे कोणत्याही पद्धतीने परमाणु शस्त्र राहणार नाहीत. डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेला इशारा फक्त इराणपुरताच मर्यादित नाही तर जे देश इराणसोबत आर्थिक व्यवहार करतात, त्यांच्याकरिताही आहे. रशिया इराणला मदत करत असल्याचा आरोप वारंवार केला जात आहे.

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढला की, याचा थेट परिणाम भारतावर होतो. भारतात येणारे कच्चे तेल होर्मुज खाडीतून येते. इराणविरोधात काही महिने युद्ध अमेरिकेने केले. मोठे हल्ले इराणच्या अनेक भागात करण्यात आली. मात्र, इराणनने शेवटपर्यंत हार मानली नाही. इराणला कसे आर्थिक कोडींत पकडता येईल, याकरिता आता अमेरिका प्रयत्न करत आहे.

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?