AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महायुतीमधील अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाणांना अमित शाहंची महत्वाची सूचना

mahayuti politics : महायुतीमधील अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाण यांना अमित शहा यांनी महत्वाची सूचना दिल्या आहेत. चव्हाण यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती.

महायुतीमधील अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाणांना अमित शाहंची महत्वाची सूचना
amit shah news Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 05, 2026 | 10:36 AM
Share

काही दिवसांपूर्वी राज्यात पाच जागांवर झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने चांगली कामगिरी केली. महाविकास आघाडीने पाच पैकी तीन जागा जिंकल्या. तर महायुतीला फक्त 2 जागांवर समाधान मानावे लागले. दोन्ही शिक्षक मतदारसंघात भाजपने विजय मिळवला. परंतु इतर तीन जागांवर महायुतीमधील मतभेदाचा फटका बसल्याचे बोलले जात आहे.  विधानपरिषदेच्या निकालानंतर महाविकास आघाडीची आत्मविश्वास वाढल्याचे दिसून आले. विधानपरिषदेच्या या निकालाची भाजपच्या वरिष्ठांपर्यंत चर्चा गेली. या निकालानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान विधानपरिषद निवडणुकीतील कामाचा अहवाल देखील सादर केला. महायुती अभेद्य ठेवण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. या निवडणुकीनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविंद्र चव्हाण यांना महत्वाच्या सूचना केल्या. महाविकास आघाडीच्या नॅरेटीव्हला खोडून काढा. विरोधकांना जशास तसे उत्तर द्या, महायुती म्हणून विरोधकांना पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर द्या, अशा सूचना अमित शहा यांनी रवींद्र चव्हाण यांना केल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि रविंद्र चव्हाण यांच्या भेटीची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

विधानपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान महायुतीत काय घडलं होतं?

विधानपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आल्याचे दिसून आले. निवडणुकीआधी शिंदे गट आणि भाजपमध्ये तिकीटावरून रस्सीखेच झाली.  पुण्यातील शिक्षक मतदारसंघात शिंदे गट आणि भाजपनेही उमेदवार दिली होती. या मतभेदाचा फटका पुण्यातील शिक्षक आणि पदवीधरमध्ये दिसून आला. पुण्यातील शिक्षक मतदारसंघात भाजपने विजय मिळवला. परंतु पदवीधरमध्ये भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला. तर मराठवाड्यातील पदवीधर मतदारसंघातही अजित पवार गटाच्या तत्कालीन  विद्यमान आमदाराला पराभवाचा सामना करावा लागला. विधानपरिषदेच्या निकालानंतर भाजपच्या नवनाथ बन यांनी शिंदे गटावर आगपाखड केली. विधानपरिषदेच्या महायुतीच्या कामगिरीला शिंदे गटाला जबाबदार धरलं. तर शिंदे गटाच्या रवींद्र धंगेकर यांनीही नवनाथ बन यांचा चांगलाच समाचार घेतला. त्यानंतर भाजपच्या प्रमुख नेत्यांवरही टीका केली.

Follow Us
साताऱ्यात शेतकरी आंदोलनाचा वाहतुकीला मोठा फटका! पुणे-बंगळूरु महामार्ग
साताऱ्यात शेतकरी आंदोलनाचा वाहतुकीला मोठा फटका! पुणे-बंगळूरु महामार्गावर वाहनांच्या रांगा, प्रवासी तासन् तास अडकले
गोकुळवर महायुतीचा अध्यक्ष ठरणार? 4 नियुक्त सदस्यांमुळे सतेज पाटील...
गोकुळवर महायुतीचा अध्यक्ष ठरणार? 4 नियुक्त सदस्यांमुळे सतेज पाटील संतापले, विचारला थेट सवाल!
ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणार? 2006 मधील दोन प्रकरणांची पुन्हा...
ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणार? 2006 मधील दोन प्रकरणांची पुन्हा चौकशी
सहर शेख यांच्या ताजमहाल पोस्टने वाद पेटला; मुंब्र्यात भाजपचे आक्रमक...
सहर शेख यांच्या ताजमहाल पोस्टने वाद पेटला; मुंब्र्यात भाजपचे आक्रमक आंदोलन!
सांगली जिल्हा बँकेच्या निकालानंतर जयंत पाटील-पडळकर एकाच मंचावर
Sangli Padalkar Vs Patil : सांगली जिल्हा बँकेच्या निकालानंतर जयंत पाटील- गोपीचंद पडळकर एकाच मंचावर
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत सुप्रिया सुळेंनी दिली अपडेट! पुढील चेकअप...
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत सुप्रिया सुळेंनी दिली अपडेट! पुढील चेकअपसाठी ब्रीच कॅंडी रुग्णालयात
ट्रम्प यांच्या पराभवावर बराक ओबामा यांची मोठी प्रतिक्रिया; थेट म्हणाले
ट्रम्प यांच्या पराभवावर बराक ओबामा यांची मोठी प्रतिक्रिया; थेट म्हणाले, हा विजय...
ऊसाला 4200 रुपये दर द्या, अन्यथा सातारा, सांगली आणि कोल्हापूर बंद! राज
ऊसाला 4200 रुपये दर द्या, अन्यथा सातारा, सांगली आणि कोल्हापूर बंद! राजू शेट्टींचा सरकारला इशारा
एकनाथ शिंदेंना वाराणसीत मोठा सन्मान; 'सनातन मार्तंड' पुरस्काराने गौरव,
एकनाथ शिंदेंना वाराणसीत मोठा सन्मान; 'सनातन मार्तंड' पुरस्काराने गौरव, धर्मध्वजा धारक उपाधीही बहाल!
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय....
Sharad Pawar Health Update : शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय तपासण्या सुरू