AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निवडणुकीपूर्वीच नितीन गडकरींचा मोठा निर्णय, आजच अ‍ॅक्शन; उत्तर प्रदेशात काय घडणार?

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकांपूर्वी ₹33.77 अब्जांच्या 8 महामार्ग प्रकल्पांचे लोकार्पण व शिलान्यास केले. जौनपूर येथे झालेल्या या कार्यक्रमामुळे भाजपची निवडणूक रणनीती स्पष्ट झाली आहे. विकास कामांद्वारे जनतेची मते जिंकण्याचा भाजपचा प्रयत्न असून, यामुळे जौनपूरसह प्रतापगड, भदोही आणि आझमगडला फायदा होईल.

निवडणुकीपूर्वीच नितीन गडकरींचा मोठा निर्णय, आजच अ‍ॅक्शन; उत्तर प्रदेशात काय घडणार?
Nitin GadkariImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 05, 2026 | 10:30 AM
Share

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांचं काऊंटडाऊन सुरू झालं आहे. पुढच्या वर्षी राज्यात निवडणुका होणार असल्याने त्यापूर्वीच भाजप कामाला लागला आहे. त्याचाच एक भाग म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आज उत्तर प्रदेशात आठ नवीन हायवेंचं लोकार्पण आणि शिलान्यास करणार आहेत. जौनपूर येथील मुंगराबादशाहपूरच्या सार्वजनिक इंटर कॉलेजच्या मैदानावर हा समारंभ होणार आहे. 33.77 अब्जाच्या या योजना आहेत. यावेळी नितीन गडकरी उपस्थितांना संबोधित करणार आहेत. यावेळी ते 467 कोटींच्या पाच योजनांचं शिलान्यास आणि 3210 कोटींच्या तीन योजनांचं लोकार्पण करणार आहेत.

नितीन गडकरी जिल्ह्यात दोन तास राहणार आहेत. 1.15 वाजता ते रवाना होतील. जौनपूरला दिलेल्या या योजनांचा प्रतापगड, भदोही आणि आजमगडला फायदा होणार आहे. गडकरी ज्या परियोजनांचं लोकार्पण, शिलान्यास आणि भूमिपूजन करणार आहेत. त्याचा लाभ भदोही आणि आजमगडला मिळणार आहे. जौनपूरमध्ये एनएच 128 एवर लता मंगेशकर चौकातून प्रसाद इन्स्टिट्यूटपर्यंत 33 कोटी खर्चून बनणाऱ्या 4.7 किलमोटरच्या फोरलेनचा फायदा आजमगडला होणार आहे.

भाजप सक्रिय

उत्तर प्रदेशात पुढच्या वर्षी लोकसभेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत पुन्हा एकदा यश मिळवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. भाजप आतापासूनच उत्तर प्रदेशात अनेक टप्प्यांमध्ये काम करत आहे. राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ संपूर्ण राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन नागरिकांशी संवाद साधत आहेत. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून मोट बांधणी करत आहेत. तर पक्षाचे प्रभारी विनोद तावडे हे कार्यकर्ते आणि पदााधिकाऱ्यांना भेटून समस्या ऐकून घेत आहेत.

तसेच निवडून येणारे उमेदवार आणि परफॉर्मन्स डाऊन असलेल्या आमदारांचा रिपोर्टही तयार करत आहेत. याशिवाय राज्यातील महत्त्वाचे छोटे पक्ष आणि निवडणुकीत प्रभाव पाडणाऱ्या सामाजिक संघटनांशी तावडे संवाद साधत असून मतांची मोट बांधत आहेत. तर, दुसरीकडे नितीन गडकरी यांनी उत्तर प्रदेशात विकास कामांचा धडका लावला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात भाजप एकाच पातळीवर अनेक कामं करून राज्यातील वातावरण ढवळून काढताना दिसत आहे.

मोदी सक्रिय होणार

भाजपच्या पुढच्या टप्प्यात केंद्रातील अनेक बडे मंत्री उत्तर प्रदेशात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. उत्तर प्रदेशातील महत्त्वाच्या कामांचं भूमिपूजन करण्याबरोबरच राज्यातील जनतेशीही ते संवाद साधणार आहेत. त्यानंतर शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उत्तर प्रदेशात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील वातावरण अधिकच ढवळून निघणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Follow Us
साताऱ्यात शेतकरी आंदोलनाचा वाहतुकीला मोठा फटका! पुणे-बंगळूरु महामार्ग
साताऱ्यात शेतकरी आंदोलनाचा वाहतुकीला मोठा फटका! पुणे-बंगळूरु महामार्गावर वाहनांच्या रांगा, प्रवासी तासन् तास अडकले
गोकुळवर महायुतीचा अध्यक्ष ठरणार? 4 नियुक्त सदस्यांमुळे सतेज पाटील...
गोकुळवर महायुतीचा अध्यक्ष ठरणार? 4 नियुक्त सदस्यांमुळे सतेज पाटील संतापले, विचारला थेट सवाल!
ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणार? 2006 मधील दोन प्रकरणांची पुन्हा...
ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणार? 2006 मधील दोन प्रकरणांची पुन्हा चौकशी
सहर शेख यांच्या ताजमहाल पोस्टने वाद पेटला; मुंब्र्यात भाजपचे आक्रमक...
सहर शेख यांच्या ताजमहाल पोस्टने वाद पेटला; मुंब्र्यात भाजपचे आक्रमक आंदोलन!
सांगली जिल्हा बँकेच्या निकालानंतर जयंत पाटील-पडळकर एकाच मंचावर
Sangli Padalkar Vs Patil : सांगली जिल्हा बँकेच्या निकालानंतर जयंत पाटील- गोपीचंद पडळकर एकाच मंचावर
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत सुप्रिया सुळेंनी दिली अपडेट! पुढील चेकअप...
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत सुप्रिया सुळेंनी दिली अपडेट! पुढील चेकअपसाठी ब्रीच कॅंडी रुग्णालयात
ट्रम्प यांच्या पराभवावर बराक ओबामा यांची मोठी प्रतिक्रिया; थेट म्हणाले
ट्रम्प यांच्या पराभवावर बराक ओबामा यांची मोठी प्रतिक्रिया; थेट म्हणाले, हा विजय...
ऊसाला 4200 रुपये दर द्या, अन्यथा सातारा, सांगली आणि कोल्हापूर बंद! राज
ऊसाला 4200 रुपये दर द्या, अन्यथा सातारा, सांगली आणि कोल्हापूर बंद! राजू शेट्टींचा सरकारला इशारा
एकनाथ शिंदेंना वाराणसीत मोठा सन्मान; 'सनातन मार्तंड' पुरस्काराने गौरव,
एकनाथ शिंदेंना वाराणसीत मोठा सन्मान; 'सनातन मार्तंड' पुरस्काराने गौरव, धर्मध्वजा धारक उपाधीही बहाल!
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय....
Sharad Pawar Health Update : शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय तपासण्या सुरू