AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फिफा वर्ल्डकप स्पर्धेत असं पहिल्यांदाच घडलं! 74 व्या मिनिटानंतर सामन्याचं चित्र बदललं आणि…

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत स्वित्झर्लंड आणि बोस्निया हर्जेगोविना हे संघ आमनेसामने आले होते. या साम्यात स्वित्झर्लंडने बोस्नियाला 4-1 ने पराभवाची धूळ चारली. पण हा विजय वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात खास होता. त्याला कारणही तसंच आहे.

फिफा वर्ल्डकप स्पर्धेत असं पहिल्यांदाच घडलं! 74 व्या मिनिटानंतर सामन्याचं चित्र बदललं आणि...
फिफा वर्ल्डकप स्पर्धेत असं पहिल्यांदाच घडलं! 74 व्या मिनिटानंतर सामन्याचं चित्र बदललं आणि...Image Credit source: Getty Images
| Updated on: Jun 19, 2026 | 3:58 PM
Share

Switzerland vs Bosnia-Herzegovina: फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत काही विक्रम रचले आणि मोडले जात आहे. पण काही विक्रम आश्चर्यकारकही आहेत. कारण यापूर्वी या स्पर्धेत असं कधीच घडलं नव्हतं. त्यामुळे फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत स्वित्झर्लंडचं नाव विक्रमाच्या यादीत नोंदवलं गेलं आहे. ग्रुप बी मध्ये स्वित्झर्लंडचा दुसरा सामना बोस्निया आणि हार्जेगोविना यांच्यात पार पडला. पहिल्या सामन्यात स्वित्झर्लंडचा सामना बरोबरीत सुटला होता. पण दुसऱ्या सामन्यात स्वित्झर्लंडने विजयी झेंडा फडकावला. बोस्निया आणि हार्जेगोविना विरूद्धचा हा सामना स्वित्झर्लंडने 4-1 ने जिंकला. हा विजयी विक्रमी ठरला. त्याला कारणही तसंच आहे. कारण हा सामना जसा झाला तसं वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात यापूर्वी कधीच घडलं नव्हतं. कारण या सामन्याच्या 73 व्या मिनिटापर्यंत सामना गोलरहित होता.

वर्ल्डकप इतिहासात या सामन्याची नोंद

स्वित्झर्लंडने 74 मिनिटांपर्यंत पहिल्या गोलसाठी संघर्ष केला. इतकंच काय तर पहिल्या गोलनंतर आणखी तीन गोल मारले. बोस्नियाने देखील एक गोल मारला. पण 4 गोलचं अंतर कमी करण्यात अपयश आलं. फिफा वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात शेवटच्या टप्प्यात 4 गोल मारण्याचा विक्रम स्वित्झर्लंड संघाने केला आहे. तर एक गोल बोस्नियाच्या नावावर नोंदवला गेला. यापूर्वी असं कधीच घडलं नव्हतं. सामन्याच्या 74 व्या मिनिटापासून एकूण 5 गोल मारले गेल्याने हा अनोखा विक्रम नोंदवला गेला आहे.

राखीव खेळाडूने केली कमाल

स्वित्झर्लंडचा संघ पहिल्या हाफपासून गोल मारण्यासाठी धडपड करत होता. पण दुसऱ्या हाफमध्ये प्रशिक्षक मूरत याकिन यांनी फासे टाकले आणि ते यशस्वी ठरले. त्यांनी बेंचवर बसलेल्या राखीव खेळाडू जोहान मंझाम्बी आणि रुबेन वर्गासला मैदानात पाठवलं. त्यामुळे या सामन्याचं चित्रच बदललं. रुबेन वर्गासने 74व्या मिनिटाला गोल मारला आणि संघाला आघाडी मिळवून दिली. आघाडी मिळाल्यानंतर आक्रमक खेळ पुढे नेण्याचा प्रयत्न स्वित्झर्लंडच्या खेळाडूंनी केला. मझांबीच्या अप्रतिम पासवर बोस्नियन बचावपटू तारिक मुहरेमोविचने ब्रील एम्बोलोवर फाऊल केला. त्यामुळे रेफरीने मुहरेमोविचला रेड कार्ड दाखवून बाहेर पाठवलं.

रुबेन वर्गासने दुसरा गोल मारला आणि 2-0 ने आघाडी घेतली. त्यानंतर 90 व्या मिनिटाला मझांबीने गोल मारला आणि 3-0 ने आघाडी घेतली. त्यांतर बोस्नियन एर्मिन महमिकने गोल मारला आणि 3-1 अशी स्थिती आणली. पण बरोबरी साधण्यात अपयश आलं. अतिरिक्त वेळेत जिब्रिल सोव्हवर झालेल्या फाऊलमुळे स्वित्झर्लंडला पेनल्टी मिळाली. कर्णधार ग्रॅनिट झाकाने अचूकपणे गोलमध्ये रूपांतरित करून आपल्या संघाला ४-१ असा ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

Follow Us
तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत...
Lalbaugcha Raja : तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत तक्रार, अन् उद्या हायकोर्टात...
मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात!
Amit Thackeray : मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात! फडणवीसांचा जुना VIDEO दाखवत अमित ठाकरेंचा सवाल
मसाल्यांच्या बाजारात स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
Goldie Group : मसाल्यांच्या बाजारात गोल्डी ग्रुपचा नवा धमाका; स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोल...
Mumbai High Court : सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोलवाद्यांवरही कोर्टाचा दणका
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले
Sanjay Shirsat : दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले; अंबादास दानवेंकडून VIDEO ट्विट करत शिरसाट यांच्यावर टीका
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
NCP : दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही
Maharashtra Drought : बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही, पुढे म्हणाले...
डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने...
Mira Bhayandar : डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला दंड केल्याचा आरोप; प्रशासन ॲक्शन मोडमध्ये
पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल
Manoj Jarange : पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल; पुढे म्हणाले...
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी....
Shivsena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी पुढे ढकलली, नवी तारीख काय?