MI vs SRH Score Updates and Highlights, IPL 2026: सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सला नमवलं, 6 विकेट्स राखून पराभव
Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad Indian Premier League 2026 Score and Updates In Marathi : मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी वानखेडे स्टेडियममध्ये निराशा केली. फलंदाजांनी 243 धावांचा डोंगर उभारला होता. तरी सुद्धा मुंबईचे गोलंदाज सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध 243 धावांचा बचाव करणयात अपयशी ठरले.

मुंबई इंडियन्सला हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात आयपीएल 2026 स्पर्धेत पुन्हा एकदा पराभूत व्हांव लागलं आहे. मुंबईने बुधवारी 29 एप्रिलला वानखेडे स्टेडियममध्ये रायनरिकेल्टन याने केलेल्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादसमोर 244 धावांचं आव्हान ठेवलं होतं. त्यामुळे चाहत्यांना मुंबई कमबॅक करुन विजयी ट्रॅकवर परतेल, अशी आशा होती. मात्र मुंबईने पुन्हा एकदा निराशा केली आणि पराभवाची मालिका कायम ठेवली. हैदराबादने 244 धावांचं आव्हान 18.4 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं. हैदराबादने अशाप्रकारे 19 व्या मोसमातील आपला सहापवा विजय साकारला. तर मुंबईचा वानखेडे स्टेडियममधील सलग चौथा तसेच एकूण सहावा पराभव ठरला.
LIVE Cricket Score & Updates
-
MI vs SRH Live Score Updates : सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सला नमवलं, 6 विकेट राखून पराभव
सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सची दाणादाण उडवून दिली. मुंबई इंडियन्सने विजयासाठी 244 धावांचं आव्हान दिलं होतं. पण हे आव्हान सनरायझर्स हैदराबादने 19व्या षटकातच पूर्ण केलं. मुंबई इंडियन्सचा या स्पर्धेतील सहावा पराभव ठरला. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात 243 धावांचा पाठलाग केल्याने चौथी मोठी धावसंख्या गाठली आहे.
-
MI vs SRH Live Score Updates : नितीश रेड्डीच्या रुपाने चौथा धक्का, पण मुंबईच्या हातून सामना जवळपास निसटला
नितीश कुमार रेड्डीच्या रुपाने चौथा धक्का सनरायझर्स हैदराबादला बसला. पण तिथपर्यंत मुंबई इंडियन्सच्या हातून सामना निसटल्याचं दिसत आहे. हैदराबादला 22 चेंडूत 31 धावांची गरज आहे.
-
-
MI vs SRH Live Score Updates : हेनरिक क्लासेनची अर्धशतकी खेळी
हेनरिक क्लासनने 22 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. या खेळीसह मुंबईच्या हातून सामना निसटण्यास सुरुवात झाली आहे. कारण चेंडू आणि धावांमधील अंतर कमालीचं कमी झालं आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स संघ पराभवाच्या वेशीवर उभा आहे.
-
MI vs SRH Live Score Updates : हेनरिक क्लासेन-नितीश रेड्डी जोडी जमली, मुंबई इंडियन्स पराभवाच्या दिशेने
सनरायझर्स हैदराबादचे तीन विकेट झटपट पडल्यानंतर हेनरिक क्लासेन आणि नितीश रेड्डी जोडी जमली आहे. त्यामुळे प्रत्येक चौकार षटकारानंतर मुंबईच्या हातून विजय निसटत आहे. हैदराबादला विजयासाठी 36 चेंडूत 55 धावांची गरज आहे.
-
MI vs SRH Live Score Updates : डोकेदुखी ठरलेला ट्रेव्हिस हेड बाद
ट्रेव्हिस हेडच्या रूपाने सनरायझर्स हैदराबादला तिसरा धक्का बसला आहे. ट्रेव्हिस हेडने 30 चेंडूत 76 धावांची खेळी केली. मैदानात आणखी तग धरून असता तर कठीण गेलं असतं. पण त्याची विकेट हार्दिक पांड्याने काढली.
-
-
MI vs SRH Live Score Updates : अभिषेक शर्मानंतर इशान किशन बाद
अभिषेक शर्मानंतर सनरायझर्स हैदराबादला दुसरा धक्का बसला आहे. इशान किशन पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्याला खातंही खोलता आलं नाही. गझनफरच्या गोलंदाजीवर कट शॉट मारताना बॅटला लागून चेंडू स्टंपवर आदळला.
-
MI vs SRH Live Score Updates : अभिषेक शर्मा बाद
अभिषेक शर्माला बाद करण्यात मुंबई इंडियन्सचा फिरकीपटू गझनफरला यश मिळालं आहे. अभिषेक शर्माने 24 चेंडूत 45 धावा केल्या आणि बाद झाला. सनरायझर्स हैदराबाद 129 धावांवर पहिला धक्का बसला.
