डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा पश्चात्ताप, थेट मान्य केली ती भयंकर चूक, अखेर गुडघे टेकवत..

इराण आणि अमेरिका युद्धाने जग वैतागले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी लवकरात लवकर युद्धबंदीची घोषणा करावी, अशी जगाची इच्छा आहे. या युद्धात रशियावर काही आरोप करण्यात आले. यादरम्यानच मोठ्या घडामोडी रशिया आणि अमेरिकेत घडत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे विधान केले.

डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा पश्चात्ताप, थेट मान्य केली ती भयंकर चूक, अखेर गुडघे टेकवत..
Donald Trump
| Updated on: Apr 25, 2026 | 1:10 PM

इराण आणि अमेरिका युद्धात होर्मुज खाडीत घडामोडी घडताना दिसत आहेत. होर्मुज खाडी अशांत आहे. आंतरराष्ट्रीय राजनैतिक घडामोडींमध्ये एक नवीन वळण येत आहे. या काळात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन थेट अमेरिकेला भेट देऊ शकतात. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन डिसेंबरमध्ये मियामी येथे होणाऱ्या G 20 शिखर परिषदेत सहभागी होऊ शकतात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निमंत्रणानंतर पुतिन यांच्या अमेरिका दाैऱ्याबद्दल चर्चा रंगताना दिसत आहे. पुतिन काही दिवसांपूर्वीच भारत दाैऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी अत्यंत मोठ्या घोषणा केल्या. इराणसोबतच्या युद्धात अमेरिका एकटी पडल्याचे बघायला मिळाले. अमेरिकेने G 20 बैठकीचे आयोजन केले. त्यांनी रशियाला औपचारिकपणे आमंत्रित केले आहे. मात्र, मॉस्कोने हे निमंत्रण अजून तसे स्विकारले नाही. पुतिन बैठकीला उपस्थित राहणार की नाही, याबाबत स्पष्टता मिळू शकली नाही.

G 20 शिखर संमेलनात 2019 मध्ये पुतिन हजर होते. यानंतर कोरोना आणि युद्ध यामुळे रशियाचे काही देशांसोबत संंबंध ताणले आणि पुतिन यांनी G 20 शिखर संमेलनाकडे पाठ फिरवली. यादरम्यानच डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाने भुवया उंचाव्यात असे थेटपणे विधान केले. डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच म्हटले की, रशियाला G 8 मधून वगळणे ही एक चूक होती.

हेच नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, जागतिक समस्या या फक्त आणि फक्त संवादातूनच सोडवल्या जाऊ शकतात. सध्याची परिस्थिती बघता पुतिन प्रत्यक्षात शिखर परिषदेला उपस्थित राहतील की नाही याबाबत शंका आहे. ते आपल्या प्रतिनिधी पाठवू शकतात. जी 20 सदस्य देश म्हणून रशियाला सर्व बैठकांमध्ये आमंत्रित केले जाईल, अशी भूमिका अमेरिकेने स्पष्ट केली.

रशिया आणि युक्रेन युद्धात अमेरिका मध्यस्थी करत होती. मात्र, अमेरिकेनेच युद्ध पेटवून दिल्याचा आरोप केला जातो. या युद्धादरम्यान अमेरिका आणि रशिया यांच्यातील संबंध तणावात होते. मात्र, आता पुन्हा एकदा अमेरिकेला रशियाची आठवण आली. आता अमेरिकेच्या निमंत्रणानंतर पुतिन अमेरिकेत शिखर समेंलनासाठी दाखल होतात, हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे. याबाबत अजून तरी रशियाने कोणतीही भूमिका घेतली नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us