AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अफगाणिस्ताननंतर इंग्लंडविरुद्ध मालिकेतूनही विराट बाहेर पडणार? दुखापतीबाबत अपडेट समोर

टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली लवकरच टीम इंडियासाठी मैदानावर परतताना दिसणार आहे. त्याच्या दुखापतीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.

अफगाणिस्ताननंतर इंग्लंडविरुद्ध मालिकेतूनही विराट बाहेर पडणार? दुखापतीबाबत अपडेट समोर
virat kohli
| Updated on: Jun 19, 2026 | 3:08 PM
Share

भारतीय संघ सध्या अफगाणिस्तानविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत आहे. दोन सामने पार पडले असून दोन्ही सामने भारताने जिंकले आहेत. दोन्ही सामने जिंकून भारतीय संघाने अभेद्य आघाडी घेतली आहे. यानंतर इंग्लंड आणि आयर्लंडविरुद्ध भारतीय संघ मालिका खेळणार आहे. आता अफगाणिस्तानविरुद्ध एकदिवसीय मालिकेत तर विराट कोहली खेळला नव्हता. कोहली आता मैदानात कधी परतणार याकडे चाहत्यांच्या नजरा खिळल्या असताना एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. कोहली संघात कधी परतणार आता याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

टीम इंडिया शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत आहे. टीम इंडियाचा अनुभवी खेळाडू विराट कोहली या मालिकेत खेळत नाहीये. दुखापतीमुळे तो संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे. दरम्यान, त्याच्या दुखापतीबद्दल आणि टीम इंडियामध्ये त्याच्या पुनरागमनाबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, विराट कोहली वेगाने बरा होत आहे आणि इंग्लंडमधील एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियामध्ये परत येऊ शकतो.

आरसीबीकडून खेळताना आयपीएलच्या अंतिम सामन्यात विराट कोहलीला दुखापत झाली होती. त्याने अंतिम सामन्यात संघासाठी एक शानदार सामना जिंकून देणारी खेळी केली होती. अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी त्याचा संघात समावेश करण्यात आला होता, परंतु नंतर दुखापतीमुळे त्याला बाहेर काढण्यात आले. इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत त्याचे पुनरागमन ही टीम इंडिया आणि तिच्या चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, इंग्लंडमधील एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ पुढील 3-4 दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे.  शुभमन गिल पुन्हा एकदा भारतीय संघाचे नेतृत्व करणार असून, 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकामुळे ही मालिका अधिकच विशेष ठरते.

टी-20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर, विराट कोहली आता भारतासाठी फक्त एकदिवसीय सामने खेळतो. तो शेवटचा जानेवारीमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या मालिकेत खेळला होता, जिथे त्याने 80 च्या सरासरीने आणि 105.26 च्या स्ट्राइक रेटने 240 धावा करून भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या होत्या.

Follow Us
पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! पहा Video
Manoj Jarange Patil | पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! फुलांचा वर्षाव अन्... पहा व्हिडीओ
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील नेत्याचा एकाच विमानाने प्रवास
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील बड्या नेत्याचा एकाच विमानाने प्रवास, फोटो आले समोर
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही घेऊ शकतो- जरांगे
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही... भर मंचावरून मनोज जरांगे कडाडले; आता...
Big Breaking| बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर
Big Breaking | बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर; नेमकं काय घडलं? पहा व्हिडीओ
मी नितीन गडकरी यांना फोन केला अन् म्हणालो... तिसऱ्या मुंबईवरून राज ठाक
मी नितीन गडकरी यांना फोन केला अन् म्हणालो... तिसऱ्या मुंबईवरून राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
NCP शरद पवार गटातील 8 खासदारांची मोदींसोबत बैठक; रोहित पवार म्हणाले...
NCP शरद पवार गटातील 8 खासदारांची मोदींसोबत बैठक; रोहित पवार म्हणाले, 17 तारखेला...
ठाण्याच्या टिकोजीरावांना निवडणूक आयोगाने परस्परच... संजय राऊतांची टीका
ठाण्याच्या टिकोजीरावांना निवडणूक आयोगाने परस्परच... बोलता बोलता संजय राऊत असं काही म्हणाले की.. विधानाची तुफान चर्चा
समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलन, सत्यजित तांबे आणि पोलिसात झटापट,
समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलन, सत्यजित तांबे आणि पोलिसात झटापट, आंदोलक आक्रमक
आदित्य ठाकरे आणि CJP पदाधिकाऱ्यांच्या भेटीत नेमकं काय घडलं? Inside...
आदित्य ठाकरे आणि CJP पदाधिकाऱ्यांच्या भेटीत नेमकं काय घडलं? अखेर Inside स्टोरी समोर