AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बांधकामाचा क्रेन अंगावर धाडकन कोसळला, घरी निघालेल्या पोलीस हवालदारावर काळाचा घाला, कुटुंबाचा आक्रोश

Mumbai News : मानखुर्द येथे बीएमसीच्या पूल बांधकामाच्या ठिकाणी ड्रिलिंग मशीन कोसळून झालेल्या एका दुर्दैवी अपघातात पोलीस हवालदार संतोष चव्हाण यांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू केला आहे.

बांधकामाचा क्रेन अंगावर धाडकन कोसळला, घरी निघालेल्या पोलीस हवालदारावर काळाचा घाला, कुटुंबाचा आक्रोश
Mankhurd AccidentImage Credit source: TV 9 Marathi
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Apr 29, 2026 | 8:41 PM
Share

मुंबईतील मानखुर्द परिसरात बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी क्रेन कोसळून एका पोलीस कर्मचाऱ्याचा काल रात्री दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मुंबई पुणे हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. वाहनांच्या 10 किलोमीटर लांब रांगा लागल्या होत्या. काल संध्याकाळी क्रेन पडल्याची घटना घडली होती मात्र अजूनही परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

ड्रिलिंग मशीन अंगावर पडून पोलीस हवालदाराचा मृत्यू

मानखुर्द परिसरात बीएमसीच्या उड्डाणपुलाच्या बांधकाम स्थळावर ड्रिलिंग मशीन अंगावर पडून एका पोलीस हवालदाराचा मृत्यू झाला आहे. मृत हवालदाराची ओळख संतोष चव्हाण अशी असून, ते नेहरू नगर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. अपघात घडला तेव्हा ते घरी जात होते. ड्रिलिंग मशीन ही असमान पद्धतीने जमिनीवर बवल्याने भूस्खलन होऊन ही ड्रिलिंग मशीन उलटली असावी, असा संशय आहे. याबाबत कंत्राटदाराला जबाबदार ठरवण्यात आलं आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानखुर्द पोलीस ठाण्यात कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल केला जात आहे.

याआधीही अनेक घटना

काही दिवसांपुर्वी बीकेसीतील एशियन हॉर्ट रुग्णालयाजवळ, गर्डर बसवताना सुमारे 400 टन वजनाची क्रेन उलटली होती. यांत्रिक बिघाडामुळे ही दुर्घटना झाली, परंतु सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नव्हती, यापुर्वी 14 फेब्रूवारीला मुलुंड एलबीएस मार्गावर मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले होते. अशा घटना घडणार नाहीत असं आश्वासन देण्यात आलं मात्र वास्तव काहीतरी वेगळंच आहे.

आरोपींची सखोल चौकशी करण्याची मागणी

मानखुर्दमधील या घटनेनंतर मुंबई पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली आहे. परिसरातील सुरक्षा नियमांचे पालन झाले होते का, याचीही तपासणी केली जात आहे. आता या घटनेतील आरोपींची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. या घटनेनंतर संतोष चव्हाण चव्हाण यांच्या कुटुंबीयांनी आक्रोश केला.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा