AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोणालाच विशेष सवलत मिळणार नाही…बीसीसीआय आक्रमक; विराट-रोहितबाबात अखेर ‘तो’ निर्णय घेणारच

विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोन्ही खेळाडू 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकात खेळणार की नाही याबद्दल टांगती तलवार आहे. आता यावरच बीसीसीआयने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

कोणालाच विशेष सवलत मिळणार नाही...बीसीसीआय आक्रमक; विराट-रोहितबाबात अखेर 'तो' निर्णय घेणारच
virat kohli and rohit sharma
| Updated on: Jun 19, 2026 | 5:38 PM
Share

सध्या भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात एकदिवसीय मालिका सुरु आहे. या मालिकेतील दोन सामने पार पडले आहेत. तिसरा आणि शेवटचा सामना हा 20 जून 2026 रोजी खेळवला जाईल. या मालिकेत फक्त रोहित शर्मा खेळताना दिसत आहे. विराट कोहलीला दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडावे लागले. आता यातच पुन्हा एकदा रोहित शर्मा आणि विराट कोहलीबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे. ते दोघेही 2027 वर्ल्ड कपमध्ये खेळणार की नाही हा प्रश्न सगळ्यांचा पडला आहे. तर याबाबत आता बीसीसीआयने प्रतिक्रिया दिली आहे.

बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकासाठीच्या भारताच्या योजनांवर सार्वजनिकरित्या चर्चा करण्यास नकार दिला आहे. संघाच्या दीर्घकालीन आराखड्याबाबतची चर्चा ही एक अंतर्गत बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

कोहली आणि रोहितच्या भविष्यावर चर्चा भारताने 2025 ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यापासून कोहली आणि रोहित यांचे एकदिवसीय क्रिकेटमधील भविष्य चर्चेचा विषय बनले आहे. या दोन्ही वरिष्ठ खेळाडूंनी 2027च्या विश्वचषकानंतरही एकदिवसीय क्रिकेट खेळत राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पीटीआयशी बोलताना सैकिया यांनी स्पष्ट केले की, संघाच्या योजना आणि खेळाडूंच्या भविष्याबाबत चर्चा सुरू आहे, परंतु ती सार्वजनिक करण्याचा कोणताही हेतू नाही.

सैकिया म्हणाले, “आमची टीम खूप सुसंघटित आहे आणि आमच्याकडे अनेक तज्ञ आहेत. सर्व हितधारक यात सामील आहेत. क्रिकेट समिती, निवड समिती आणि सपोर्ट स्टाफ, मुख्य प्रशिक्षक आणि संबंधित खेळाडूंसह सर्व हितधारकांच्या सहभागाने सर्व निर्णय घेतले जातात. सतत संवाद सुरू असतो. त्यामुळे, आम्हाला चर्चेसाठी कोणत्याही विशिष्ट सत्राची गरज नाही. ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे.”

अलीकडे, 2027 च्या विश्वचषक स्पर्धेसाठी भारताच्या तयारीमध्ये वरिष्ठ खेळाडूंच्या भूमिकेबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. रोहित आणि कोहली या दोघांनीही या स्पर्धेत खेळण्याची आपली इच्छा वारंवार व्यक्त केली आहे. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी भविष्यातील संघाच्या रचनेबाबत कोणतेही ठोस आश्वासन देणे टाळले आहे.

बीसीसीआयच्या मते कोणत्याच खेळाडूला विशेष सवलत मिळणार नाही. विराट आणि रोहितची निवड ही त्यांच्या कामगिरीवर आणि फिटनेसवर आधारित असेल. त्यामुळे दोन्ही खेळाडूला आता आपल्या कामगिरीसोबतच तंदुरस्तीवर विशेष लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी