जगाची उडाली झोप, डोनाल्ड ट्रम्प यांची खळबळ उडवणारी धमकी, इराणला काहीच..
इराण आणि अमेरिका युद्ध पेटले आहे. त्यामध्येच डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाची झोप उडवणारी धमकी इराणला दिली. ज्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी काही वेळ इराणकडे असल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे.

इराण अमेरिका युद्ध टोकाला पोहोचले आहे. पाकिस्तान युद्धात मध्यस्थी करत आहे. मात्र, युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही. दोन्ही बाजूंनी धमक्या देणे सुरू आहे. होर्मुज खाडीत जहाजे मध्ये मध्ये जाताना दिसत आहेत. मात्र, इराणकडून होर्मुज खाडी बंदच ठेवण्यात आली. अमेरिकाही नाकेबंदी उठवण्यास तयार नाही. होर्मुज खाडीत इराणचे नियंत्रण आहे. मात्र, अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे इराणचे जहाज ये-जा करू शकत नाही. इराण आणि अमेरिकेच्या युद्धाला आता दोन महिने उलटत आहेत. मात्र, असे असतानाही युद्ध काही थांबत नाहीये. इराण इतक्या घातकपणे लढेल, याचा विचारही अमेरिकेने केला नव्हता. हे युद्ध फार तर फार चार आठवडे चालेल असा अंदाज डोनाल्ड ट्रम्प यांचा होता. त्यामध्येच इराणकडून होर्मुज खाडी बंद करण्यात आली. इराणने होर्मुज खाडी बंद केल्याने जागतिक बाजारात तेलाच्या किमती सातत्याने वाढत आहेत. ऊर्जेचे एक वेगळे संकट जगावर आहे.
यादरम्यानच डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मोठा इशारा दिला. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, इराणला योग्य प्रकारे वाटाघाटी कशा करायच्या हे माहिती नाही. त्यांनी व्यवस्थित वागले पाहिजे. इराणला इशारा देत त्यांनी म्हटले की, इराणला लवकरच अण्वस्त्रविरहित करार करावा लागेल, अन्यथा त्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल.
या पोस्टसोबत डोनाल्ड ट्रम्प यांचा शस्त्र हातात घेतलेला एक फोटो देखील शेअर करण्यात आला. आता आणखी चांगलेपणा नाही असे कॅप्शन देण्यात आले. आता युद्ध अधिक पेटण्याची शक्यता डोनाल्ड ट्रम्प यांच्या या पोस्टनंतर स्पष्टपणे दिसत आहे. इराण आणि अमेरिका युद्धात आणखीन ठिंगणी पडू शकते. दोन्ही देश माघार घेण्यास अजिबात तयार नाहीत.
इराणकडून अमेरिकेला या युद्धात मोठा प्रस्ताव अगोदरच देण्यात आला. इराणकडून स्पष्ट सांगण्यात आले की, आम्ही होर्मुज खाडी खुली करण्यास तयार आहोत. त्याकरिता तुम्हाला देखील नाकेबंदी हाटवावी लागेल. मात्र, इराण सध्याच्या परमाणूच्या मुद्द्यावर चर्चा करण्यास तयार नाही. मात्र, इराणने दिलेल्या प्रस्ताव अमेरिकेला मान्य नसल्याचे यावरून आता स्पष्ट दिसत आहे. त्यामध्ये आता पुन्हा एकदा धमकी देण्यात आली.