AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaibhav Sooryavanshi : आयपीएलमध्ये वैभव सूर्यवंशीला जे जमलं ते त्याला श्रीलंकेत का जमत नाहीय? त्यामागे एकच कारण

Vaibhav Sooryavanshi : टीम इंडिया A येत्या रविवारी श्रीलंका A विरुद्ध तिरंगी मालिकेतील फायनल खेळणार आहे. मागच्या सामन्यात मैदानावर जे घडलं, त्याचा हिशोब चुकता करण्याची टीम इंडियाकडे संधी आहे. त्या शिवाय वैभव सूर्यवंशीकडे सध्याच्या स्थितीत ही शेवटची संधी असू शकते.

Vaibhav Sooryavanshi : आयपीएलमध्ये वैभव सूर्यवंशीला जे जमलं ते त्याला श्रीलंकेत का जमत नाहीय? त्यामागे एकच कारण
Vaibhav sooryavanshi Image Credit source: PTI
| Updated on: Jun 19, 2026 | 3:28 PM
Share

टीम इंडियाचं उज्वल भविष्य म्हणून वैभव सूर्यवंशीकडे पाहिलं जातं. आयपीएलमध्ये त्याने चमकदार प्रदर्शन केलं. त्यानंतर सिनियर भारतीय संघाचे दरवाजे त्याच्यासाठी उघडले. टीम इंडियात त्याची निवड झाली. इंग्लंड आणि आर्यलंड दौऱ्यात वैभव सूर्यवंशी टी20 टीमचा भाग आहे. पण या टूरआधी भारतीय अ संघाचा श्रीलंका दौरा सुरु आहे. या टूरवर वैभव सूर्यवंशीला अजून अपेक्षित प्रदर्शन करता आलेलं नाही. खेळापेक्षा वादामुळे वैभवचं नाव जास्त गाजतय. रविवारी श्रीलंका अ विरुद्धची फायनल वैभव सूर्यवंशीसाठी एक शेवटची संधी आहे. श्रीलंकेतील पीचेस भारत आणि पाकिस्तानपेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत. श्रीलंकेतील खेळपट्ट्या गोलंदाजाला अनुकूल असतात. पीचकडून बॉलरला मदत मिळते. वेगवान गोलंदाज आणि स्पिनर दोघांना मदत मिळते. भारत-पाकिस्तानच्या तुलनेत श्रीलंकेत काही मैदानात सीमारेषा लांब असते.

सिनियर टीम इंडियाकडून पदार्पण करण्याऐवजी श्रीलंकेचा दौरा वैभव सूर्यवंशीसाठी महत्वाचा होता. आयपीएलमध्ये वैभवने 776 धावा केल्या. यात 16 सामन्यात वैभवने 72 सिक्स मारले. पण श्रीलंकेत वैभवला असं प्रदर्शन करणं जमत नाहीय. आतापर्यंत 50 ओव्हरच्या चार सामन्यात वैभवने 14, 44, 21 आणि 38 धावा केल्या आहेत. अफगाणिस्तान अ विरुद्ध त्याने 44 आणि 38 धावा केल्या. तेच श्रीलंकेविरुद्ध त्याला फक्त 14 आणि 21 धावाचं करता आल्या.

वैभवचं काय चुकतय?

वैभव वाट्टेल तसे फटके मारुन विकेट गमावतोय असं नाहीय. तो खेळपट्टीवर थांबण्याचा प्रयत्न करतोय. पण त्याला त्याच्या शॉट सिलेक्शनमध्ये अजून सुधारणा करावी लागेल. आयपीएलमध्ये सपाट विकेट असतात, त्यामुळे तो त्याच्या हिशोबाने बॅट फिरवू शकतो. पण श्रीलंकेत असं नाहीय. त्याला अजून जास्त संयम दाखवावा लागेल. चारपैकी दोनवेळा तो शॉर्ट पीच चेंडूवर आऊट झाला. ही चिंतेची बाब आहे. आयपीएलमध्ये सुद्धा तो काहीवेळा शॉर्ट पीच चेंडूंवर बाद झालाय.

हे अपयश धुवून काढावंच लागेल

रविवारी भारतीय अ संघाचा श्रीलंका अ विरुद्ध सामना आहे. कदाचित वैभवकडे श्रीलंकेत स्वत:ला सिद्ध करायची ही शेवटची संधी असेल. आतापर्यंत जे झालं ते झालं. पण बॅटिंगच्या तंत्रात काही चुकीचं नाहीय हे वैभवला दाखवून द्यावं लागेल. अजून एकदा वैभव अपयशी ठरला, तर कदाचित त्यांचा टीम इंडियाकडून डेब्यू लांबू शकतो. त्याला देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळावं लागेल. त्यामुळे 21 तारखेच्या फायनलमध्ये वैभवला हे सगळं अपयश धुवून काढावं लागेल.

Follow Us
तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत...
Lalbaugcha Raja : तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत तक्रार, अन् उद्या हायकोर्टात...
मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात!
Amit Thackeray : मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात! फडणवीसांचा जुना VIDEO दाखवत अमित ठाकरेंचा सवाल
मसाल्यांच्या बाजारात स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
Goldie Group : मसाल्यांच्या बाजारात गोल्डी ग्रुपचा नवा धमाका; स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोल...
Mumbai High Court : सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोलवाद्यांवरही कोर्टाचा दणका
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले
Sanjay Shirsat : दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले; अंबादास दानवेंकडून VIDEO ट्विट करत शिरसाट यांच्यावर टीका
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
NCP : दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही
Maharashtra Drought : बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही, पुढे म्हणाले...
डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने...
Mira Bhayandar : डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला दंड केल्याचा आरोप; प्रशासन ॲक्शन मोडमध्ये
पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल
Manoj Jarange : पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल; पुढे म्हणाले...
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी....
Shivsena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी पुढे ढकलली, नवी तारीख काय?