-
MI vs SRH Live Score Updates : मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची हतबलता
मुंबई इंडियन्सने विजयासाठी 243 धावांचं आव्हान ठेवलं असताना सनरायझर्स हैदराबादने आक्रमक फलंदाजी सुरूवात केली आहे. पावरप्लेमध्ये एकही गडी न गमावता 92 धावांची खेळी केली. त्यामुळे मुंबई इंडियन्सचे गोलंदाज पुरते हतबल झाले आहेत.
-
MI vs SRH Live Score Updates : हैदराबादची आक्रमक सुरुवात, हेड-अभिषेककडून धुलाई, मुंबई अडचणीत
अभिषेक शर्मा आणि ट्रेव्हीस हेड या सलामी जोडीने 244 धावांचा पाठलाग करताना हैदराबादला आक्रमक सुरुवात करुन दिली आहे. हैदराबादने 4 ओव्हरमध्ये बिनबाद 62 धावा केल्या आहेत. अभिषेक 24 आणि हेड 30 रन्सवर नॉट आऊट खेळत आहेत.
-
MI vs SRH Live Score Updates : हैदराबादच्या बॅटिंगला सुरुवात, अभिषेक-ट्रॅव्हीस सलामी जोडी मैदानात, 244 रन्सचं टार्गेट
हैदराबादच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हीस हेड सलामी जोडी मैदानात आली आहे. मुंबईने हैदराबादसमोर 244 रन्सचं टार्गेट ठेवलं आहे.
-
MI vs SRH Live Score Updates : हैदराबादसमोर 244 रन्सचं टार्गेट, मुंबई इंडियन्स रोखणार?
रायन रिकेल्टन याने केलेल्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने सनरायजर्स हैदराबादसमोर 244 रन्सचं टार्गेट ठेवलं आहे. मुंबईने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 243 धावा केल्या. तर रायनने नॉट आऊट 123 धावा केल्या. त्यामुळे हैदराबादला जिंकायचं असेल तर त्यांना प्रत्येक ओव्हरमध्ये 12.20 च्या रनरेटने धावा कराव्या लागणार आहेत.
-
MI vs SRH Live Score Updates : मुंबईला पाचवा धक्का, तिलक वर्मा आऊट
सनरायजर्स हैदराबादने मुंबईला पाचवा झटका दिला आहे. तिलक वर्मा 20 व्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर कॅच आऊट झाला. तिलकने 7 धावा केल्या आणि मैदानाबाहेरचा रस्ता धरला.
-
MI vs SRH Live Score Updates : मुंबईला चौथा झटका, कॅप्टन हार्दिक आऊट
मुंबई इंडियन्सने चौथी विकेट गमावली आहे. हार्दिक पंड्या याच्या रुपात मुंबईने चौथी विकेट गमावली आहे. हार्दिकने 15 बॉलमध्ये 31 रन्स केल्या. त्यामुळे मुंबईची 18.1 ओव्हरमध्ये 4 आऊट 221 अशी स्थिती झाली आहे.
-
MI vs SRH Live Score Updates : रायन रिकेल्टन याचं शतक, मुंबई द्विशतकाच्या दिशेने
रायन रिकेल्टन याने मुंबई इंडियन्ससाठी शतक झळकावलं आहे. रायनने वानखेडे स्टेडियममध्ये 44 बॉलमध्ये शतक ठोकलं आहे. रायनचं हे आयपीएल कारकीर्दीतील पहिलं शतक ठरलं.
-
MI vs SRH Live Score Updates : मुंबईला तिसरा झटका, नमन धीर आऊट
प्रफुल हिंगे याने नमन धीर आणि रायन रिकेल्टन ही सेट जोडी फोडून मुंबईला एकूण तिसरा झटका दिला आहे. प्रफुलने नमन धीर याला हर्ष दुबे याच्या हाती कॅच आऊट केलं. नमनने 17 बॉलमध्ये 22 रन्स केल्या.
-
MI vs SRH Live Score Updates : लोकल बॉय सूर्यकुमार यादव पुन्हा अपयशी, मुंबईला दुसरा धक्का
लोकल बॉय सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा अपयशी ठरला आहे. सूर्यकुमार यादव सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध 5 धावांवर आऊट झाला. एशानने सूर्याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.
-
MI vs SRH Live Score Updates : मुंबईला तडाखेदार सुरुवातीनंतर पहिला झटका, विल जॅक्स आऊट
मुंबईला तडाखेदार सुरुवातीनंतर पहिला झटका सालगा आहे. नितीश कुमार रेड्डी याने विल जॅक्स आणि रायन रिकेल्टन ही सेट जोडी फोडली. नितीशने आठव्या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर विल जॅक्स याला आऊट केलं. विलने 22 बॉलमध्ये 46 रन्स केल्या.
