तिसऱ्या लग्नानंतर 4 महिन्यातच आमिर खान याच्यावर घर सोडण्याची वेळ, मुंबईतील..
अभिनेता आमिर खान हे कायमच चर्चेत असलेले नाव आहे. आमिर खान याने काही महिन्यांपूर्वीच तिसरे लग्न केले. त्याच्या या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाली. अगदी कमी लोकांच्या उपस्थितीत त्याने लग्न केले. आता मोठी बातमी पुढे येत आहे.

बॉलिवूड अभिनेता आमिर खान त्याच्या चित्रपटांपेक्षा अधिक त्याच्या खासगी आयुष्यामुळे तूफान चर्चेत आहे. आमिर खान याने वयाच्या 61 व्या वर्षी तिसऱ्यांदा लग्न केले. 5 जुलै 2026 रोजी आमिर खान याने गौरी स्प्रॅट याच्यासोबत लग्न केले. अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये आमिर खान याने लग्न केले. त्याच्या लग्नाचे फोटोही पुढे आले. किरण रावपासून आमिर खान विभक्त झाला. त्यानंतर तो गौरी स्प्रॅट हिला डेट करत होता, अखेर त्यांनी जुलै महिन्यात लग्न केले. गौरी स्प्रॅट हिचेही अगोदर लग्न झाले असून पहिल्या पतीपासून तिला एक मुलगा आहे. आमिर खान आणि गौरी स्प्रॅट यांच्या लग्नाला 4 महिने पूर्ण झालीत. पण चार महिन्यातच आमिर खान याचे घर सोडण्याची वेळ गौरी स्प्रॅट हिच्यावर आली. गौरी स्प्रॅट आणि आमिर खान त्यांच्या नव्या घराच्या शोधात आहेत.
आमिर खान याने मुंबईतील यूनियन पार्कमधील आपले जुने घर सोडले आणि तो भाड्याच्या घरात राहत होता. हे त्याचे घर दत्त रोडवर आहे. हे त्याचे घर इम्रान हाश्मी आणि संजय दत्त यांच्या घराच्या जवळ असल्याचे सांगितले जाते. मात्र, आता हेच घर सोडण्याची वेळ आमिर खान याच्यावर आली. हे घर सोडण्याचे कारण म्हणजे या इमारतीचा पुनर्विकास होणार आहे.
त्यामुळे आमिर खान याला हे घर सोडावे लागेल. त्यामुळे आमिर खान पुन्हा एकदा नव्या घराच्या शोधात आहे. काही महिन्यांपूर्वीच याच घरात गौरी स्प्रॅटसोबत आमिर खान याने लग्न केले. आता आमिर खान आणि गौरी स्प्रॅट आपल्या संसाराची सुरूवात दुसऱ्या घरापासून करणार आहेत. मुंबईच्या उपनगरीय भागात आमिर खान एका अपार्टमेंटमध्ये स्थलांतरीत होणार असल्याचे सांगितले जात आहे.
आमिर खान याला हवे तसे ते घर डिझाईन केले जाईल. सुरक्षेच्या कारणामुळे त्याच्या नवीन घराचा पत्ता सांगण्यात आला नाही. लग्नाच्या चार महिन्यातच घर सोडण्याची वेळ गौरी स्प्रॅट हिच्यावर आली. आमिर खान याने तिसरे लग्न केल्यानंतर अनेकांनी त्याच्यावर जोरदार टीका केली. 61 व्या वर्षी त्याने तिसऱ्यांदा लग्न केल्याने अनेकांनी त्याला खडेबोल सुनावले.