-
MI vs SRH Live Score Updates : विल-रायनची अर्धशतकी भागीदारी, मुंबईची आक्रमक सुरुवात
विल जॅक्स आणि रायन रिकेल्टन या सलामी जोडीने मुंबईला आक्रमक सुरुवात करुन दिली आहे. विल आणि रायन या दोघांनी पहिल्या 5 ओव्हरमध्ये 60 धावा जोडल्या आहेत. रायन 20 तर विल 37 रन्सवर नॉट आऊट खेळत आहेत.
-
MI vs SRH Live Score Updates : मुंबईच्या सलामी जोडीची कमाल, विल-रायनकडून विस्फोटक सुरुवात
विल जॅक्स आणि रायन रिकेल्टन या नव्या सलामी जोडीने मुंबई इंडियन्सला जबरदस्त अशी सुरुवात मिळवून दिली आहे. मुंबईने 3 ओव्हरमध्ये 37 रनस जोडल्या आहेत. विल 17 आणि रायन 19 रन्सवर नॉट आऊट खेळत आहे.
-
MI vs SRH Live Score Updates : मुंबईची बॅटिंग, विल जॅक्स-रायन रिकेल्टन सलामी जोडी मैदानात
मुंबई विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद सामन्याला सुरुवात झाली आहे. मुंबईने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. मुंबईसाठी रायन रिकेल्टन आणि विल जॅक्स ही सलामी जोडी मैदानात आली आहे.
-
MI vs SRH Live Updates : मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : रायन रिकेल्टन (विकेटकीपर), विल जॅक्स, नमन धीर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कॅप्टन), रॉबिन मिन्झ, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, अल्लाह गझनफर आणि अश्वनी कुमार.
-
MI vs SRH Live Updates : सनरायजर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन
सनरायजर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन : अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, हेनरिक क्लासेन, सलील अरोरा (विकेटकीपर), नितीश कुमार रेड्डी, पॅट कमिन्स (कर्णधार), हर्ष दुबे, साकिब हुसेन, प्रफुल हिंगे आणि एशान मलिंगा.
-
MI vs SRH Live Updates : मुंबईने हैदराबाद विरुद्ध टॉस जिंकला, बॅटिंगचा निर्णय
सनरायजर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आहे. मुंबईचा कॅप्टन हार्दिक पंड्या याने बँटिंगचा निर्णय घेतला आहे.
-
MI vs SRH Live Updates : मुंबईसमोर हैदराबादचं आव्हान, वानखेडेत कोण जिंकणार? थोड्याच वेळात टॉस
मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस होणार आहे. आता नाणेफेकीचा कौल कुणाच्या बाजूने लागतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
-
MI vs SRH Live Updates : मुंबई हैदराबादवर वरचढ, पाहा हेड टु हेड रेकॉर्ड्स
मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबादवर वरचढ असल्याचं स्पष्ट होतं. उभयसंघात बुधवारी होणारा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील 26 वा सामना असणार आहे. मुंबईने 25 पैकी सर्वाधिक 15 सामने जिंकले आहेत. तर हैदराबादने मुंबई विरुद्ध 10 सामन्यांत विजय मिळवला आहे.
-
MI vs SRH Live Updates : सनरायजर्स हैदराबाद टीम
सलील अरोरा (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन, हेनरिक क्लासेन, नितीशकुमार रेड्डी, अनिकेत वर्मा, शिवांग कुमार, साकिब हुसेन, प्रफुल्ल हिंगे, एशान मलिंगा, स्मरण रविचंद्रन, लियाम लिव्हिंगस्टोन, हर्ष दुबे, हर्षल पटेल, कामिंदू मेंडीस, जयदेव उनाडकट, झीशान अन्सारी, शिवम मावी, जेराल्ड कोएत्झी, दिलशान मदुशंका, क्रेन्स फुलेत्रा, ओंकार तरमाळे आणि अमित कुमार.
-
MI vs SRH Live Updates : मुंबई इंडियन्स टीम
मुंबई इंडियन्स टीम : हार्दिक पंड्या (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), नमन धीर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, शेरफेन रदरफोर्ड, केशव महाराज, जसप्रीत बुमराह, क्रिश भगत, अल्लाह गझनफर, अश्वनी कुमार, विल जॅक्स, राज बावा, शार्दुल ठाकूर, दानिश मालेवार, मयंक रावत, कॉर्बिन बॉश, रघु शर्मा, रोहित शर्मा, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, मयंक मार्कंडे, रायन रिकेल्टन, रॉबिन मिन्झ आणि मोहम्मद सलाहुद्दीन इझार.
-
MI vs SRH Live Updates : मुंबई-हैदराबाद आमनेसामने, पलटण ऑरेंज आर्मीला पराभूत करणार?
मुंबई इंडियन्स घरच्या मैदानात वानखेडे स्टेडियममध्ये आपल्या मोहिमेतील आठव्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध 2 हात करणार आहे. हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करणार आहे. तर पॅट कमिन्स सनरायजर्स हैदराबादच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे.
Published On - Apr 29,2026 5:57 PM
